द स्केअरक्रो - भाग २४
द स्केअरक्रो भाग २३
द स्केअरक्रो भाग २४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता आणि त्याच्या समोर असलेल्या मोठ्या स्क्रीनकडे बघत होता. जवळजवळ शंभर वेगवेगळ्या प्रतिमा त्याला समोर दिसत होत्या. इतक्या ठिकाणी त्याने कॅमेरे बसवले होते की त्यामुळे वेस्टर्न डेटाच्या इमारतीच्या आजूबाजूचा भाग आणि तिथपर्यंत येणारा मॅककेलिप्स रोडचा भाग या सगळ्यावर त्याला नजर ठेवता येत होती.
त्यांना शोधायला त्याला वेळ लागला नाही. ते परत येतील याची तर त्याला खात्री होतीच.
मिसळपाव