Skip to main content

मौजमजा

तो.पा.सुटल की नाही ?

लेखक जागु यांनी गुरुवार, 11/11/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. मी लहान असताना भरपुर चिंचा खायचे. शेताच्या बांधावर जाऊन झाडावर दगड माडून चिंचा पाडायच्या आणि तिथेच झाडाखाली बसुन घरुन पुडीत बांधून आणलेला मिठ मसाला लावुन खायचा हे उद्योग बर्‍याचदा चालायचे. असे खाउन मन नाही भरायच तेंव्हा त्याच चिंचा घरी नेउन परत त्याची चटनी बनवायची आणि खायची. गोबोळी चिंचा शोधायलाही मजा यायची. चिंच हलवायला खास माणूस यायचा तेंव्हा मग त्या पिकलेल्या चिंचेत एखादी गाबोळी चिंच मिळाली की खुप आनंद व्हायचा.

बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/11/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद! वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते.

पार्टी गेम्स

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 10/11/2010 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही पार्टी गेम्स ....तुम्हा सर्वांसाठी. हे खेळ प्रामुख्याने जोडप्यांसाठी आहेत. १.खेळ पहिला=बायकोला दागिने घालणे. पार्टीला यायच्या आधीच यजमानांनी बायकांना जास्तीत जास्त दागिने घालून यायला सांगावे. खेळ सुरु करण्यापूर्वी बायकांनी हे सगळे दागिने एखाद्या ताटलीत घेवून खुर्चीवर बसावे. आणि मग नवर्यानी हे सर्वं दागिने बायकोच्या अंगावर परत घालावेत. जो सगळ्यात आधी सर्वं दागिने बायकोला घालेल तो जिंकला.यात बायकांनी कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. बोलून किंवा एक एक दागिना हातात देवून वगैरे.गुपचूप बसून राहायचे. (अवघड आहे नाही ? आणि नवर्याला सूचना नाही द्यायच्या तर कोणाला द्यायच्या ? ) २.

बुरा ना मानो दिवाली है!!

लेखक यकु यांनी शनिवार, 06/11/2010 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक. अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले! सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही.

दिवाळी

लेखक पारा यांनी शुक्रवार, 05/11/2010 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझा प्रथम प्रयत्न, चु.भू.दे.घे प्रकाशाची झळाळी | आनंदाची रांगोळी | मनोहर दिवाळी | वर्णू किती || दिव्यांची आरास | पणत्यांचा प्रकाश | मनीचा उल्हास | वर्णू किती | लक्ष्मीचे स्तवन | भक्तीने पूजन | अवस्था उन्मन | वर्णू किती || फटाक्यांच्या लहरी | आकाशाच्या अंतरी | दैदिप्यमान नगरी | वर्णू किती || गोड नि तिखट | फराळाचे ताट | चवींचा थाट | वर्णू किती || प्रकाशाचा सण | संस्कृतीचे भूषण | प्रयत्नांती वर्णन | अशक्य ते || ह्याहून अधिक काही सुचले नाही. कृपया गोड मानून घावे :)

काव्यफुफाटा

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 04/11/2010 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
शरदिनी ताईंच्या राज्यात घुसखोरीबद्दल क्षमा मागुन माझी ही कविता दिवाळीभेट म्हणून जालिंदरबाबाच्या चरणी अर्पण. काव्यफुफाटा दुर्धरकविता कंपितचंचल आबालभासी काव्यफुफाटा स्थळसंकेती विद्रुपझेले बधीरकर्णी तव तीव्रफटाका आंतरदैत्य भेसुरनृत्य अन भाळोभाळी अधीरकंटकी गदरपुष्टी हुकुमीकुस्ती शब्दास्त्रांची प्या वृशालवृष्टी झाळीतबुद्धी मार्मिकवृद्धी टपटप भरले डोहउसासे चरितसाधन घायाळचुंबन अर्धकारी ती ललाटभासे उथळनौका खवसागरी केसदुधारी कापुन झाले अशी ही कविता करुन वाचक बिचारे वाचुन मेले. आपलाच, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
काव्यरस

बॉडी डबल

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 30/10/2010 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे.

शाळेतल्या गमतीजमती

लेखक रमणरमा यांनी शनिवार, 30/10/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
फिश् पॉंड ( जमल एकदाच ) आम्ही लहान असताना शाळेत दोन मुलांच्या मधे एक मुलगी किंवा उलटे ( उलटे म्हणजे तसे उलटे नाही हो वाइस वर्सा सारखे उलटे ) बसवायचे. कधी कधी मज्जा यायची पण कधी कधी जेव्हा शेजारचा मुलगा मूलीना हेट करणारा असायचा तेव्हा चांगली जुन्पय्चि. मग बदला घ्यायला एकमेकाना द्वेष पत्रे ( इकडे खरडी पाठवतात म्हणे ) पाठवायचो. ज्या वयात प्रेम पत्रे पाठवायची त्या वयात आम्ही जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हे बघायचो. प्रेम पत्रे पाठवणारे नग सुद्धा होते पण त्यांच्या बद्दल नंतर कधी तरी. त्यातून मग दुसर्‍याचा अगदी कमित कमी शब्दात अपमान करण्याचे नवे नवे प्रकार शोधले जायचे.

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.