Skip to main content

कथा

दोसतार- ३६

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/02/2020 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेच्या चालू दिवशी नेहमीच्या गणवेशाच्या ऐवजी इतर वेगळे कपडे घातले की आपण तसेही वेगळे दिसतो. इथे तर दिवस भर मिरवायला मिळणार होते. तयारी करायला बरोब्बर तीन दिवस उरले . मंगळवारी शिक्षक दिन. मागील दुवा : http://misalpav.com/node/46058 मंगळवारची तयारी शनिवारपासूनच चालू झाली. शनिवारी शिक्षकांकडून त्या त्या विषयाची पुस्तके घेणे आणि काय शिकवायचे आहे हे समजून घेणे ही पहिली पायरी. प्रत्येकानेच पार पाडली. मी ऑफ तास घेणार होतो. ऑफ तास म्हनजे कोणी शिक्षक रजेवर असतील किंवा आजारी असतील शाळेत आलेले नसतील त्यांच्या ऐवजी वर्गावर जाऊन बसायचे.

सनकी भाग १०

लेखक शब्दांगी यांनी रविवार, 09/02/2020 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
शिवीन आणि रिचा आज लवकरच घरी गेले. शिवीनने रिचाला तिच्या घरी सोडले व तो घरी गेला. त्याच्या आईने हाताला पट्टी पाहून काय झाले म्हणून विचारले.शिवीनने आईला सगळा वृत्तांत सांगीतला. शिवीनची आई काळजीत पडली. तिने रिचा कशी आहे? तिला तर जास्त लागले नाही ना? मग तू हॉस्पिटलमध्ये का नाही गेलास?डॉक्टरला बोलावू का? पोलीसात तक्रार केली का?अशा अनेक प्रश्नाचा शिवीनवर भडिमार केला. शिवीनने तिला खुर्चीत बसवले व काळजी करण्याचे काही कारण नाही असे म्हणून तिची समजून काढली.हो पोलीसात तक्रार केली आहे. पण गाडीला नंबर प्लेट नव्हती त्या मुळे काही उपयोग नाही झाला.अस त्याने सांगीतले.

सनकी भाग ९

लेखक शब्दांगी यांनी सोमवार, 03/02/2020 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
कायाने सुधीरला रिचाचा काही तरी बंदोबस्त करायचा म्हणून बोलावले होते. काया पीत हॉलमध्ये सोप्यावर बसली होती. सुधीर तिच्या समोर खुर्चीवर बसला होता. काया खुपच जास्त झाली होती. काया बोलू लागली. काया,“ तुला थोडी घे म्हणाल तर नको म्हणतोस,राहू दे नको तर नको.”अस म्हणून तिने तिच्या हातातला ग्लास रिकामा केला. सुधीर, “ दि तू काही तरी काम आहे म्हणून मला बोलवले होतेस आणि हे काय तू पीत बसलीस?”तो नाराजीनेच म्हणाला. काया,“ काम आहे म्हणूनच बोलावले आहे तुला; कामाचा आणि पिण्याचा काय संबंध? बरं ऐक ती रिचा आहे ना ती माझ्या खुप डोक्यात चाललीय. सतत माझ्या शिवीनच्या मागे- मागे फिरते.

दोसतार - ३५

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 30/01/2020 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला येत नसेल त्याने भौतीक शास्त्रातील न्यूटन चा नियम शिकवा म्हणजे तुम्हाला तो नीट समजेल काय सुषम " सुषम चा आणि भौतीक शास्त्राचा कायमचा युद्धाचा पावित्रा असतो हे आम्हीच काय पण बाइंनाही पण माहीत आहे हे आम्हाला आजच कळले. "आणि तू काय शिकवणार आहेस" " मी सातवीच्या वर्गाला समांतर रेषां शिकवणार आहे" एल्प्याच्या या उत्तरावर आम्हीच काय पण तारकुंडे बाईपण अचानक दप्तरात बेडूक दिसल्यासारख्या चमकल्या.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46021 एल्प्या हे असे काही म्हणेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. बाइंसारखेच आम्ही सगळेच चमकलो.

सनकी भाग ८

लेखक शब्दांगी यांनी सोमवार, 27/01/2020 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
कायाच्या फॅशन हाऊस मध्ये कामाला सुरुवात करायचे ठरले. ठरल्या प्रमाणे शिवीन व रिचा 11 वाजता कायाच्या ऑफिस मध्ये हजर होते. काया अजून आली नव्हती पण सुधीरने त्यांचे स्वागत केले व काया पोहचतच आहे असे तो म्हणत होता. तोच काया ऑफिसमध्ये आली. ते चौघे ही कॉफर्न्स हॉलमध्ये गेले कारण कायाने प्रोजेक्टच्या कामासाठी तिच्या ऑफिस मधील ही प्रशस्त जागा निवडली होती. प्रोजेक्ट विषयी सुरवातीची चर्चा झाली. त्यात वेस्टर्न कंपनीला कशा डिजाईन अपेक्षित आहेत तसेच इंडोवेस्टर्न या कॅटेगरीत काय- काय येऊ शकत व सुरवात उमन्स वेअर पासून करावी. अशी अनेक मुद्यांवर चर्चा झाली.

सनकी भाग ७

लेखक शब्दांगी यांनी बुधवार, 22/01/2020 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काया ऑफिस मध्ये गेली तिने फेंट गुलाबी कलरचा शॉर्ट असा वनपीस घातला होता. तो ड्रेस तिला खुलून दिसत होता. ती कॅबिनमध्ये जाऊन बसली ना बसली तो पर्यंत इंटरकॉम फोन वाजला तिने जरा वैतागुणच तो उचलला. रिसेप्शनिस्टने सांगीतले की रिचा सरनाईक मिटिंगसाठी आलेत मॅडम. कायाने तिला पाठव असे सांगीतले. रिचा नॉक करून कायाच्या कॅबिनमध्ये गेली.काया रिचाला नखशिखांत न्याहाळत होती. रिचाने स्काय ब्लू कलरचा शर्ट व नेव्ही ब्लु कलरचा मिनी स्कर्ट घातला होता. तिचे गोरे पाय अगदी उठून दिसत होते. लांब सडक केस गालावर रूळत होते. तिने केलेला लाईट मेकअप तिचा चेहरा आणखिनच खुलवत होता.

दोसतार - ३४

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 22/01/2020 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही सगळे शिक्षक होऊन शाळा चालवणार. वैजुच्या सूचनेचे टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत केले. मस्त कल्पना होती. सगळ्यानाच आवडली. कोणी कोणता तास घ्यायचा याच्या सूचना येवू लागल्या. माधुरी गाण्याचा तास घेणार होती. आपी गणीताचा, सुधीर इंग्रजीचा, अजित इतिहासाचा, महेश भौतीक शास्त्राचा. टम्प्याने तर आपण शाळेची तास संपल्या नंतरची घंटा वाजवणार असल्याचे जाहीर केले. शाळा सुटे पर्यंत आठवी ब चा अर्ग त्या दिवशी शाळा चालवणर असल्याचे सर्व शाळाभर झाले होते.
शिक्षक दिन पुढच्या आठवड्यात होता. मुख्याध्यापक सरांनापण ही कल्पना आवडली.

हॉटेल शिवीभोजन थाळी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 18/01/2020 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटेल शिवीभोजन थाळी मालक: हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं. हॅ हॅ हॅ या या या. बसा बसा बसा. मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस. हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय? मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज.

सनकी भाग ६

लेखक शब्दांगी यांनी शुक्रवार, 17/01/2020 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिवीन कायाने घातलेल्या काँट्रॅक्टच्या अटी मान्य करायला तयार नव्हता. कारण त्या अटी खुपच जाचक व पूर्ण कायाच्या फायद्याच्या होत्या. शिवीन कायाकडे पाहत बोलू लागला. शिवीन,“ it’s very unfair to me. I can’t afford that. काय आहे हे its not joke. पहिली अट १ कोणते ही डिजाईन तुम्ही अप्रुव केल्या शिवाय मी वर पाठवू शकणार नाही पण तुम्ही केलेले डिजाईन मा‍झ्या अप्रुअल शिवाय पाठवणार. मला अमान्य आहे. २ जर मी मध्येच कोणत्याही कारणास्तव प्रोजेक्ट सोडला तर मी प्रोजेक्ट मध्ये लावलेले पैसे बुडणार व तुम्हाला मी वरून दंड म्हणून 15cr द्यायचे.

ज्युनियर सिनियर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/01/2020 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे इथल्या प्रत्येक कथेतला ज्युनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. इथल्या प्रत्येक कथेतला सिनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. म्हणून तर त्यांच्या वागण्याबोलण्याच्या नाना तर्हाक. विविध जीवननिष्ठा असलेल्या ज्युनियर लोकांची किती नावं ठेवायची. म्हणून प्रातिनिधीक एक ज्युनियर. तसेच सिनियरांचेही. असाच अजून एक ज्युनियर आपल्या साहित्यकुंज रसिक मंडळात नेहमीच जात असतो. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार बसायची बैठक सजवलेली असते. हॉलची समोरची जागा म्हणजे व्यासपीठ. इथे गाद्या टाकलेल्या असतात. गाद्यांच्या समोर सतरंज्या अंथरलेल्या असतात. सतरंजीनंतर उघड्या फरश्या.