"पाय" दिवस
आज २२ जुलै, २२/७. शाळेत आपली वर्तुळाच्या परिघाशी ओळख याच अपूर्णांकामुळे होते, २२/७, "पाय". याच "पाय"चा आणखी एक दिवस मानता येईल, १४ मार्च. पायची किंमत आहे ३.१४१५९२६५.... पहिले तीनच आकडे घेतले आणि अमेरीकन पद्धतीने तारीख लिहीली तर १४ मार्च होते ३/१४ ... झाला आणखी एक पाय दिवस.
तर या पायचं महत्व प्राचीन भारतीय गणितज्ञानांही समजलं होतं. वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर असतं पाय आणि प्राचीन भारतीयांनीही, कोणत्याही संगणक, गणकयंत्राच्या मदतीशिवाय पायची किंमत अनेक स्थानांपर्यंत लिहून ठेवली आहे. प्राचीन इजिप्शियन, बॅबिलोनियन आणि ग्रीकांनाही पायची महती आणि किंमत माहीत होती.
मिसळपाव