दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !

विदेश जे न देखे रवी...
( चाल : शूर आम्ही सरदार आम्हाला ) दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती ! लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ| मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१| धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२| ( सूज्ञांस संदर्भ वे. सां. न. ! )
वर्गीकरण

1 टिप्पण्या 1,301 दृश्ये

Comments

नरेशकुमार नवीन

तुमची कविता आवडली, एक मलाबि सुचलीय बघा. दूर आहे कॉम्पुटर, यांना नाही कुणाची भीती ! लाज-बीज अन् शरमहि नाही , यांनी किबोर्ड घेतले हाती |धृ| धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच यांना ठावं अनंत फोरम्सवर कसं जगावं , हेच यांना ठावं मागची-पुढची सारी अब्रु यांनी टांगली वेशीवरती |२| दूर आहे यांचा कॉम्पुटर, यांना नाही कुणाची भीती ! लाज-बीज अन् शरमहि नाही , यांनी किबोर्ड घेतले हाती |धृ|