Skip to main content

कथा

पाठवण

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 20/09/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
"आला कारं टँम्पू? सुभ्या गेलाय ना फाट्यावर?" जोरकस झुरका घेऊन हातातल्या शिगरेटची राख चुटकीसरशी झाडत रामभाऊने सदाला विचारले. "चार वाजत आलेत भाऊ, आजुन पत्त्या न्हाय" सदा उगाच दाखवायची म्हणुन काळजी करत बोलला. "मायला, नवरी काय कडुसं पडल्यावर पाठवायची का? पावण्यानबी लय ऊशीर लावला" रामभाऊ घरात शिरत शिरत मनाशीच बोलला. घरात नव्या नवरीचा साजशृंगार चालला होता. बहीणी, मावश्या, आत्या, माम्या सगळी नवरीच्या खोलीत शिदोरीच सामान बांधण्यात व्यस्त होत्या. रामभाऊकडं कुणाचचं लक्ष नव्हतं. "झाली का तयारी?

द स्केअरक्रो - भाग २८

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 20/09/2015 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २७ द स्केअरक्रो भाग २८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) बुधवारी सकाळी मी जेव्हा ऑफिसमध्ये आलो तेव्हा परत लोकांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा असं झालं होतं, तेव्हा माझी नोकरी गेली होती आणि प्रत्येकजण माझ्याकडे कीवभरल्या नजरेने बघत होता. गेल्या आठवड्यात अँजेलाचा मृतदेह माझ्या घरात सापडला होता आणि प्रत्येकाच्या नजरेत राग आणि संशय होता. आज मी अँजेलाच्या खुन्याला मारून तिच्या मृत्यूचा सूड उगवल्याप्रमाणे सगळेजण पाहात होते. माझी प्रतिक्रिया तिन्ही वेळा सारखीच होती.

स्चीझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन भाग ४

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 19/09/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ४ "गिता हे खर आहे की विकी कुठे आहे आणि इतका वेळ का लावतो आहे हे बघण्यासाठी मी गच्चीत गेलो. विकी टाकीवर बसून कुठलस गाण गुणगुणत होता. मी हाक मारली तसा त्याने माझ्याकडे वळून बघितल आणि आलो म्हणून लगेच खाली उतरून आला आणि माझ्याबरोबर घरी आला. अग, मला कल्पनाच नव्हती की त्याला परत त्याचे ते मित्र दिसायला लागले आहेत, नाहीतर मी त्याला तिथेच छेडल असत." विक्रमचे वडील म्हणाले. "बर मग आता पुढे काय काका?" गीताने डॉक्टर ख्रराताना प्रश्न केला. "पुढे अस गिता, की तू त्याच्याशी बोलत रहायचं. कारण त्याचा तुझ्यावर विश्वास बसला आहे. त्याच्या मित्राना तू आवडली नाही आहेस अस त्याच म्हणण आहे.

स्चीझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन भाग ३

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 19/09/2015 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ गीतानेदेखील घड्याळाकडे बघितल आणि बर म्हणून ती केबिनच्या बाहेर आली. "इतकावेळ काय करत होतीस आत?" ती बाहेर येताच विक्रमने तिच्याकडे संशयाने बघत तिला विचारले. "अरे आज जी केस येणार आहे ना त्याच डिस्कशन करत होतो आम्ही. पुढची सेशन्स मीच घ्यायची आहेत ना म्हणून. का रे?" मुद्धाम निट एकस्प्लनेशन देऊन मग गीताने विचारल. त्यावर हळूच मोकळा श्वास सोडत विक्रम म्हणाला;"काही नाही. मला वाटल तू आपल्या सकाळच्या गप्पा सांगायला गेलीस की काय." गिताने मुद्धाम गोंधळल्यासारखा चेहेरा केला आणि मग आठवल्यासारख करत विचारल;"कुठल डिस्कशन? ओह! तू तुझ्या मित्रांबरोबर मजा केलीस ते?

द स्केअरक्रो - भाग २७

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 19/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २६ द स्केअरक्रो भाग २७ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) पहाटेचे दीड-दोन वाजले असतील. माझं घड्याळ बंद पडलं होतं बहुतेक. किती वाजले आहेत ते समजत नव्हतं. आजच्या दिवसात एफ.बी.आय.च्या ‘ ग्वान्टानामो एक्सप्रेस ‘ इंटरॉगेशन व्हॅनमध्ये एजंट बँटमसमोर बसायची ही माझी दुसरी वेळ होती. बँटम पुष्कळच निवळला होता. शांतपणे तो माझ्यासमोरच्या खुर्चीत बसला आणि त्याने माझ्यापुढे कॉफी ठेवली. मी ती संपवेपर्यंत तो काहीही बोलला नाही. नंतर त्याने त्याचं छोटं पॉकेटबुक उघडलं आणि माझ्याकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं.

दिवाळी बोनस मिटींग!

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 18/09/2015 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी बोनस मिटींग! ढीस्क्लेमर : सदर कथेतील पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत तरी याचा कुठल्याही व्यक्तींशी संबध येऊ शकतो. तसा आल्यास व तो आल्याचे पाहून तुम्ही हसलात तर याला लेखक(च) जबाबदार नसेल असे ठामपणे नाही म्हणता येणार! ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [दृश्य : एका नामांकित प्रा. लि.

पाठलाग - कथा - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी गुरुवार, 17/09/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
१९६०चे दशक नुकतेच चालू झाले होते . मराठी चित्रपटसॄष्टीमध्ये ग्रामिण बाजाचे चित्रपट हळुहळु लोकप्रिय होऊ लागले होते. ग्रामिण पार्श्वभूमी असलेले कथानक व त्याला असलेली लावणीप्रधान गीत नॄत्यांची जोड हे काँबिनेशन मराठी प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले ."सांगते ऐका" , "पाटलाचा पोर" ,"ओवाळणी" अशा ग्रामिण पार्श्वभूमीच्या सिनेमांनी चांगलेच यश मिळवले . साहजिकच मराठी चित्रपट निर्मातेही अशाच चित्रपटांच्या निर्मीतीकडे वळू लागले . अनंत माने , दिनकर द.

ती आणि मी (भयकथा)

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी: तिचं घर कसं भणंग. एकटं. मुख्य वाड्यापासुन जरासं दुर. तिचे म्हातारे आईबाप, थोरले भाऊ, त्यांच्या बायका पोरं वाड्यात राहायचे. ही बाहेरच्या खोलीत. एकटीच. बिनलग्नाची. रात्री जेवणानंतर घरामागच्या झाडीत मशेरी घासत फिरण्याची तिला विचित्र सवय होती. तिची आणि माझी पहीली भेट इथलीच. एका रात्री ती मला अशीच एकटी दिसली. जवळ जावुन मी तिची विचारपुस केली. घडाघडा बोलली. खरतरं मी तिच्यापुढे एक अनोळखी बाई होते. पण पहिल्या भेटीतच तिनं आयुष्यभराचं रडगाणं माझ्यासमोर सुरु केलं. माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत कितीतरी वेळ एकटीच बोलतच राहीली. थोडी चक्रमच वाटली. पण मला तिची दया आली.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

अकबर - बिरबल (मेहुण्याची शिफारस)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 16/09/2015 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
[दृश्य : अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. बेगम अकबर बादशाची वाट पाहत पलंगावर फळांचे ताट समोर ठेऊन त्यातील सफरचंद चाकूने कापीत आहे.