`विठ्या, आरं माजी काठी खंय आसा?'... सकाळीसकाळी `मॊर्निंग वॊकाक' निघालेल्या सदुनानानं मुलाला हाळी देत विचारलं आणि विठ्यानं हांतरुणातनंच `ऊं' करत कूस बदलली.
विठ्या म्हन्जे, सदुनानाचं रत्नं... गाववाले त्याला `नानाची अवलाद' म्हणायला लागले, तेव्हापास्नं सदुनानाही त्याला `विठ्या' म्हणायला लागला होता. मुलाला येताजाता हाक मारताना तरी तोंडात देवाचं नाव यावं, म्हणून सदुनानानं त्याचं नाव `विठ्ठल' ठेवलं होतं...
तो लहान होता, तेव्हा त्याच्या मागनं पळताना सदुनानाची तारांबळ उडायची...
`विठ्ठला, असं वागू नुको रे... विठ्ठला, शानपण कवा येनार रे माज्या सोन्या'...