मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

`शिक्षणाच्या आयशीचो... ...

दिनेश५७ ·
`विठ्या, आरं माजी काठी खंय आसा?'... सकाळीसकाळी `मॊर्निंग वॊकाक' निघालेल्या सदुनानानं मुलाला हाळी देत विचारलं आणि विठ्यानं हांतरुणातनंच `ऊं' करत कूस बदलली. विठ्या म्हन्जे, सदुनानाचं रत्नं... गाववाले त्याला `नानाची अवलाद' म्हणायला लागले, तेव्हापास्नं सदुनानाही त्याला `विठ्या' म्हणायला लागला होता. मुलाला येताजाता हाक मारताना तरी तोंडात देवाचं नाव यावं, म्हणून सदुनानानं त्याचं नाव `विठ्ठल' ठेवलं होतं... तो लहान होता, तेव्हा त्याच्या मागनं पळताना सदुनानाची तारांबळ उडायची... `विठ्ठला, असं वागू नुको रे... विठ्ठला, शानपण कवा येनार रे माज्या सोन्या'...

फक्त तूझ्या बछडीसाठी...

sneharani ·
प्रिय बाबा, आज डोळ्यात अश्रू... मुलीला वाढवताना होणार्‍या कष्टांमूळे थकलास का? म्हणून डोळे भरुन आले का? खरच आजच वाटलं, आज आई असती तर... बाबा, मी जन्माला आले अन् आई गेली, तुझ तर सर्वस्वच हरपल.. मग आपल्या जगात आपण दोघचं तू अन् मी... बाबा तू कधी शिकवलच नाहीस तूला 'तुम्ही' म्हणायला आज ही ये जा करते तूला ही तुझी बछडी, इतक प्रेम दिलयस की आईची आठवण कधी मनाला शिवत सुध्दा नाही... जगायच कस हे तु शिकवलसं, अन् आज ही शिकवत आहेस.. आठवतय का, तूला तुझ्या वाढदिवसाची तारीख विचारत होते किती छान हसलास.. कशाला गं बेटा.. अस काय बाबा सांग ना रे.. माझे हे बोबडे बोल आज ही आठवतायेत... पुढच्याच महिन्यात होता वाढदिव

विनोदी कथा: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई !!!

निमिष सोनार ·
स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई मुंबई. शनिवारची दुपार. मरीन ड्राईव्ह जवळच्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये दुपारचे जेवण सुरू होते. रामनाथन यांना जास्त भुक नसल्याने ते फक्त आज इडली सांबार खात होते. कुळकर्णी बाई चपाती भाजी खात होत्या. तर गुप्ताजी हिशेबात मग्न होते. त्यांना जेवायची सवड नव्हती. राजू शिपाई बाहेर बाकड्यावर बसून धूम मचाले हे गाणे ऐकत होता. बॉस विरेंद्र शाह जेवण आटोपून फोनवर काहितरी बोलत होते. अचानक ...धडाम... धुम्म .. धस्स!! असा अवाज आला, ऑफिसची खिडकी फुटली, खिडकीतून एक जाळी आली, आणि त्या जाळीने रामनाथन ची ईडली ओढली आणि बघता बघता ईडली खिडली बाहेर खेचली गेली.

कापूसकोंड्याची गोष्ट

मूखदूर्बळ ·
आज मला शलाकाची प्रकर्षाने आठवण येतेय. आज जर ती माझ्याबरोबर असती तर कदाचित आम्ही आज सर्व एकत्र असतो. आम्ही म्हणजे मी, शलाका आणि आमच पिल्लू अक्षत. पण तिला खूप मोठ व्हायच होत.उंच उंच उडायच होत. माझ्या सारख्या 'सामान्य वकूबाच्या माणसाबरोबर'.... 'मी सामान्य वकूबाचा माणूस' हे तीने मला कित्येकदा ऐकवल होत. आहेच मी सामान्य, नाहीये मला उडण्याची जीद्द. पण म्हणून मी जगायला, संसाराला नालायक होतो का? कदाचित हो. नाहीतर आज मी असा एकटा नसतो. _________________________________________________ "बाबा गोष्ट सांग" अक्षत आज सकाळपासून मागे लागलाय. बिछान्यात पडून पडून कंटाळलाय बिचारा. दिवस भर एकटाच असतो.

या चाफ्याचं काय करू ?

विशाल कुलकर्णी ·
(आमची प्रेरणा - एक प्लान.... खुनाचा : http://www.maayboli.com/node/12190 ) "च्यायला विशल्या, पण जाम तंतरली होती रे माझी. सॉलीड घाबरलो होतो. ऐनवेळी माझ्यातल्या रहस्यकथा लेखकाने हात दिला म्हणून थोडा सावरलो. त्यात चाफ्याच्या ' त्या कॉलने' कृपा केली आणि मी कसंबसं धीर एकवटून तो फटका मारला." हातातला कॉफीचा कप खाली ठेवत कौतुक स्वतःशीच हसला आणि मी खुसखुसायला लागलो. "हसा लेको, तुमचं काय जातय हसायला? एक जण काहीतरी प्लान करतो, दुसरा नशिबानं त्यातुन वाचतो आणि मधल्या मध्ये प्लान एक्झिक्युट करणार्‍या माझा मात्र बळी. कौत्या, साल्या हाडं आहेत का काय लेका तुझी? अजुन जबडा दुखतोय माझा.

जे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं........

भानस ·
गेला महिनाभर नीलिमा हळूहळू परंतु पद्धतशीर चाललेला प्रयत्न पाहत होती. पहिले काही दिवस तिला काहीतरी वेगळे आहे असे जाणवले असले तरी, छे! उगाच शंका घेते आहेस. असे स्वतःलाच ती सांगत होती. कालच्या घटनेने तर स्पष्ट दिसलेच. तातडीने यावर बोलायला हवेय हे कळतही होते पण कसे हे समजत नव्हते. नेहाशी आज मनमोकळे बोलून पाहावे, कदाचित ती मार्ग सुचवील म्हणून ती तिच्याकडे निघाली होती. " अग, किती उशीर? मला वाटले आता येतच नाहीस. " नेहाने नेहमीप्रमाणे गोंधळ सुरू केला. " काय बाईसाहेब, फारच गंभीर दिसता आहात. कोणी प्रपोज केलेय का? घरी सगळे ठीक आहे ना? तू आजारी तर दिसत नाहीस. चेहरा का कोमेजला आहे?

एक कथा

रामदास ·
आता आपण ज्या नदीला तापी म्हणतो ती नदी तेव्हा कधीतरी तपस्विनी म्हणून ओळखली जायची. म्हणजे सांगायचं एव्हढंच की कथा ऐतीहासीक आहे पण या कथेत युध्द नसल्यामुळे इतिहासात या कथेला जागा मिळाले नाही. पण माणसांच्या मनातून विसरली गेली नसल्यामुळे एका मनातून दुसर्‍या मनात झिरपत गेली. मानवी मनाचा इतिहास अशा कुठल्या कुठल्या कथांमध्ये असतो पण आपण मात्र पाठ करतो जन्म मरण आणि युध्दाच्या सनावळ्या. एका प्राचीन पर्वतराजीतून उगम पावणार्‍या या नदीच्या सुपीक खोर्‍यामध्ये छोटी छोटी पण समृध्द नगरं वसली होती. शेती करणारी प्रजा आणि त्यांची काळजी वाहणारे राजे होते. ही गोष्ट आहे अशाच एका राजाच्या राज्याची. राजाचं नाव आता प्र