प्रास्ताविकः
साल १९६८...
भंडारा...
कृत्रीम रेतन केंद्र (कृत्रीम रेतनाद्वारे गायी व म्हशीला गर्भधारणा करण्याचे केंद्र)
दुपारची वेळ.
पोष्टमन टपाल देणास आत आला.
ते रजिस्टर टपाल होते.
नवीनच रुजू झालेल्या साहेबाने ते तपाल घेतले.
साहेबाने टपाल फोडले व ते वाचू लागले.
तसे त्यांच्या चेहेर्यावरचे हाव भाव बदलू लागले.
जवळ उभा असलेला शिपाई व बाजूला बसलेला डॉक्टर, साहेबांचा चेहेरा न्याहाळत होते.
साहेबांनी दोघांना जवळ बोलावले व त्यांना एका कागदावर सह्या करायला सांगितले.
दोघांनी त्या कागदावर सह्या केल्या.