Skip to main content

मौजमजा

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

कित्ती कित्ती छान!

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 26/10/2010 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचाच अनुभव आहे. म्हणावे तर साधासाच. पण खूप काही शिकवून जाणारा. असे अनुभवच आपले जीवन खुलवत असतात, फुलवत असतात. आयुष्याचे निराळेच पैलू अवचित आपल्या समोर आणून आपले भावविश्व कुठेतरी समृद्ध करत असतात. झालं असं की मी बस मधून एके ठिकाणी निघालो होतो. आत गेल्यावर बसायला जागा मिळाल्याने स्वारी थोडी खुष होती. एक दोन स्टॉप गेल्यावर अचानक एक मध्यम वयीन काकू आल्या आणि ओरडूनच म्हणाल्या की मला बसू द्या..स्त्रीयांचा काही मान ठेवत नाहीत.. नियम पाळत नाहीत वगैरे वगैरे.. मी खरेतर स्त्रीयांसाठी राखीव जागेवर बसलो नव्हतो. माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला.

एम - २२

लेखक मस्तानी यांनी मंगळवार, 26/10/2010 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
एम २२ हे एका रस्त्याचं नाव आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातला ११६ मैलांचा एक रस्ता. या हेमंत ऋतूमध्ये ज्याचा भाव भलताच वधारतो असा हा एक रस्ता. ऐकून होतो काल-परवा पर्यंत पण आता मात्र प्रत्यक्ष अनुभव घेवून आलोय की या एका रस्त्याबद्दल इतकं का बोललं जात. आठवड्याभराची काम संपवून शुक्रवारी रात्री मुलाच्या स्काउट पथकाबरोबर आयोजित कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकी कोजागिरीची रात्र त्यामुळे चंद्र असा काही दिसत होता की वाह !

बेसिंगस्टोक मेळावा २०१०!

लेखक असुर यांनी शुक्रवार, 22/10/2010 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दसर्‍यानिमित्त शिवाजी पार्कावर झालेल्या ५० डेसिबलच्या मेळाव्याबद्दल बरीच वर्तमानपत्र, वाहिन्या, मराठी आंतरजालावरील धागाकर्ते वगैरे लोकांनी खूप लिहून बक्कळ चर्चा केली. अर्थातच आम्हालाही मळावे वगैरे गोष्टीत भयंकर इंटरेस्ट! त्यामुळे बेसिंगस्टोकात झालेल्या नवरात्र-नवमी मेळाव्याबद्दल लिहून ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ, अँग्री इंग्लंड युवा मोर्चा, बेसिंगस्टोक म्हैला मंडळ, आणि 'क्लब बेल्जियम' यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त कराव्यात हा मानस आहे! बेसिंगस्टोक म्हैला मंडळाच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मा.

50 First Dates आणि गोजिरी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 21/10/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही) चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.

...मिपा करांच्या मनातलं!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 19/10/2010 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे मिपा log in करताना माझा ID टाईप करताना मलाच हसु आले... क्काय्य्च्या काय?... जाई अस्सल कोल्हापुरी! काहिही!... त्यानंतर म्हटलं पाहुया कोण कोण दोस्त लोग आले आहेत! तर हजर सभासद पाहता पाहता परत तोच विचार डोक्यात येउन गेला. काय मजेशीर मजेशीर नावं आहेत ना ........ वाटलं काय काय thoughts आले असतील ना हे नाव deside करताना या लोकांच्या! का "हाच" आपला ID असावा असे वाटले असावे! काहि नावं तर मस्त interesting आहेत. उदा. धमु,ब्रिटिश टिं., आपली अदिती ...आणि all most each and every मिसळ्पाव ID!

कार्टीचा पराक्रम

लेखक रन्गराव यांनी रविवार, 17/10/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल पोरं चिड्ल की काय करतात ह्याचा लई भारी नमुना आहे हा. ईंग्रजीमध्यी आहे पन सगळ्यांना नक्की आवडेल

रांगोळी

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 14/10/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते. रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही.