Skip to main content

कथा

रमेश व सुरेश

लेखक श्रीरंग_जोशी यांनी रविवार, 10/06/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं, खेडेगाव म्हंटलं तरी चालेल. लोक खाऊन -पिऊन सुखी होते कारण गरजेपुरते उत्पन्न जवळ जवळ प्रत्येकालाच मिळत होते.या गावात एका जोडप्याचा संसार सुरू झाला -रामराव व जनाबाई. रामरावांच्या वडिलांची वडलोपार्जित शेतजमीन होती (क्षेत्रफळ ४ एकर). शेताच्याच एका कोपऱ्यात एक झोपडीवजा घर होते. रामराव व जनाबाई स्वतःच्याच शेतात राबत असत. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली. रामराव व जनाबाईंच्या संसारवेलीवर फुले उमलली मोठा रमेश, मग जाई व जुई या जुळ्या मुली व या सर्वांच्या पाठीवर धाकटा सुरेश. अर्थातच स्वतःच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी पडू लागले.

राणी ताराबाई

लेखक sneharani यांनी शनिवार, 09/06/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!

एक पत्रकथा: संपूर्ण (अंतिम भागासहित)

लेखक वेणू यांनी शनिवार, 09/06/2012 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
१३ जून १९९१ आदरणीय (की प्रिय?)__, संबोधन काहीही वापरले तरी पुढे नाव काय लिहू? कारण, "अस्तित्व" हे एखाद्या माणसाचं नाव असतं ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. असो. हे पत्र सदर तारखेला लिहीलं असलं तरी, ते तुमच्या पर्यंत कधी पोहोचेल किंबहुना पोहोचेल का, असा प्रश्न आहे, आणि समजा पोहोचलेच तर एक प्रसिद्ध लेखक, हे पत्र वाचून किमान पोचपावती तरी देतील का, हा त्याहून मोठा प्रश्न आहे. तुमच्या लिखाणाने कधी मला आपलसं केलं, कळालं नाही, मात्र तुमचं प्रसिद्ध झालेलं प्रत्येक पुस्तक माझ्या संग्रही आहे- प्रत्येक! तुमचं हर एक पुस्तक वाचल्यावर मला त्याबद्दल जे वाटलं ते मी एका डायरीत लिहीत आलेय...

असाही एक Near Death Experience

लेखक संपत यांनी शुक्रवार, 08/06/2012 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज Near Death Experience वरचा लेख वाचून माझ्या लहानपणी घडलेला एक किस्सा आठवला. माझे मुळ गाव अलिबाग.. कोकण पट्टयात असल्याने भूतखेते भरपूर. पण सर्वाधिक भूतांचा प्रदेश म्हणजे मुरुड जंजिरा. तिथे चिंचेच्या झाडावर एक दगड भिरकावला तर चार चिंचा आणि दहा भुते पडायची.. तिथे माझ्या मावशीच्या शेजाऱ्यांकडे घडलेली ही घटना.. तर ह्या शेजाऱ्यांचा बाबू नावाचा मुलगा चित्रपटांचा भारी शौकीन. त्यावेळी रात्री रस्त्यांवर पडदे टाकून चित्रपट दाखवले जात. शौकीन लोक चांगला चित्रपट फुकटात बघायला लांब लांब जायचे. असाच एकदा मे महिन्यात 'कुर्बानी' चित्रपट पाहायला हा बाबू गेला. रात्री यायला उशीर झाला.

तुम इक गोरख धंदा हो

लेखक यकु यांनी गुरुवार, 07/06/2012 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

अगतिक

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 01/06/2012 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी बंगलोरला काही कामानिमित्त गेलो असताना अंकित घाटपांडेशी ओळख झाली, ऑफिशियल नाही पण एक जिंदादील माणूस म्हणून एकदम आवडून गेला तो. तो आलेला एका सॉफ्टवेअर कंपनीतून म्हणजे बंगलोरच्या त्या कंपनीत सॉफ्टवेअर अपडेटींगचं काम चालू होतं. एक एक कंप्युटर फ़ॉरमॅट करून मग अपडेट करायचं फारच कंटाळवाणं काम ते. त्या टीम मधला हा अंकित.

बुवांचा जन्म

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 01/06/2012 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका वाचनमात्र मिपासदस्याकडून इमेलवर मिळालेली कथा. त्यांच्या परवानगीने प्रसिद्ध करत आहे. प्रेरणा/मूळ कथा: भुताचा जन्म. लेखक - द. मा. मिरासदार
-------------------------
गेले चार दिवस भिंतीला तुंबड्या लावत होतो. काय करणार? मी सतत मिपावर पडीक. कामाच्या नावाने बोंब. **वर एक सणसणीत लाथ मारून साहेबांनी हाकलला मला. तेवढीच एक बसली असती तर ठीक पण साहेब भारदस्त त्यांची लाथ त्यांच्याहून भारदस्त. मी जो कोलमडलो तो थेट डोक्यावर जाऊन पडलो. तेव्हापासूनच थोडासा बदलत चाललो होतो हे लक्षात येत होते. त्यातच देशमुख्याचा फोन आला. देशमुख्या म्हणजे बापमाणूस. नै नै तसा बाप नाही.

ईस्टन ए़क्सप्रेस हायवे

लेखक निश यांनी सोमवार, 28/05/2012 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ मुलुंड चेकनाका , रात्रीचे १२ वाजत आले होते. राजु रिक्षा वाला चेंबुरला जाणार कोणी गिर्‍हाइक मिळत का ? ते बघत होता. पावसाळी रात्र त्यात आमावस्या त्यामुळे शेवटचे भाडे मिळाले कि तो ते भाडे चेंबुरला सोडुन परत गोवंडीला घरी जाणार होता. बराच वेळ कोणीच येईना म्हणुन तो एका टपरी वर पान खायला गेला. पान घेउन पानवाल्याकडुन उरलेले पैसे न घेताच परत तो आपल्या रिक्षात यायला निघाला. पाउस थोडा चालु होताच. तेवढ्यात त्याला मागुन कोणी तरी आवाज दिला. त्याने मागे वळुन पाहीले तर एक सुटात असलेला मनुष्य त्याला पैसे पानवाल्याकडे राहीले आहेत ते सांगत होता.