मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

श्रेष्टतम मैत्री.

श्रीकृष्ण सामंत ·
"मला वाटतं खर्‍या मैत्रीमधे फक्त दोघांमधला विश्वास आणि लगाव ह्यांच्या पेक्षा काही तरी जास्त असतं." पुरूषोत्तम आणि मी एकाच गावात वाढलो.शाळेत एकत्र शिकलो.हायस्कूलची परिक्षा पास झाल्यावर पुढचं शिक्षण घ्यायला शहरात आलो. मला आठवतं आमच्या सर्व मित्रमंडळीत शरद आणि पुरुषोत्तम यांची पहिल्यापासून गाढी दोस्ती होती. अलिकडे मी सुट्टीत गावाला गेलो होतो. पुरुषोत्तमची आणि माझी खूप दिवसानी भेट झाली.

आठवणींची निर्मिती.

श्रीकृष्ण सामंत ·
आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली, "काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?" मी म्हणालो, "त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय." मला म्हणाली, "आज आमच्या घरी "पॉटलक" आहे." "म्हणजे ग काय?" ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते.

"तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली."

श्रीकृष्ण सामंत ·
आज मी गुरूनाथला विचारलं, "तुझी ती गांधी टोपी,किंवा सफेद टोपी म्हणूया ती वापरायचं तू केव्हा पासून सोडून दिलंस?" त्याच्या त्या सफेद टोपीची "ष्टोरी" माझ्या अजून लक्षात आहे हे समजल्यावर गुरूनाथ हंसायला लागला. "अरे तू एव्हडा हंसतोस का?" असं मी त्याला म्हणालो. "ती टोपी आणि मी हंसतो कां?

"आनंदी आनंद गडे!"

श्रीकृष्ण सामंत ·
आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत. "आम्हाला पाहून तुम्ही समजला असालच" असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला, "हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्‍या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे." हे ऐकून मी म्हणालो, "बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं म

"आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला"

श्रीकृष्ण सामंत ·
त्यादिवशी मी दादरला एका मित्राकडे गेलो होतो.घरी परत येताना दादर स्टेशन जवळच्या दादर बुक डेपोत जाऊन नवीन पुस्तकं चाळत होतो.