शोध
नाव काय रे तुझं?
कमच्या.
कमच्या! हे कुठलं रे नाव? कुठला रे तू? कोणत्या गावाचा? लोक विचारयचे.
कमच्या चुपच राहायचा.
अरे काय विचारतोय? इथे कसा काय आलास तू? बापाचं नाव काय? आडनाव काय?
माहीत नाही. कमच्या म्हणायचा.
अरे रे! च, च... लोकं म्हणायचे. अनाथ दिसतंय पोर.
वणवण फिरतंय पोर, काडी सारखा लुकडा दिसतोय ना म्हणून कमच्या म्हणत असावे ह्याला. लोकं स्वत:च निष्कर्ष काढायचे.
काम मिळायचे.
मिसळपाव