Skip to main content

कथा

झगमगाटातील अस्वस्थता....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 14/03/2019 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
एक जोरदार आळस देऊन मी उठलो. भ्रमणध्वनीवर 'ओला' निरोप पावला. Driver Saroj is reaching your address. 'सरोज? ओलाने लेडी ड्रायव्हर पाठवला की काय?' क्षणभर सुखावलेल्या माझ्या मनाला चालकाच्या तपशिलात छायाचित्र दिसले जे बाप्याचे होते. म्हंटले 'असो.' सामानाची बॅग उचलली आणि खाली आलो. चालक वाट पाहात होता. डिकीत (भारतात हाच शब्द प्रचलित आहे) बॅग ठेवली आणि पासपोर्ट, तिकिट थोडेफार भारतिय आणि ओमानचे चलन असलेला महत्वाचा चामड्याचा कसा उर्फ 'पाऊच' घेऊन मी चालकाशेजारी बसलो. परदेश प्रवास, विमान प्रवास तसा आता मला नविन नव्हताच.

जाब

लेखक मित्रहो यांनी रविवार, 10/03/2019 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाब "ब्रुटस दाउ टू, ब्रुटस दाउ टू" तो जिकडे जात होता तिकडे हेच ऐकत होता. तो कान बंद करीत होता तरी ते आवाज त्याच्या कानात घुमत होते. तो या आवाजापासून जितका दूर पळत होता तितका तो आवाज त्याचा पाठलाग करीत होता. रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर रस्त्यावरच्या गोंधळातही तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो दूर गुफेत जाउन लपला तर तिथेही आवाज त्याच्या मागे येत होता. तो चिडला, वैतागला. त्याने जाब विचारायचे ठरविले. तो पळत निघाला. तो पळत होता. कितीतरी दिवस नुसता पळत होता. तो पळत पळत शेकडो मैल दूर आला. रोम खूप मागे राहीले होते. तो इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड या गावी आला. तो तिथे ट्रिनिटी चर्चपाशी गेला.

मैत्र - ७

लेखक शाली यांनी शुक्रवार, 08/03/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
इन्नीने त्याला वर्गाच्या दारातच गाठलं आणि आधार दिला. दत्त्याही धावला. शकील गाडीच्या चाव्या माझ्या अंगावर फेकत म्हणाला “अप्पा, गाडी काढ. ठोब्बा, पानी ला जलदी.” मी रामला सगळ्यांच्या वह्या गोळा करायला सांगीतल्या आणि शकीलबरोबरच वर्गाबाहेर पडलो. सखाराम आमच्या या धावपळीकडे डोळे विस्फारुन पहात राहीला… मी आणि शकील बाहेर आलो. शाम्या इन्नीच्या हातातून दंड सोडवायचा प्रयत्न करत होता. इन्नी घाबरली होती, रडतही होती.

मैत्र - ६

लेखक शाली यांनी मंगळवार, 05/03/2019 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस धावपळीचा गेला होता तरी सगळे आनंदी होतो. कॉलेजमध्ये वर्षभर होणाऱ्या स्पर्धा, उपक्रम या सगळ्या भानगडींपासून दुर रहाणाऱ्या शकीलने आज ‘वक्तृत्व स्पर्धेचा’ करंडक अनपेक्षितपणे खेचून आणला होता. हा करंडक गेला असता तर जोशीसरांचे आठवडाभर शिकवण्यात लक्ष लागले नसते. थकवा जाणवत होता तरी आम्ही नेहमीप्रमाणे शाम्याच्या ओट्यावर जमलो होतो. शाम आणि दत्ता माझी स्कुटर घेऊन सगळ्यांना कप दाखवायला गेले होते. त्यांना बराच वेळ झाला होता जाऊन, एव्हाना यायला पाहिजे होते. मी, ठोब्बा, राम, शकील सगळेच ओट्यावर बसलो होतो. आज कुणीही ओटाकट्याला दांडी मारणार नव्हताच. काकूंनी धोंड्याला मळ्यात पिटाळलं होतं केळी आणायला.

दोसतार -१९

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/02/2019 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/44158
आज्जीचा तो देवघरातल्या घंटेसारखा किणकिणणारा किनरा आवाज .वेखंडाच्या मिरमिरीत वास , आज्जीचा थोपटणारा मऊसूत हात आणि आज्जीच्या जुन्या साडीच्या गोधडीची ऊब , पावसाळी कुंद गार हवा , झोप कधी लागायची ते समजायचेही नाही .
जाग आली की अगोदर जाणवायचा तो अंगावरच्या दाट गोधडीचा मऊसूत स्पर्ष. आज्जीच्या हाताइतकाच मऊसुत . कुठेतरी असलेल्या फटीतून आत शिरून कानाला जाणवणारी ती ओलसर थंड झुळुक. गोधडी अंगावर अधीकच लपेटून घ्यायचो. चार पाच वाजलेले असायचे तरीही अंधार दाटलेला असायचा.

गोष्ट मोडलेल्या लग्नाची !!!

लेखक स्मिता दत्ता यांनी गुरुवार, 28/02/2019 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसाद आणि वीणा हताश होऊन बसलेले इतकी सगळी तयारी झालेली पत्रिका पण वाटल्या, नातेवाईकांसाठी रुम्स बुक केल्या. लग्न अगदी आठ दिवसांवर आलेलं आणि आता सर्वांना फोन करून सांगायचं येऊ नका लग्न मोडलेय म्हणून! एका सर्वसामान्य कुटुंबाला हा धक्का पचवणं कठीणच होतं. हाच निर्णय घेणे आवश्यक होते पण तरीही मनावर मणभर वजन ठेवल्यासारखं वाटतंय हेच खरं! तनिष्का एमबीए करून व्यवस्थित सेटल झाली तेव्हा कुठल्याशा वेबसाईटवरच लग्नासाठी नाव नोंदणी केली रितसर! कित्येक महिने मग पटलेली स्थळं शॉर्टलिस्ट करायची आणि त्यावर सल्लामसलत करायची, असा त्या कुटुंबाचा कार्यक्रमच झालेला.

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 27/02/2019 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, मराठी भाषा दिन २०१९ च्या निमित्ताने मिपावर आयोजित केलेल्या 'शतशब्दकथा' या मिपावरील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे निकालपत्रक. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. लेखक, वाचक दोघांचाही भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. आकडेवारीतच वर्णन करायचं म्हटलं तर एकूण ६३ कथा आणि १५००+ प्रतिसाद असं करता येईल. पण आकड्यांच्या पलीकडे पाहिलं तर इतके विविध विषय लेखकांनी हाताळले, की वाचकांसाठी ही एक मेजवानीच होती.

वैद्यराज

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 27/02/2019 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
.... एका हिवाळ्यात मी कामानिमित्त मराठवाड्यातील उदगीर येथे गेलो असताना थंडीतापाने आजारी पडलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांनी लगेचच गावातील डॉक्टरला बोलावणे पाठवले. १९५० सालची गोष्ट आहे. त्यावेळेस उदगीरमधे कसले डॉक्टर आणि कसले काय. तेथे एक वैद्यराज होते हेच माझ्यासाठी खूप होते. त्यांनाच सर्वजण डॉक्टर म्हणून हाका मारत. अर्ध्या तासात वैद्यराज आले. वैद्यराज म्हणण्याइतपत काही ते म्हातारे दिसत नव्हते. केस अजूनही काळे होते. तरतरीत नाक व सडपातळ शरीरयष्टी वरून मला तरी ते त्यावेळी तिशीतले वाटले. गावातील परंपरागत चालत आलेली वैद्यकी ते समर्थपणे चालवत होते असे त्यांच्या एकंदरीत अवतारावरून वाटत होते खरे..

ट्युमर - शतशब्द कथा

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 25/02/2019 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
"सगळी तयारी झाली आहे डॉक्टर, हे सिटीचे रिपोर्ट्स आणि त्यानुसार पेशंटच्या डोक्यावर मार्क पण केला आहे" डॉक्टर विनय ख्यातनाम सर्जन डॉक्टर डिसुझाना सांगत होते . स्ट्रेचरवरती झोपवलेल्या पेशंटच्या आजूबाजूला वेगवेगळी मशिन्स ठेवलेली होती त्यातून येणारे बिप्स वातावरणात अजून थोडा ताण निर्माण करत होते. "हम्म, ट्युमर क्रिटिकल ठिकाणी आहे, जराशी चूक पेशंटला कायमचा अधू करू शकते! अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, लेट्स स्टार्ट" रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहात डिसुझा म्हणाले.

स्पर्धेबाहेरची श श क गतानुगतिक

लेखक anandkale यांनी शुक्रवार, 22/02/2019 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार लुटीची पाहणी करीत होता. त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही होता. आत खणणाऱ्या सैनिकाला सांगितले. "इथे खोदु नका, तो बडा पत्थर उचला पायखान्यात लावायला" सैनिकाने शेंदूर लावलेला दगड उखणून काढला. पुढच्या देवळात मौल्यवान वस्तूंची पोती भरण्याचे काम चालले होते. " मिळेल ते सगळे भर पण बूतला हात लावू नका " गोंधळलेल्या पोराने विचारले "अब्बाहुजूर तो बुत पायखान्यात आणि हा ?" " तेल पोतलेला दगड पायखान्यात चांगला बसतो, पाणी ओतले कि सगळे वाहून जाते" "तो बुत सोन्याची खाण आहे. बात सगळीकडे फैलेल कि खान इतका ताकतवर, बाकी सगळी देवळे फोडली पण इथे त्याचे काही चालले नाही.