Skip to main content

कथा

दोसतार -२७

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 06/12/2019 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/45778
ती दोघेही त्यांच्या त्यांच्या मित्रमैत्रीणीना सांगणार, ती त्यांच्या मित्रमैत्रीणीना , त्या त्यांच्या, ती त्यांच्या. असे करताना कोणाच्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर तेही ऐकणार, आणि ते त्यांच्या त्यांच्या गावी गेल्यावर तिथे सांगणार. ते ज्याना सांगणार ते इतरांना सांगणार. हळू हळू हे भारतभर होणार. बातम्या अशाच पसरत असतील. ….
रेडीओवरच्या बातम्या सगळेजण एकाच वेळेस ऐकतात . त्यांना पसरवायची गरज नसते. पण एकाला समजलेली बातमी तो दुसर्‍या दोघांना सांगतो. दुसरे दोघे आणखी दोघा दोघांना सांगतात.

दोसतार - २६

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 05/12/2019 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/45761#comment-1054834 पावसाची ना कशी गम्मत असते. अगोदर येतो तो त्याच्या येण्याची जहीरात करत. दवंडी पिटत. एकदम गडगडाट करत विजा चमकवत. तडाम तडाम ताशा वाजवत. आपल्याला डोळे झाकून कोणीतरी भॉ करावे तसा. अचानक गाठतो. रस्त्यावरून चालणाराला भिजवून टाकतो. शिवाजी महाराजानी कारतालब खानाला खिंडीत गाठला तसा. पावसाळा तसा सगळाच आवडतो. पण खास आवडतो तो पहिला पाऊस. पाटणची आज्जी तर मुद्दाम या पहिल्या पावसाची वाट पहायची. पहिला पाऊस आला की ती एकदम खुशीत यायची. खरे तर तीला पावसात भिजायचे असे.

संदीपची हुषारी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/12/2019 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतनत हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला. "मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत", सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते. पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे.

दोसतार - २५

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/11/2019 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दगडावर पडल्यावर पाण्याचा कसलासा खिसफीस खिसफीस आवाज येत होता . आत्तापर्यंत पाणी किती गार आहे ते समजले होते त्यामुळे पाण्याच्या धारेत ओंजळ धरल्यावर अगोदर बसला होता तसा शॉक बसला नाही. ओंजळीतले ते पाणी तोंडात घेतले. आहाहाहा... जगातल्या कुठल्याच सरबताला त्या पाण्याची चव आली नसती. जादुची चव होती. प्रत्येकजण ते पाणी प्याला. ताजेतवाने की काय तसे झालो. तेथून पाय निघत नव्हता पण आता आम्हाला यवतेश्वरला पण पोहोचायचे होते.. मागील दुवा: http://misalpav.com/node/45748 खरे तर अजून तेथे थांबावेसे वाटत होते.

Kingआख्यान:- डोलोरस क्लेबोर्न

लेखक शा वि कु यांनी शुक्रवार, 29/11/2019 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
नववीत गेलो आणि वाचनासाठी नवी दारं खुली झाली. वडीलांच्या अँड्रॉइड फोनवर पीडीएफ फाइल्स डाउनलोड करून मून रीडर किंवा adob reader ऍप वर वाचणे. यातून मोठया कटकटी दूर झाल्या, लायब्ररीत चकरा मारायला नकोत, पैसे देऊन नवी पुस्तकं पण घ्यायला नकोत. आणि पुस्तकांचा तर नुसता महापूरच. जवळजवल सगळी प्रसिद्ध पुस्तकं फुकट उपलब्ध.याआधी घरातली वाचलेलीच पुस्तकं परत परत वाचायची असा प्रकार होता. आता मात्र जगभरातल्या सगळ्या पुस्तकांचा खुल्ला acces होता ! मग सॉंग ऑफ आईस अँड फायर झालं. ते आजपर्यँत हॅरी पॉटरच्या पुढे न गेलेल्या माझ्यासाठी फारच भारी अनि रोमांचक होतं. त्याच्या धुंदीत नववी संपली.

दोसतार - २४

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 26/11/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44978
चालत सुटलो तर शंका समाधान होऊन खरा धबधबा दिसेल या विचाराने महेश पुढे चालायला लागला. अव्याचा नाईलाज झाला. त्याला त्याची शंका सोडवेल असा कोणीच दिसेना. अर्थात त्याने काही फारसे बिघडणार नव्हते. अव्याला दिवसभरात पुन्हा एखादी नवी न सुटणारी शंका सुचेल आणि ती कोणीतरी सोडवेल याची खात्री होती.
धबधबा दिसणार या विचारानेच सगळे पुन्हा ताजेतवाने झाले. गेलेला चा दम परत आला . मलूल झालेल्या फुग्यात पुन्हा हवा भरल्यावर दिसावा तसे आमचे चेहरे पुन्हा चमकू लागले.

सायकलच्या आठवणी

लेखक लाल गेंडा यांनी मंगळवार, 26/11/2019 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका गल्लीतून पोरांचा घोळका सायकलींवरून बाहेर पडला, त्यांना बघून मी थांबलो. पुढच्या सिग्नलपर्यंत त्या पोरांनी रस्ता अडवला होता. मग ती परत एका गल्लीत घुसली. बहुतेक एका क्लासवरून दुसऱ्या क्लासला जात असावी. पण त्या पोरांमुळे माझ्या सायकलीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी आणि माझी सायकल 'एक दिल एक जान' होतो तेव्हा. शेजारच्या मित्राकडे, म्हणजे दोन इमारतीसोडून राहणाऱ्या मित्राकडे जायला मला बुडाखाली सायकल लागायची. आई बाबा वैतागायचे कधीतरी पण लक्ष नाही द्यायचे. इयत्ता पहिलीच्या शेवटी माझी सायकल आली. आठशे ब्याऐंशी रुपयांची.

दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/11/2019 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा ------------------------------------------- १}जान्हवी चा मृत्यू व हुस्न्या खाटीक * दिलीप चित्रे बार मध्ये बसला होता समोर हुसेन खाटीक त्याचा जुना शाळेतला मित्र होता शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला भाय कितना दिन मातंग मनायेगा तू ? जान्हवी भाभी थोडी ना वापस आने वाली है ?

प्रेम 2

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 15/11/2019 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम 1 त्याला जाग आली तेव्हा त्याच्या गावात पोचलापण होता. बर्याच वर्षांनी तो घरी परतला होता. तस त्याच कोणाशी भांडण वगैरे झालं नव्हतं, परंतु त्याला दूर दूर फिरायची, नवं नवी आकाश धुंडाळायची इच्छा होती. बाबांनी त्याला कधीच थांबवलं नाही, उलट त्याला मदतच केली. एवढं मोठं कुटुंब बाबा कस सांभाळतात तेच जाणे. हा विचार संपतो आहे तोच समोरून त्याच्या मोठ्या भावांपैकी एक येताना दिसला. आज त्याला एकदम बाबांनाच भेटायची इच्छा होती, त्याने त्या भावाला हात केला आणि नंतर भेटतो म्हणून सांगितलं. गावात आल्यावर असे सगळे भेटणार, त्याला अंदाज होताच.

फ्युएल, सिग्नेचर आणि नरकासुराचा वध

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 08/11/2019 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
(सत्य घटनेवर आधारित) तारीख : 2 नोव्हेंबर माणसं : एकूण आठ अवस्था : प्रचंड दमलेली व्यवस्था : एक क्वार्टर फ्युएल, दोन बाटल्या सिग्नेचर तयारी : वेफर्स, शेंगदाणे, थोडसं चिकन, थोडे मासे, (गरीब शाकाहारी माणसांसाठी) थोडंस पनीर, चार ग्लास, कोल्ड्रिंक्स वेळ : रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिटे अंक 1 : सुरुवात एका ओळीत ठेवलेले चार ग्लास एकात 10 मिली आणि दुसर्यात 30 मिली फ्युएल तिसर्यात आणि चौथ्यात 30 मिली सिग्नेचर प्रत्येकी कोल्ड्रिंक्स स्वादानुसार "" चांगभलं "" चर्चा : दमलेल्या आई बापाची कहाणी अंक 2 : दुसरं वळण ( सेकंड राउंड) 20 मिली फ्युएल बाकी आणि सिग्नेचर अर्धा खंबा डाऊन चर्चा पुढे चालू .......