मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

ती

बिपिन कार्यकर्ते ·
अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच. तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची...

आटपाट नगर होतं...

ऋषिकेश ·
आटपाट नगर होतं. अतिशय समृद्ध नगर. तिथे चहुकडून लोक येत असत. त्या नगरीत कधी कोणाला काम मिळालं नाहि असं झालंच नाहि. कष्टकरीच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी सगळ्यांची ती पंढरीच होती म्हणा ना! तर ही गोष्ट आहे एका चंदूची. चंदू लहानपणापासूनच हुशार. उत्तम शिक्षण घेतलेलं. नोकरीसाठी तो ह्या समृद्ध नगरीत आलेला. अबब! केवढ्या उंच इमारती, केवढा झगमगाट केवढी गर्दी म्हणता म्हणत तो त्या गर्दीचा भाग कधी झाला त्यालाही कळलं नाहि. त्या शहरानेही त्याला कवेत घेतलं होतं. एक दिवशी त्याच्या मित्राने विचारलं काय रे संध्याकाळच्या वेळेत टॅक्सी चालवणार का? उत्तम शिक्षण असलं तरी अजून पैसा मिळाला तर हवाच होता.

आता तुझी पाळी

JAGOMOHANPYARE ·
'चला, कणकवली. कणकवलीवाले उतरून घ्या. गाडी दहा मिनिटे थांबेल.' कंडक्टरच्या आवाजाने तंद्रीतून जागा झालो. घड्याळ पाहिलं-दुपारचे दोन. हात वर करुन एक आळस दिला. अजून चार तासात कोल्हापूर. तिथून सांगली दोन तास. तिथून औदुंबरला जायला असा किती वेळ लागतो? अंग घामाने भिजलेले होते. कपडे तसेच चिंब भिजून अंगाला चिकटलेले. आधीच कोकण्-त्यात मार्च महिना- त्यातच हा लांबवरचा प्रवास्-दोडामार्ग ते कोल्हापूर- अंगभर घामाचे झरे पाझरणार, नाही तर काय होणार? बरोबर दहाव्या मिनिटाला कंडक्टरने बेल मारली. बाकी एक मात्र खरं, गोवा डेपोच्या बसेस वेळेबाबत अगदी पंक्चुअल! गाडी कोल्हापूरकडे पळू लागली.

नयना

सुनिल पाटकर ·
नयना एका लाखाच्या त्या छोट्याशा गाडीने टि.व्ही.चा छोटा पडदा अगदी दिवसभर व्यापून टाकला होता.ती कशी असेल ? कशी दिसेल ? तिचा रंग काय असेल ?

हक्क

नीलांबरी ·
सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.

सध्याचे वाचन - २

बट्ट्याबोळ ·
१. कर्णपिशाच्चं: लेखकः बाळा फोंडके. लेखन प्रकारः डिटेक्टिव्ह रहस्य कथा. बाळूने साफ निराशा केली. कथा अतिशय टुच्च्या आहेत. दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत. पुस्तकाच्या कव्हर वर काळ्या बॅकग्राउंड वर एका कवटीच चित्र आहे. त्याच प्रयोजन आजूनही समजलेल नाही. मला पुस्तक हातात घेतल्यावर लय भारी वाटल होत. पण मी चू*त निघालो. २५० रुपयांना चूना !!! २. आवरण: लेखक: एस. एल. भैरप्पा. (कन्नड- अनुवादित) प्रकारः कादंबरी-वैचारीक, ऐतिहासीक . विस्मरणाने सत्य झाकोळलं जातं. त्याला आवरण म्हणातात. या थीम वर भैरप्पांनी सुंदर कादंबरी रचली आहे. रझिया-पूर्वीची लक्ष्मी. आमिरशी लग्न करते.

द्रौपदी

क्रान्ति ·
ती कोण, कुठली, कुणाची काहीच ठाउक नाही. तिचं मी माझ्यापुरतं ठेवलेलं नाव द्रौपदी. तेही तिच्या अवतारावरून. तिच्या अंगावर एक नेसूची साडी असते आणि तीन ते चार साड्या पोटावर बांधलेल्या. त्याशिवाय सोबत असलेल्या कापडी पिशवीत दोन-तीन साड्या असतात. साध्याच जुनेर झालेल्या, विटलेल्या, रंग उडालेल्या त्या साड्या ही तिची दौलत! तिची माझी पहिली भेट (?) अगदी लक्षात रहावी अशी. रविवारची निवांत दुपार. माझ्या घरातल्या दोन जागा माझ्या सगळ्यात जास्त आवडीच्या. एक तर हॉलमधलं माझं कंप्यूटर टेबल आणि दुसरी म्हणजे दोन चौक पार करणारा वाहता रस्ता जिथून दिसतो, अशा माझ्या किचनच्या खिडक्या.

चिपाड

आनंदयात्री ·
साडेबारा पाउण झाला असावा. रखरखीत उन्हात एखादे दुसरे तुरळक वाहन फुफाट्यातुन जातांना धुळीचे लोट उडवत होते. त्या आडबाजुच्या गावातल्या यष्टी ष्टांड्याजवळ असलेली ही रसवंती. रसापेक्षा पेक्षा पाणी पिणारीच लोक जास्त. चरकाला बांधलेल्या घुंगरांचा एकसारख्या खुळ्ळ-खुळ्ळ .. खुळ्ळ-खुळ्ळ आवाजात रघ्या तात्पुरत्या टाकलेल्या मंडपाच्या खांबाला टेकुन पुरता भान हरवुन उभा होता. त्याची नजर चरकाच्या चाकांवर स्थिर होती.

मैत्र जिवांचे

रविंद्र गायकवाड ·
मला शिकायला आवडते अभ्यासातही खूप रस आहे, पण आज वर्गात लक्ष लागत नव्हते. मी अस्वस्थही नव्हते. कोणते ही टेंशन नव्हते. कुणी काही मनाला लागेल असे बोलले नव्हते कि एखाद्या अपयशामुळे खचून गेले नव्हते. सगळे जग निर्जिव वाटत होते. चालती बोलती मानसे यंत्रवत भासत होती. ईतक्यात एक खट्याळ वर्गमैत्रिण थट्टेने म्हणाली, "चुपचुप बैठे हो जरुर कोई बात है?? आज लक्ष कुठे आहे तुझे? प्रेमाबिमात पडलीस काये?. थोडावेळ स्वतःवरच शंका आली. असं तर नसेल?... पण कोणताही चेहरा किंवा व्यक्ती डोळ्या समोर येत नव्हती. का्हीतरी झालं होतं पण नक्की काय झालं होतं मला?.