मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

शल्याचे धुम्रकांड !

चाफा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये. तरी आम्ही बारके सारके योध्दे आहोत मदतीला. त्याचे अखंड धुम्रकांड फ़क्त तेजुच्या घरी किंवा तेजु हजर असताना तीही संदेश आणि तन्मय सह असेल तेंव्हा बंद असते. त्यालाही एक कारण आहे. एकदा अशीच आम्हा सगळ्यांची एकत्र मैफ़ील आटोपल्यावर एक दोन दिवसानी तन्मय म्हणजे तेजुचा मुलगा एकटाच चित्र काढत होता.

प्यार किये जा

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेमाच्या व्याख्या आत्तापर्यंत खूप खूप केल्या गेल्या असतील.जर एखाद्या शिघ्र कवीला विचारल तर तो तितक्याच शिघ्रपणे उत्तर देइल, ' प्रेमभंग म्हणजेच प्रेम'.जर कोणा विज्ञान शिक्षकाला विचारल तर तो प्रेमाचे गूणधर्म, रचना, उप-युक्तता यावर तासाची बेल वाजेपर्यंत व्याख्यान देइल.जर कोणा मध्यमवर्गीय (अर्थातच व्ही आर एस वाल्या) मराठी माणसाला विचारल तर तो म्हणेल दर साल दर शेकडा ८ टक्के दराने वाढते तेच खरे प्रेम. जर कोणा चित्रपट कलाकाराला विचारल तर तो म्हणेल ' दर वर्षी जे बदलते (म्हणजे प्रेम, प्रेयसी नव्हे) तेच प्रेम होय'.

फाडून टाक डिक्शनरी

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अण्णांचे इंग्रजी आणि गणित हे दोन विषय एकदम पक्के होते.आईचे सर्व घरगुती व्यवहाराचे हिशेब ते तोंडीच करत.२ ते ३० पर्यन्तचे पाढे,पावकी निमकी,पाउणकी ,सवायकी,दीडकीचे पाढे तोंडपाठ असल्याने गुणाकार,भागाकार,बेरीज आणि वजाबाकी हातचा मळ असायचा.

चष्मा !

चाफा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता हे सुध्दा तुम्ही चष्म्यासकट वाचत असाल तर माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे आहेत. गेले कित्येक दिवस या चष्म्याने मला नकोसे करुन टाकलेय. रात्री एकतर झोपच लागत नाही नाहीतर स्वप्नात चष्मा येउन मला जाग येते. काम करताना उगीचच नजर अधु झाल्यासारखी वाटते. समोर कुणी चष्मा लाउन बसलेलं असेल तर माझं लक्ष कामातुन निघुन तिकडे जातं आणि मग झालेल्या चुका शोधताना डोळ्यांच्या मदतीला चष्मा नसतो. मुळात या चष्मा प्रकरणाचा शोध कुणी लावला? जगातल्या नक्की कोणत्या व्यक्तीला `जगातला पहीला चष्मिष्ट' अशी प्रसिध्दी मिळाली?

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे. ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत. परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो. मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात

"मेल्यावर जीवाचं काय होतं?"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी मेहूणी हेमा माझ्या पत्नी पेक्षा तशी बरीच वयाने लहान.गेले कित्येक वर्ष ती आपल्या नवर्‍याबरोबर इंग्लंडला एडिंबरा इथे राहाते.आता ती आजी झाली आहे तिची नातच पाच वर्षाची झाली आहे. ह्या गणपतिच्या सणाच्या दिवसात ती तिच्या नातीला घेऊन आमच्याकडे महिनाभर राहायला आली होती.तिच्या नातीला गणपती उत्सव कसा साजरा करतात हे तिला दाखवायचं होतं. एक दिवशी बोलता बोलता आमचा विषय निघाला की, "मेल्यावर जीवाचं काय होतं?" हेमाला गेल्या वर्षाचा एक जुना प्रसंग आठवला.ती म्हणाली, "मला काय वाटतं आणि त्यावेळी काय घडलं ते तुम्हाला आठवून आठवून सांगते." प्रस्तावना करताना ती म्हणाली, "मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह

दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच व्होयां(दुखतंना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अण्णांना त्यांच्या आयुष्यात दोनदा स्ट्रोक आला.एकदा त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि नंतर दहा वर्षानंतर,म्हणजे पन्नासाव्या वर्षी.पहिल्या खेपेला ते लवकरच बरे झाले.एक तर ते तरूण होते,आणि स्ट्रोक त्यामानाने माईल्ड होता.त्यांची डावी बाजू पर्‍यालेसीसमुळे निकामी झाली होती.पण लवकरच बरे होवून ते कामावर जावू लागले होते. कामावर जॉईन होण्यापुर्वी त्यांची मेडिकल टेस्ट घेतली गेली.त्यांच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टरने त्यांना पेन उचलून उघडून द्यायला सांगीतलं .ते त्यांनी केलं पण देतांना उलट करून न देता पेनची बाजू डॉक्टरच्या हातात दिली.त्यामुळे त्यांचं फिझीकल आणि मेंटल काम कोऑर्डिनेट होत नाही असं अनमान का

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

घाशीराम कोतवाल १.२ ·
लेखनविषय:
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा.... पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून. काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते.

"आई मी असं पुन्हा करणार नाही गं!"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
देसायांचा नातू तसा उनाड होता.पण तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं.