Skip to main content

कथा

Kingआख्यान 2: फायरस्टार्टर

लेखक शा वि कु यांनी सोमवार, 30/12/2019 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
Kingआख्यान 1:- डोलोरस क्लेबोर्न टेलिकायनेसीस, टेलीपथी किंगच्या आवडत्या कथा आहेत. किंगची पहिली प्रकाशित कादंबरी "कॅरी" (Carrie- 1974) पण एका टेलिकायनेटिक शक्ती असणाऱ्या तरुण मुलीची गोष्ट होती. अपरिमित जीवितहानी करण्याइतपत शक्ती असलेली, पण बुजरी आणि एकलकोंडी असणारी एक teenage मुलगी, धर्मांध आणि वेडसर असलेली तिची आई, आणि याउप्पर कडी करायला तिला त्रास द्यायला टपलेल्या मुलामुलींचं टोळकं. या सगळ्यांच्या मिलापातून किंग विनाशाचं एक थरारक आणि तितकंच ह्रदयद्रावक तांडव रचतो.

सोमा टक्रीकर -- एका कालवश मर्मस्पर्श

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 27/12/2019 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
(बॉल्टिमोर मराठी मंडळाच्या दिवाळी २०१९ अंकात मूळ प्रकाशित अद्भुत-भविष्य-रम्य कथा, जालावर अन्यत्र सहप्रकाशित) … (T)ouch … gives us our sense of 'reality'… rainbows, reflections in looking glasses, and so on (cannot be touched) … our whole conception of what exists outside us is based on the sense of touch. -- Bertrand Russell in ABC of Relativity ------- बॉल्टिमोर, सोमवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०३५. मागच्या शनिवारी, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सोमा टक्रीकर विलीन झाले, परंतु जालविश्वात या बातमीचे पाच लाखापेक्षा कमी पुनःस्पर्श झाले.

दोसतार-३०

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 25/12/2019 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाचे दप्तर भरून झाले. डबा घेऊन घरातून बाहेर पडलो. वाटेत योग्या सहावीतल्या तीन चार पोरांबरोबर चालताना दिसला . गणवेश आमच्याच शळेचे होते. असा एखादा गणवेश घालून चाललेला पोरांचा घोळका दिसला ना की गणवेशामुळे नाव माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. आपण आपसूकच त्या घोळक्यात सामील केले जातो. कधी होऊन जातो ते कळत पण नाही मागील दुवा : http://misalpav.com/node/45845 सहावीतली मुले उंचीने एकदम लहान . त्यांच्यासोबत चालताना योग्याला काही ऐकायचे असेल तर वाकून चालावे लागते.

असीम आणि मीरा

लेखक लाल गेंडा यांनी मंगळवार, 24/12/2019 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न लागलं आणि असीम उठला. त्याला आधीपासूनच लग्नाला यायचं नव्हतं पण ज्याचं लग्न होत तो त्याचा जेष्ठ सहकारी होता. असीमचा मुख्य उद्देश पुढे घोडसाळला जाणे होता. अनासायासे लग्न गुरुवारी होतं, म्हणून मग त्याने सुट्टीच टाकली होती. जेवायला जाताना त्याला मीरा दिसली. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. तिनेसुद्धा असिमसारखा वेष घातला होता, जीन्स आणि त्याला साजेसं काहीतरी. असिमला थोडं ते अजीब वाटलं पण त्याने फार विचार नाही केला. त्याला हे सगळं सम्पवून पुढे जायचं होतं. त्याच्या बरोबरच्या लोकांसोबत असीम जेवला, जेवण काही फार फाडु नव्हतं पण पोट भरलं.

दोसतार - २९

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 24/12/2019 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
सायकल एष्टी बस इतकी लांब झाली होती. इतकी की आळीतल्या रामाच्या देवापुढच्या वळणावरून सायकल वळवायला शुक शुक करत मधे येणार्‍या तीन चार जणांना बाजूला करण्यासाठी त्याला सायकलवरून खालीच उतरावे लागले मागील दुवा http://misalpav.com/node/45789 त्या लांबलचक बांबुचे एक टोक सायकलच्या दांडीवरून बरेच पुढे आलेले होते. हँडल वळवताच येत नव्हते. रहदारी साम्भाळत ,थोडे मागे पुढे करणे सायकल उचलून वळवणे अशी सरकस करत करत सायकल वळवत होता. त्यातच मधे कोणी आले की ही सरकस आणि तिथली रहदारी दोनहीही एकमेकात अडकायचे.

खोळ

लेखक ए ए वाघमारे यांनी रविवार, 22/12/2019 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
‘एकाच जागी ठोंब्यासारखं बसून राहणं म्हणजे काय, हे आपल्याशिवाय अधिक चांगलं कोण सांगणार?’, रोजसारखा आजही भुकोबाच्या मनात हाच विचार आला. उन्हं कलली. सायंकाळ झाली. पण भुकोबाच्या घरात सांजवात लावायला अजून कोणी आलं नव्हतं. वारा सुटला तसं भुकोबा ज्या कडुनिंबाच्या खाली बसला होता, त्याची पानं सळसळली. काही गळून तरंगत खाली आली. डोक्यावरच्या छोट्याश्या कळसावर त्यातली एक दोन पानं पडल्याचा आवाज खसखसला. ‘पानगळ अजून सुरूच आहे. अशा किती पानगळी झाल्या आतापर्यंत? कुणी मोजल्या? या एवढ्याश्या घरात हा इतकुसा झरोका. यातनं काय कळणार?

लघुकथा – नजर

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 17/12/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
उमा आज आपल्या मैत्रिणीच्या घरी(पद्मिनी) कामानिमित्त कडे आली होती. पद्मिनीची आई शांता काकू उमाच्या सख्या नसल्या तरी जुन्या भावकीतील नातेवाईक होत्या. पद्मिनी वर्ग मैत्रिण असल्यामुळे उमेचे तिच्या घरी जाणे येणे होत असे. पद्मिनी सोबत तिच्या खोलीत बोलत असताना सहजच निरागस पणे सांगीतले की, तिला स्थळ बघायला घरच्यांनी सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात तिला बघायला पाहुणे येणार आहेत असे सुद्धा सांगीतले. चहा-पाणी केल्यानंतर उमा घरी गेली. उमाला पाहुणे बघायला येण्याचा दिवस जसा जवळ येत होता तसा उमेच्या मनात उत्सुकता, भीती आणि डोळ्यात नवीन संसाराची स्वप्न तरळत होती.

"ती" काळरात्र !

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शनिवार, 14/12/2019 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या चिमुलवाड्यावरील बाळा हा तसा गडी माणूस. आजकाल वेगवेगळ्या घरांत वेगवेगळ्या "कामवाल्या" असतात ती सिस्टिम आमच्या वाड्यावर अजूनही आलेली नाही. धुणी-भांडी करायला शांताबाई आणि बाकीची जी म्हणून काही कामे असतील ती करायला हा बाळ्या. एकंदरीत स्वयंपाकघरात बाळ्याचे काही काम नसे व उरलेल्या घरात शांताबाईचे ! तर एवढ्या घरची एवढी कामे करून बाळ्या बाकड्यावर बसून विड्या फुकत असे. बाकी आम्ही लहान असताना गोविंद मामा आम्हाला कानातून आणि नाकातून विडीचा धूर काढून दाखवायचे ! "डोळ्यातल्यानूय काडटा हा पय !" असेही ते आम्हाला सांगायचे पण कित्तीतरी वेळा बारकाईने पाहून सुद्धा डोळ्यातला धूर काही आम्हाला दिसला नाही.

आरे जंगलातली हिरकणी

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 13/12/2019 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
परवा प्रसाद ओक चा हिरकणी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रत्येकाच्या कामाची छोटीशी झलक पाहून चित्रपट चांगलाच असेल अस वाटल. हिरकणी हे नाव आपल्या कानावर पडत तेव्हा पटकन समोर एका लुगडं नेसलेल्या कपाळावर चंद्रकोर असणाऱ्या रणरागिणी आईच चित्र समोर उभा राहत जी आपल्या बाळासाठी सह्याद्रीचा कातळ कडा उतरून बाळाला दूध पाजण्यासाठी गेली होती.

"पोर"खेळ

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी बुधवार, 11/12/2019 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गावांची शहरे झाली, घरांच्या इमारती झाल्या, कौले जाऊन स्लॅब आला आणि जग कुठच्या कुठे गेले. पण, काहीही बदलो, चिमुलवाडा आणि त्यातली माणसं मात्र जशीच्या तशी उरलीयेत. दारातल्या गावठी कुत्र्याची चेन आता लॅब्राडोरच्या गळ्यात, तर माऊ, काळूच्या जागी पर्शियन मांजरांनी शहरात ठाण मांडले आहे. आता हे जुन्या गावचे सगळे मोती, टॉम वा माऊ, काळू चिमुलवाड्याचे आश्रित झालेत! आजूबाजूचे गावकरी आता शहरवासी झाले असले, तरी आमच्या चिमुलवाड्यावर घरे आणि देवळे यांखेरीज आणखी कुठलीही वास्तू कोणास दृष्टी पडायची नाही. कोणा बिल्डर लोकांची अजून चिमुलवाड्यावर नजर पडली नाही ही त्या देवकीकृष्णाची मेहेरबानीच म्हणावी लागेल!