सोशल नेटवर्किंग (भाग ४)
आज सकाळी सकाळी facebook लावताच श्रावणीचं दर्शन. अगदी छोटा काळा मायक्रो स्कर्ट आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाचा आणि स्कर्टच्या मानाने बऱ्यापैकी मोठा म्हणता येईल असा टी-शर्ट. अगदी वर
खोचून बांधलेले केस. आणि गवतावर एका कुशीवर झोपून हातात धरलेली गुलाबाची कळी. बाकी आजूबाजूला काहीच नाही. फक्त हिरवंगार गवत. अप्रतिम एकदम. मयंकला जितक्या वेळा श्रावणी आठवून छान वाटत असे, तितक्या वेळा मल्हार आठवून कमालीचा संताप येत असे. नेहमीप्रमाणे हा ही फोटो त्यानेच काढला असणार. आपल्यावरची लाईम लाईट कमी होत चाललीय हा एक राग तर होताच मल्हारबद्दल. शिवाय श्रावणी-मल्हार काय प्रकरण आहे हेपण नीट कळत नव्हत.
मिसळपाव