आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत.
"आम्हाला पाहून तुम्ही समजला असालच"
असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला,
"हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे."
हे ऐकून मी म्हणालो,
"बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं म