उरोज नितंब आणि तसलेच काही शब्द असलेल पुस्तक होत ते . शेजारी बसलेला मुलगा ते वाचत बसला होता . छे नुसत अस काही वाचुनही लोक एक्साईट होतात . नाही म्हणजे आपण एक्साईट व्हायला हव कि नको . काही हरकत नाही , पण आता आपले दिवस कर्तृत्व दाखवण्याचे , कृती वाचत बसण्याचे नाहीत . पण काय हरकत आहे अस वाचून स्फुरण चढणार असेल तर . हं किती दिवस झाले बायकोशी नीट बोलणही झाल नाही . चला आजचा दिवसच चांगला आहे आज चक्क बसायला जागा मिळाली आणि मग ते पुस्तक चांगलच स्फुरण चढल कि चला एकदा घरी पोहोचलो कि मग या उत्साहाचा खरा फायदा होईल . अशाच सुखस्वप्नात स्टेशन आल . चला आज कस मस्त वाटतय . तेच ऑफिस आज एकदम भारी वाटतय . त्याच उत्साहात कामाला सुरूवात केली . कायमस्वरुपी एक हास्य पसरून राहिल होत चेहऱ्यावर . बॉसच बोलावण आल . तशीच हास्य मुद्रा घेऊन बॉसच्या केबिनमधे प्रवेश केला . बॉसने कामातून नजर वर करून पाहिल . अरर चूक झाली . तिरडी बांधून ठेवली आहे आणि पुढच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे त्यात तुम्ही सुहास्य वदनाने गेला आहे तेव्हा लोक तुमच्याकडे जसे पाहतील तशी परिस्थिती निर्माण झाली . क्षणात सुतकी चेहरा करून त्या वातावरणात सामील झालो तेव्हा बॉस थोडा नॉर्मल झाला . पण मघाशी केलेल्या पापाचा बदला घेण्यासाठीच . दिवसभर कामाचा नुसता रतीब चालू होता . त्यात बॉसची कटकट वेगळीच . थोड लवकर निघायचा विचार होता पण बॉसने थोडा वेळ जास्तच थांबवल . शेवटी एकदाची सुटका झाली आणि स्टेशन गाठल .
जो थोडा उशीर झाला होता त्यामुळे सगळच बदलल होत , स्टेशनवर फारच गर्दी झाली होती . आता अवघड होत पुढच . मग कसतरी लोंबकळत पोहोचलो आपल्या इच्छित स्टेशनवर . अगदीच त्राण गेल्यासारख वाटत होत . शेवटी कसबस घर गाठल . तिथ पोहोचल्यावर आठवण आली अरे मोकळ्या हातानेच आलो आपण . निदान गजरा तरी आणायला हवा होता . जाऊदे आता परत जाऊन काही आणण्याची अजिबात इच्छा नाही . बायकोन दार उघडल . हं आज खरच सुंदर दिसते आहे . हे विचार क्षणभरच मेंदूत तरळले असतील तेवढयात तिन तोंड उघडल ते बंद न करण्याच्या इराद्यानेच . सगळ्या गोष्टींवर प्रेम हाच इलाज असतो . थोड रोमँटिक होत तिच तोंड स्वतःच्या तोंडाने बंद केल.
----------------------------------------------------------------
आत शिरायला अजिबात जागा नव्हती . तसाच थोडा जोर लावून एकदाचा आत शिरलो . आज काही पर्याय नसल्यामुळे सगळा प्रवास लटकतच करावा लागला . विचार विचार आणि नुसते विचार होते डोक्यात .
-----------------------------------------------------------------
तिला आज बहुतेक तोंड बंद तरी करायच नव्हत तिने स्वतःला वेगळ करत परत बोलायला सुरूवात केली . बराच वेळ बोलत होती ती . रात्री सगळ आवरल्यावर आली ती . झाल शेवटी एकदाच सगळ . काय होत ते प्रेम शारीरिक गरज का नुसत आपल रुटीन . करायला हव म्हणून करायच . पुरुष आणि स्त्री एकत्र असले अस करायला हव म्हणून की स्वतःच पुरुषत्व आणि स्त्रीत्व सिद्ध व्हाव म्हणून .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11319
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय होत ते प्रेम शारीरिक गरज
--^--
In reply to काय होत ते प्रेम शारीरिक गरज by उगा काहितरीच
Thanks
छान सुरुवात
बरोबर आहे तुमच . पण नविनच
In reply to छान सुरुवात by पैसा
हाहा!
In reply to बरोबर आहे तुमच . पण नविनच by अनाहूत
Ohh
In reply to हाहा! by पैसा
काही प्रमाणात ??
In reply to Ohh by अनाहूत
बरंच झालं अजुन खुलवली नाही ते
In reply to काही प्रमाणात ?? by मराठी कथालेखक
समजा आले असते तर
In reply to बरंच झालं अजुन खुलवली नाही ते by जिन्क्स
ह्या प्रशनांवर सुद्रुढ
In reply to समजा आले असते तर by बोका-ए-आझम
क्रमश: आहे का ?
हो. क्रमशः आहे. भाग २
In reply to क्रमश: आहे का ? by मराठी कथालेखक
भाग २ : http://www.misalpav.com/node/34922
काहि दिवसांपुर्वि खफ वर