Skip to main content

कथा

बोध कथा - उंदीर आणि बिल्ली मौसी

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 17/02/2016 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे.

कथा ( भाग २ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी मंगळवार, 16/02/2016 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
" निशा इकडे ये ग. " " काय दिदी ? " " तुला एक खेळ सांगते, जमेल का तुला खेळायला ? " " पण काय आहे खेळ ? " " मी तुला एक वस्तू शोधायला सांगणार आहे आणि ती जर तू शोधून आणली तर तू जिंकलीस. " " ठिक आहे दिदी मी प्रयत्न करेन . " " ठीक आहे, तर मग ऐक इथुन सरळ रेषेत पुढे जायचं . मग तिथे कळकाच बेट शोधायच. त्याला एक फेरी मारायची आणि मग ज्या दिशेला पाण्याची टाकी दिसेल तिकडे जायच. पाण्याच्या टाकीपासून पूर्वेला २० पावलं जायचं . तिथे एक आंब्याचं झाड शोधायचं .

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 16/02/2016 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले.

शृँगार २

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 15/02/2016 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपली नक्की काय चूक होते आहे तेच समजत नव्हत . आपण बायकोला पुरेसा वेळ देऊ शकत नाही हेच चुकत असाव बहुतेक . आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे . किती इंटरेस्ट होता तीला . स्वतः हून पुढाकार घ्यायची , घरी आल कि स्वस्थ बसु द्यायची नाही . आणि आता काय झाल आहे तीच . आपण तिला दोष देण्यात काही अर्थ नाही . आपण आपल्या पासुनच सुरूवात करूया . आजकाल ऑफिसमध्ये इतका वेळ काम कराव लागत . हे तर होणारच आपण कुठे सरकारी नोकरांसारखे नशीबवान आहोत . पुढे ती लोकल त्यातली ती गर्दी , सुरूवाती सुरूवातीला त्याचही थ्रील वाटायच . नंतर त्याची सवय झाली आणि आता तर उबग येतो त्याचा .

बोबींलचा वास

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/02/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (या वेळी ब्लॉग म्हणून माझी एक कथा देत आहे. ‘रोखठोक’ 2015 च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा.) निर्मलाबाई आणि सगुणाबाई या तश्या मैत्रिणी नव्हत्या. बालपणापासूनच्या माहितीतल्या- ओळखीतल्या नव्हत्या, म्हणून वर्गमैत्रीणीही नव्हत्या. दोन्हीही नोकरी करीत नसल्यामुळे कार्यालयातील सहकारी नव्हत्या. निर्मलाबाई आणि सगुणाबाई या दोन्ही आर्थिकदृष्य्या विचार करता वेगवेगळ्या वर्गातल्या होत्या.

'Love is an Illusion'

लेखक Hrushikesh Marathe यांनी सोमवार, 15/02/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
"काय झालं रे तुला, असा नाराजसा दिसतोस. काही प्रोब्लेम आहे का? आजवर इतका पडका चेहरा कधी पहिला नाही रे तुझा." प्रियाचा व्हाट्स अप वरचा मेसेज पाहून समीरचा चेहरा अजुन गंभीर झाला. त्याला काही सुचेनासे झालं होतं. कसाबसा तो आपल्या जागेवरून उठून कॉफी मशीन कडे गेला. एक कप कॉफी सोबत घेऊन थेट पायऱ्याचा दिशेने तो निघुन गेला. प्रियाला समजेना. तिचा मनात शंकांचे काहुर माजले होते. याच कोणाशी भांडण नसेल ना झालं? तब्येत बरी नसेल का याची? की काही घरचा प्रोब्लेम? तिला काही सुचेना. शेवटी तिने सुद्धा आपला कॉम्प्यूटर लॉक केला आणि समीर चा मागे मागे जाऊ लागली.

कथा ( भाग १ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी शुक्रवार, 12/02/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वरंग : तो झपाझप पावलं उचलत होता . लांबचा पल्ला गाठायचा होता त्याला .वाटेत होत निबिड रान . दिवस मावळायच्या आत त्याला ते रान पार करायचं होत . रानातून जाताना त्याचा जीव कातावून गेला होता . या भितीच्या धक्क्यात त्याच्या पायाची गती वाढली होती व तो अधिक त्वरेनं पावलं उचलत होता . रान लवकर संपाव असं त्याला वाटत होत . पण रस्ता काही संपेना.रान एव्हाना पार व्हायला हवं होत . पण अजून काही तसं झालं नहूत. तो चालतच होता . हळूहळू दिवस मावळायला लागला . आता त्याच्या ध्यानात आलं होतं की कुठंतरी आपण चुकीची पायवाट पकडली आणि आता आपण या जंगलात कुठे आहोत हेच त्याला उमजेनासं झालं होतं .

शृँगार १

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 11/02/2016 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
उरोज नितंब आणि तसलेच काही शब्द असलेल पुस्तक होत ते . शेजारी बसलेला मुलगा ते वाचत बसला होता . छे नुसत अस काही वाचुनही लोक एक्साईट होतात . नाही म्हणजे आपण एक्साईट व्हायला हव कि नको . काही हरकत नाही , पण आता आपले दिवस कर्तृत्व दाखवण्याचे , कृती वाचत बसण्याचे नाहीत . पण काय हरकत आहे अस वाचून स्फुरण चढणार असेल तर . हं किती दिवस झाले बायकोशी नीट बोलणही झाल नाही .

कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 08/02/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी : ह्या बाईची एक मुलगी मुंबईत बांद्रा इथे राहते.

अ‍ॅडमिट किडा - कथा

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 06/02/2016 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
--- अ‍ॅडमिट किडा ----- कथा --- काल्पनीक -------------- "अ‍ॅडमिट किडा !!!! " "किसका घर ???? " "मेरा घर ? मेरा घर ? तो झोपाळा !!!" वाड्याच्या आवारामध्ये मुलांचा खेळ अगदी रंगात आला होता . या खेळात ज्याच्यावर राज्य आहे त्याने एखादी जागा किंवा ठिकाण घर म्हणुन सांगायचे आणी मग इतरांनी त्याला चुकवत त्या जागेपाशी जायचे . यामध्ये जो पकडला जाईल त्याच्यावर पुढचे राज्य यायचे . मुले या खेळात अगदी गुंग झाली होती. दुपार झाली , उन वाढू लागले तरी मुलांना त्याचा पत्ता नव्हता . वाड्याच्या गेटपाशी उभे राहुन एक अनोळखी मुलगा खुप वेळ हा त्यांचा खेळ टक लावुन बघत होता .