त्यांची दिवाळी ..
आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन.
मिसळपाव
