शल्याचे धुम्रकांड !
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about शल्याचे धुम्रकांड !
- 14 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये. तरी आम्ही बारके सारके योध्दे आहोत मदतीला. त्याचे अखंड धुम्रकांड फ़क्त तेजुच्या घरी किंवा तेजु हजर असताना तीही संदेश आणि तन्मय सह असेल तेंव्हा बंद असते. त्यालाही एक कारण आहे.
एकदा अशीच आम्हा सगळ्यांची एकत्र मैफ़ील आटोपल्यावर एक दोन दिवसानी तन्मय म्हणजे तेजुचा मुलगा एकटाच चित्र काढत होता.