Skip to main content

कथा

हार नही जीत नही जहा प्यार है...

लेखक मराठी कथालेखक यांनी शनिवार, 26/03/2016 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
एका सत्यकथेचा काल्पनिक उत्तरार्ध ट्रेन येण्याची वेळ झालीच होती. आळस झटकत अनिल तयारीत उभा राहिला. आजूबाजूला नजर टाकत असतानाच मोठाली बॅग संभाळत येत असलेल्या त्या स्त्रीकडे त्याची नजर गेली. तिचंही त्याच्याकडे लक्ष गेल आणि नजरभेट झाली. काही क्षण दोघे थबकले. नंतर स्वतःला सावरत त्याच्या बाजूने निघून ती पुढे गेली आणि काही अंतरावरच उभी राहिली. अनिलला क्षणभर काही सुचलं नाही , त्याने अस्वस्थ होवून पुन्हा एकदा तिच्या दिशेनं पाहिलं. शंकेला काही वाव नव्ह्ताच ..निशा.. हो, निशाच होती ती.

बोट - अग्निशमन (Fire Fighting)

लेखक स्वीट टॉकर यांनी शनिवार, 26/03/2016 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही. भूवासियांच्या जगात विभागीकरण (compartmentalization) खूप असतं. असायला हवं देखील.

सु.शिं.चे मानसपुत्र

लेखक अजिंक्य विश्वास यांनी शुक्रवार, 25/03/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन. २ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली) आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा) हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे. चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून- कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-!

सडमाडं

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 24/03/2016 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
कळी, भात, वांग्याची आमटी, आन चपाती पत्रावळीवर आल्यावर बब्यानं जेवायला सुरु केलं. आण्या मात्र कोशिंबीरीची वाट बघत खाऊ का गिळू अवस्थेत ताटकळला होता. रामाला हाकावर हाका मारुन कोशिंबीर त्यानं त्याच्या पंगतीत फिरवायची व्यवस्था केली. चार पळ्या कोशिंबीर त्याच्या पत्रावळीत पडली तवा त्याच्या जिवात जीव आला. तरी अजून पापड्या यायच्या बाकी होत्या. मग गर्दीत हरवलेल्या पापडीवाल्याच्या शोधात त्यांच्यावर बारीक नजर ठेवतच आण्यानं जेवन झोडायला सुरुवात केली. वाढपी दुरडी घेऊन फिरत होते. दुरडीत भात का कळी हे खाली बसून कळत नव्हतं. बब्या वाढप्याला बोलवायचा आणी त्याचा दुरडीत जे आसल ते घ्यायचा.

आक्की

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 23/03/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
आक्की आली. फटफटीवर बसून. साधं वळून बघितलं पण नाही. फटफट गेली पुढे. पाठीमागं धूरच धूर. मग आमची गाडी काढली. क्रेट बांधलं. बाप म्हणाला बारक्यालापण घीऊन जा. मग बसलो मागं. गाडी पळाली. कॅनालच्या कडंला पत्र्याचं शेड. शेडमधी बाटल्याच बाटल्या. मिरींडा न पेप्सी. भरली क्रेटमधी. मग क्रेट घेऊन पुन्हा गाडीवर. क्रेटचा बॉटम मांडीत रुतला. गाडी निघाली भुरभुरभुरभूर. परत आल्यावर आक्की कुठं दिसली नाही. आधी कसं वाळूच्या ढिगाऱ्यावर. तवा तिचं लगीन नव्हतं झालं. पोरांना दगडं फेकून मारायची. वाळूचा ढिगारा तिच्या बानं आणून ओतलेला. पोरं चिडीचूप. शाळेत जायची सकाळीच. सायकलीवर. कराटे शिकायला. लाथा झोडायची.

दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 22/03/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच ! राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता.

दहशत - एका नव्या रूपात!

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 21/03/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.

एका दगडूची प्राजू

लेखक भरत्_पलुसकर यांनी शनिवार, 19/03/2016 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट आहे दगडूची आणि प्राजूची. तुमच्या आजुबाजुला अनेक सापडतील असे. एकतर्फे प्रेमातून इतक्या भयानक घटना घडतात की आईवडील नाईलाजाने कठोर पावले उचलतात. पण सरसकट सगळेच किशोर सारखे नसतात. ही नाण्याची दूसरी बाजू मांडायचा प्रयत्न. थोडीशी काल्पनिक आणि बरीचशी खरी. काही उणीव राहून गेली असल्यास मिपाकर मोठ्या मनाने माफ करतीलच. एका का कोण जाणे आज असं काहीतरी मनातलं सांगाव वाटतंय. खोल खोल रुतलेल. खूप इच्छा असूनही कधी बाहेर न पडल्यान खदखदनार. मुलींच एक बरं असतं, घळाघळा रडून मन मोकळ करतात. मुलांचा जाम लोचा असतो. रडावं तर मित्र म्हणतात काय रडुबाइ आहे आणि न रडावं तर मुली म्हणतात कसं दगडांच मन असतं मुलांच!

धूळ

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/03/2016 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गाव तसं बरं वाटलं. हायवेलाच लागून होतं. गाव कसलं चार घरांची वस्तीच ती. डांबरीवरुन आत गेल्याशिवाय दिसली पण नसती. आडवळणाला एक देऊळपण होतं. तिथं चिटपाखरुपण नव्हतं. गावातल्या घराघरांत मिनमिनतं दिवं तेवढं दिसलं. बाकी सगळा अंधार. वेळ संध्याकाळची. सुर्य बुडून गेलेला. कानोसा घेत घेत देवळाकडं गेलो. देऊळ दगडी होतं. भरभक्कम. काळा पाषाण. अंधारात न्हाय म्हणलं तरी ते भेसूरच दिसत होतं. बाजूनं मोकळं मैदान आणि त्यापलिकडं घनदाट झाडी. बाकी वाऱ्यानं उडवलेली नुसती धूळ. गाभाऱ्यात एक पणती जळत होती. देव काय ओळखीचा नव्हता. हात जोडायची इच्छा कधीच मरुन गेलेली.