Skip to main content

मौजमजा

खराब रस्त्यांचे फायदे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 21/09/2010 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
खराब रस्त्यांचे फायदे
भारतातील रस्ते अन त्यांची स्थिती यावर मी पिएचडी करायची ठरवीलेली आहे. भारतात कोठेही जा. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पश्विम बंगाल, उत्तरप्रदेश, तमिळनाडू. सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात गुजरात मध्ये थोडीफार परिस्थिती बरी आहे. ग्रामिण भागात तर रस्ता १० चा २० होतो. काही ठिकाणी बरा रस्ता असल्याने तो १० चा १५ होतो. १० चा १० असणारे रस्ते फारच दुर्मीळ. (१० चा x असणे हे रस्त्याची परिस्थिती मोजण्याचे आमच्याकडचे परिमाण आहे.

द अंग्रेज

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 15/09/2010 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे.

माझ्या झोपेची झाली आता येळ

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/09/2010 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या येथील काव्याचे हे विडंबन म्हणावे की स्वतंत्र काव्य हे तुम्हीच ठरवा. आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ|| दिसभर मी राबराबतो कष्टानं दमून जातो किती आटवन तुझी मला येई कामामदी बी लक्ष लागत न्हाई दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ माझ्या झोपेची झाली आता येळ ||१|| कधी दिवसपाळीत दिस जाई कधी रातपाळी आडवी येई हातामधी हात तुझा कधी मी घेई? त्यासाठी ज
काव्यरस

स्टेपनीची गरज

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 13/09/2010 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की. स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे.

खारकेची बी

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 10/09/2010 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
पावशेर खारकेच्या बिया भरुन ठेवल्यात एका डब्यात सकाळी एक तोंडात टाकतो अन बसतो चघळत निरर्थक रात्री झोपतांना तीच बी नीट ठेवतो कधी साखरेच्या तर कधी तिखट मिठाच्या पाण्यात रात्रभर स्वप्न पहात सकाळी पुन्हा उठुन तीच बी चघळण्यासाठी जीव आसुसला होतो पोट भरत नाही की तोंडही सुकत नाही गोडी मिळत नाही की कडु पण पडत नाही बी असली तरी खारकेची चवच मुळी न्यारी सर्व मिपाकरांना समर्पित (पुनःप्रकाशित)

अलविदा त्या रुम मालकांना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 04/09/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील. बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली.

छोटेखानी लेखांची मालिका - इथे शब्द संपतात...१

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
दहीभात..! इथे शब्द संपातात! हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..! कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..! पोटात गडबड? अजीर्ण? हम्म.. थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :) दहीभात कधीही खावा.. छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..