Skip to main content

कथा

सनकी भाग ५

लेखक शब्दांगी यांनी बुधवार, 15/01/2020 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी परत शिवीन काया फॅशन हाऊसमध्ये गेला. जानं त्याला भागच होत कारण हे एकच प्रोजेक्ट त्याला फाईनान्सशियल क्रायसेस मधून बाहेर काढू शकत होते. पण आज ही चार तास बसून काया त्याला भेटली नव्हती. तो चांगलाच भडकला व रिसेप्शनिस्टला बोलू लागला. शिवीन, “ what the hell is that? आज तर तुमच्या मॅम भेटणार आहेत का मला? नाही तर मला Mr मानेंशी बोलावं लागेल.” रिसेप्शनिस्ट ,“ प्लीज सर तुम्ही बसून घ्या; मी मॅमना फोन करते. सध्या त्या मिटिंगमध्ये आहेत. ”अस म्हणून तिने इंटरकॉमवर फोन केला व शिवीन आल्याची माहिती दिली. शिवीन वाट पाहत होता.

दोसतार - ३३

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 13/01/2020 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
" एहेरे ….. शिक्षकांचे कोणी लाड करतेका? लाड लहान मुलांचे करतात" पम्याने बोलायची संधी बरोब्बर साधली. माझ्या डोळ्यापुढे प्रत्येक विद्यार्थी पुढे येवून शालाप्रमुख सरांचा गालगुच्चा घेवून जातोय असे चित्र येवून गेले. " सांगा सांगा . अजून काही सूचना असतील तर सांगा" सोनसळे सरांची आज्ञा शिरसावंद्य मानत शिक्षक दिन कसा साजरा करायचा याची चर्चा सुरू झाली
मागील दुवा http://misalpav.com/node/45909 शिक्षक दिन साजरा करायचा तेही वेगळ्या पद्धतीने. पण सर शिक्षक दिन का साजरा करायचा?

सनकी भाग ४

लेखक शब्दांगी यांनी रविवार, 12/01/2020 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
वेस्टर्न फॅशन हाऊसची एक टीम मिटिंगसाठी आली होती.मिटिंग कॉफर्न्स हॉल मध्ये सुरू झाली. मिस्टर विल्सन स्मिथ हे टीम लीडर होते व त्याच्या बरोबर आणखीन दोन जण होते. त्यातला एक महाराष्ट्रीयन होता. कायाने त्यांना बसायला सांगीतले व ती म्हणाली काया, “ good afternoon all of you and welcome Mr smith ,what is the project? give us some information about that.” ती अस बोलून खाली बसली. मिस्टर स्मिथ आता उठले व बोलू लागले. मिस्टर स्मिथ,“ good afternoon , we have to launch our brand in India. And your fashion house is best for that. Mr mane explain it well in marathi.

सनकी भाग ३

लेखक शब्दांगी यांनी शनिवार, 11/01/2020 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
शिवीन ठाकूर म्हणजे एक खूप मोठं नाव होत. शिवीन आणि काया दोन ध्रुवच जणू.शिवीन एक मोठ्या बापाचा मुलगा मुंबईतील सगळ्यात मोठया फॅशन हाऊसचा मालक व नावाजलेल्या फॅशन डिझायनरचा मुलगा. त्याच्या वडिलांचे नाव कुणाल ठाकूर त्यांना केटी म्हणून फॅशनच्या दुनियेत ओळखले जायचे. फॅशन हाऊसचे नाव के.टी. फॅशन हाऊस असे होते. शिवीन हा हॅपी गो लकी तरुण होता.

सनकी भाग २

लेखक शब्दांगी यांनी शुक्रवार, 10/01/2020 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
काया जयसिंग हे एक गूढ व्यक्तिमत्त्व. गव्हाळ तरी सावळेपणाची झाक असलेला रंग, गोल चेहरा, पिंगट रंगाचे टपोरे गहिरे डोळे, नाक चाफेकळी , खांद्यापर्यंत रूळणारा स्टेप कट, सडपातळ व सुडौल बांधा, एकूण दिसायला आकर्षक अशी काया. सनकी म्हणून कुप्रसिद्ध असलेली.एका नावाजलेल्या फॅशन हाऊसची मालकीण पण हे नाव ,प्रसिद्धी व यश तिला असच मिळाले नव्हते किंवा ती कोणत्या मोठ्या बापाची मुलगी ही नव्हती तर ती इथपर्यंत तिच्या मेहनतीने पोहोचली होती. काया एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी पण तिला कपड्याचे लहानपणा पासून आकर्षण होते. म्हणून ती बारावी नंतर फॅशन डिझायनिंगकडे वळली.

दोसतार - ३२

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 10/01/2020 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिटेक्टीव्ह घंटाकर्ण बरोबर होता. आम्ही तीघांनीही एकमेकांकडे पाहिले हसलो. हाताची घडी घातली तोंडावर बोट ठेवले. आळी मीळी गुप चिळी करत वर्गाकडे चालू लागलो.
मागील दुवा http://misalpav.com/node/45891 शाळेत कसले ना कसले कार्यक्रम साजरे होतच असतात. त्याला दिन म्हणतात. कधी कसला दिन तर कधी कसली पौर्णिमा कधी कुणाची जयंती . निमीत्त काहिही असो कार्यक्रम ठरलेला असतो. सकाळी गेट जवळच्या मुख्य फलकावर आज काय आहे ते लिहीलेले असते. समजा जयंती वगैरे असेल तर ज्यांची जयंती असेल त्यांचा फोटो, त्याला हार .

अनटायटल टेल्स १

लेखक मकरंद घोडके यांनी गुरुवार, 09/01/2020 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
ते आणि मी म्हणजे तसे एकच! पण भेट व्हायची नाही ..अधे मध्ये एखादा फोन आणि सविस्तर गप्पा . कधी कान उघाडणी तर कधी प्रेमळ काळजी वजा पाठराखण . तसे कोण तुम्ही कुणाचे काहीही असता नसता, ठाऊक नाही, पण एक दुवा असतो. आपला माणूस कुठेतरी आपला विचार करतोय अशी हक्काची गडद सावली तुमच्या वर पडलेली असली कि आतून कसं छान आणि गारगार वाटतं राहतं. मी काम नसतानाही बऱ्याचदा त्यांच्याशी बोलायचो .

सेल्फिश

लेखक प्रमोद पानसे यांनी बुधवार, 08/01/2020 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला वारंवार कल्पना देउन आणी सावध करुनही काहिही फरक पडत नव्हता सुमती !! " आज पुन्हा एकदा ईगलमधे फृटज्युस च्या जागी बिअर आॕर्डर करणाऱ्या सुमतीसमोर मी घसा कोरडा करत होतो. सुमती .. माझ्याच कंपनीमधे ट्रेनी इंजिनियर म्हणुन अपॉईंट झालेली .येउन सात महिने लोटलेले.फ्रेश इंजिनियर होती.विस एकविस वर्षाच्या सुमतीचं जॉईन झाल्यावर एक महिन्यातच माझ्या डिपार्टमेंटला पोस्टींग झालं.आणी तीला प्रॉडक्शन प्लॕनिंगचे धडे देता देता कंपनीच्या वातावरणाचे ,आजुबाजूला वावरणार्या लोकांच्या मेंटलीटीचे धडे देणं गरजेचं वाटू लागलं.

दोसतार - ३१

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 07/01/2020 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
कौरवांच्या चक्रव्युहात अडकावा तसा तो प्रश्नांच्या गराड्यात अडकला होतात. शाळेत नक्की काय झालंय ते त्याला माहीत होते. या सगळ्यातून शाळेत वाघ आला होता. तो पाण्याच्या टाकी च्या आसपास फिरताना कोणीतरी पाहिले होते हे समजले . आमचे चेहरे या वेळेस कोणी पाहिले असते तर त्याला त्यावर भिती आनंद उत्सुकता गम्मत असे सगळे काही नाचताना दिसले असते. मागील दुवा : http://misalpav.com/node/45852 शाळेत वाघ आला होता. हे सगळ्यांना कळाले. पण वाघ शाळेत का आला ते मात्र कळत नव्हते. शाळेतच का आला ? का म्हणजे ? वाघाला जायला कित्तीतरी ठिकाणे आहेत गावात. तो तिकडे का गेला नाही.

बोलती बंद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/01/2020 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे चाळीसगावच्या काकांना फोन करावा, असं मला दोन तीन दिवसांपासून वाटत होतं. असं अचानक आठवण येण्याचं कारणही समजत नव्हतं. आज रविवार. वेळ आहेच आता दुपारी तर करूया फोन असं वाटून फोन लावला. रेकॉर्ड ऐकू आली, ‘या नंबरची सेवा तात्पुरती बंद आहे.’ दोन तीन वेळा प्रयत्न केला. तेच तेच ऐकू यायचं. आधी मराठी मग हिंदी नंतर इंग्रजी. नंबर बंद. करू नंतर म्हणून डोक्यातून विषय बाजूला केला. यालाही दोन तीन दिवस झाले म्हणून पुन्हा एका संध्याकाळी फोन करून पाहिला. आताही नंबर बंदच. बायकोला सांगून ठेवलं, ‘चाळीसगावचा फोन लँडलाईनवरून ट्राय करत रहा.