Skip to main content

कथा

धूपगंध (३)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 13/05/2019 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
पंच तुंड रुंड माळधर पार्वतीश आधी नमीतो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपतो मग तो.... मागील दुवा https://www.misalpav.com/node/17685 ( मित्रानो क्षमा असावी. खूप मोठ्या काळानंतर पोस्ट करतोय.

शेजारी

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 09/05/2019 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार, नुकतेच तुमच्या शेजारी राहायला आलो आहोत. याबाजूला तशी शांतता असते. इथली काहीच माहिती नाही आम्हाला.....इथे वाण्याचं दुकान.... दूध कुठे मिळत.... थोडी माहिती हवी होती." काकूंनी दार उघडल्या उघडल्या त्याने बोलायला सुरवात केली. खराच नवखा असावा तो. नाहीतर एकतर काकूंच्या बंगल्याच्या आत जाण्याचं धाडस त्याने केलं नसतं; आणि गेलाच असता तरी बेल वाजवण्याचा वेडेपणा तर नक्कीच केला नसता. दुपार टळून संध्याकाळची उन्ह उतरायची वेळ झाली होती. दार उघडल्यावर अंधारातून बाहेर डोकावणाऱ्या काकूंच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप आली होती. त्यामुळे त्या मनातून चिडचिडल्या होत्या.

स्वामी

लेखक अन्या बुद्धे यांनी शनिवार, 04/05/2019 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
जगताना खरोखर महत्वाच्या गोष्टी कोणत्या? केवळ सवयीच्या, समाजाने लादलेल्या कोणत्या आणि आतून रुजून येणाऱ्या मूलभूत कोणत्या? कितीतरी गोष्टी, ज्यांना आपण जीवापाड जपतो, महत्वाच्या मानतो त्या किती फोल असतात ते नजर आत वळवून मूलभूत गोष्टींमध्ये 'ध्यान' लावल्याखेरीज उमजत नाही. हे ध्यान स्वयंप्रेरणेने करणारे बुद्ध होतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना जगण्याने तशा स्थितीत जबरदस्तीने ढकलावं लागतं. आणि अर्थातच परिस्थिती आहे म्हणून ध्यान होईलच आणि त्यातून ज्ञान होईलच अशी खात्री देता येत नाहीच. आपल्या रोजच्या जगण्यात अशी, मोजा उलटा व्हावा तशी जगणं उलट होईल अशी उलथापालथ होईल अशी शक्यता कमीच.

चेकमेट

लेखक चाफा यांनी बुधवार, 01/05/2019 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
" स्मित, आज पुन्हा दिसला मला तो" अनामिकेच्या आवाजात कंप होता, फोनवरही तिची मन:स्थिती कळत होती. " डोन्ट वरी, तू गोळी घेतली नाही का आज? " सस्मितने काळजीनं विचारलं " सारख्या कसल्या गोळ्या, तुम्हाला सगळ्यांना पटत का नाहीय, अरे खरंच आहे तो, आणि एक दिवस नक्की तो मला मारणार" " शांत होते का राणी, मी डॉक्टर गोखल्यांना फोन करतो, तू गोळी घे पाहू, तोवर त्यांना घेऊन मी येतोयच" " हो हो घेते गोळी, गोळ्या खायला घालून मारून टाक एकदाचा मला" तारस्वरात किंचाळत उत्तर आलं, पाठोपाठ काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज, " हॅलो, ए अने..

तुफान आलंया

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी शनिवार, 27/04/2019 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली होती . मकरसंक्रांतीनंतर तिळातिळाने दिवस वाढत चालला होता . सकाळी प्रसन्न वाटणारे वातावरण ८ नंतर उष्ण जाणवत होते . हळूहळू उन्हाने डोकं वर काढायला सुरुवात केली होती . माणसे घराबाहेर पडताना छत्री टोप्या स्वतःजवळ बाळगत होते जो तो उन्हापासून बचावासून सगळे उपाय करत होता . दुपारी तर घराबाहेर पडणे अवघड झाले होते महत्वाचे काम असेल तरच ती व्यक्ती घराबाहेर पडत असे . बाहेर लिंबू सरबत , पन्हे , कोकम सरबत , उसाचा रस यांचे स्टॉल जागोजागी लागले होते . शहरात हि परिस्थिती होती पण गावात ? गावात मात्र याच्या विपरीत परिस्थिती आहे .

काकूंच्या क्लिनरची करामत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 24/04/2019 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
काकूंच्या क्लिनरची करामत --------------------------------------------------------------------------------------- एकेक दिवस काय बोअर असतो ना !.... आज रविवार होता. सुट्टीच्या दिवशी सकाळी काय करावं कळतच नाही. मला पोहे खायचे नव्हते. त्यासाठी आईची बोलणी मात्र खाल्ली होती. मला अभ्यास करायचा नव्हता. कार्टून्स बघायची नव्हती. अंगणात नुसतं उभं तरी किती वेळ राहायचं ? खरं म्हणजे- मिनी अजून बाहेर आली नव्हती. घरात बसून काय करत असते, कोणास ठाऊक.

कथा - सुरवात ?

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 19/04/2019 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
कथा - सुरवात ? ---------------------------------------------------- " सुरवात ! " रणदीप ओरडलाच . आम्ही सगळे त्याच्याकडे पाहायला लागलो. " ठरलं तर , आपल्या संघटनेचं नाव - सुरवात ! " तो म्हणाला. आम्ही माना डोलावल्या. वरच्या झाडाच्या फांद्याही हलल्या . ------------------ रणदीपला सतत काहीतरी करायला हवं असायचं. म्हणजे चार लोकांच्या नजरेत भरेल असंच काहीतरी. ..लाइमलाईट !... पुढारीपणा करायला अन गाजवायला त्याला भलतंच आवडायचं. तो आमच्या भागातल्या नगरसेवकाचा मुलगा होता.

चान्स मिळाला रे मिळाला की अ‍ॅक्टिंग!

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 17/04/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
होतकरू अभिनेता झाल्यावर मी आपोआपच होतकरू अभिनेत्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये दाखल झालो. यात फक्त अभिनेते अन् अभिनेत्रीच नव्हे, तर दिग्दर्शक, शूटिंगचं सामान भाड्यानी देणारे, साउंड रेकॉर्डिस्ट, अभिनयाचे आणि तत्सम इतर क्लासेस चालवणारे वगैरे सगळेच सामावलेले असतात. त्या विषयाशी संलग्न सर्व प्रकारच्या बातम्या इथे समजतात. एक हिंदी आणि एक मराठी चित्रपटासाठी अमुक रविवारी अमुक कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑडिशन होणार असल्याची बातमी आली. त्या रविवारी मी कॉलेजच्या कामासाठी पुण्याच्या बाहेर असणार असल्यामुळे मी त्यांना फोन करून माझी ऑडिशन आधी घेण्याची विनंती केली.

पर्वाची गोष्ट आहे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/04/2019 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वाची गोष्ट आहे सायंकाळचा समय होता मी व हिने चितळ्यांच्या दुकानात खरेदी केली चितळे दुकाना समोर नूर भाई भाजीवाल्याचा ठेला आहे नुरभाई भाजी वाल्याकडून भाजी घेतली जवळच रिक्षा होती रिक्षा केली व घरी यायला निघालो वेळ संध्याकाळची डेक्कन वर मरणाची गर्दी लकडी पूल सिग्नल ला रीक्षा थांबली होती तेव्हढ्यात मोग-याचे गजरे विकणारी मुले रिक्षा जवळ आली मोग-याचे गजरे म्हणजे जीव कि प्राण कसे दिले ? १० ला एक ४० ला ६ दे -हि म्हणाली ५ देईन -गजरे वाला मुलगा ठीक आहे दे -त्याने ५ गजरे हिच्या कडे दिले हिने गजरे सुंगले व माझ्याकडे दिले अन पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला तेव्हढ्यात सिग्नल सुटला व रिक्ष

पुरुष

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 14/04/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष *********************************** तो-होळी आहे -रंगवणार तुला ती -नको रे -मी रंग खेळत नाही तो-का ? ती -नाही खेळत तो -पण का? ती -नाही खेळत तो-पण कारण सांग ती -काय सांगू ? तो- जे असेल ते खर सांग ती - आयुष्याचा बेरंग झाला आहे -काय सांगणार तो- माझ्यावर विश्वास आहे ना -मग सार फोडून सांग ती -प्रेमात झालेली फसवणूक -आईच अकाली निधन या मुळे मीपुरती खचून गेले होते -जगण्याची इच्छया संपली होती -आजारी बाबा कडे पाहात मी आयुष्य कंठत होते -आता ते पण राहिले नाहीत तो- ओह्ह्ह सॉरी हे माहीत नव्हते -असे म्हणत त्याने तिला जवळ घेत पाठीवरून हात फिरवला ती -मी खूप एकटी पडली आहे तो- असं का म्हणते -मी आह