मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

चित्रगुप्त ·
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी

ती, तो आणि चुनु.

भागो ·
लेखनविषय:
ती, तो आणि चुनु. रविवारची संध्याकाळ. आज तिच्या माहेरच्या कुणाच्यातरी लग्नाचे रिसेप्शन होते. ती आत तयार होत होती. हा बाहेर दिवाणखाण्यात बसला होता. तेव्हढ्यात तो लहान मुलगा आला. बेल न वाजवताच आत आला. “काका. आईला पेपर पाहिजे आहे.” “देतो, पण आधी नाव सांग.” “चुनु. आता पेपर द्या.” “चुनु काय? सगळं नाव सांग. मग पेपर देईन.” “चिंतामणी वसंत राव. पेपर.” “आडनाव?” “सांगितलेकी. राव.” “राहतोस कुठे?” “तुमच्या शेजारीच.” “लाडू खाणार?” त्याला त्याच्याशी गप्पा मारायला छान वाटत होते. “नको.” “का? गोड आवडत नाही? मग चकली चिवडा खाशील?” “नको. आई रागावते.” “अरे आईला सांगायचे कि काकांनी दिला.

अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या माझ्या काही आठवणी!

भुजंग पाटील ·
लेखनविषय:
ह्या आहेत माझ्या अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या, लाँग ड्राईव्ह्च्या काही आठवणीं - तत्कालीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदलत गेलेल्या: १. नकाश्यांचे पुस्तक (अ‍ॅटलास): अगदी सुरूवातीला अ‍ॅटलास हा एकच आधार असायचा. आम्हाला कुठे नवीन ठिकाणी जायचे असल्यास आधी जवळच्या गॅस स्टेशनला जाऊन त्या स्टेट / शहराच्या नकाश्याचे पुस्तक विकत घ्यावे लागायचे. नाही मिळाले तर तसेच निघून पडायचे, आणि त्या राज्याच्या सिमेवर हायवेच्या वेलकम सेंटर मधून नकाशे विकत घ्यायचे; मग हायलायटरने डेस्टिनेशनचा रस्ता ट्रेस करून पुढची वाटचाल करायची.

कॉस्मिक सेन्सॉरशिप शेवटचा भाग -५

भागो ·
लेखनविषय:
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ संध्याकाळचे पाच वाजले असावेत. रोज ह्याच वेळेला राघव 11KM रस्त्यावरून एक चक्कर टाकतो. राघव जिथे रहातो त्या कॉलनीच्या जवळून हा रस्ता जातो. संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरलं कि मन थोडं उल्हसित होत. “संध्याकाळचं फिरणं” ही थेरपी त्याच्या मनोवैज्ञानिक चिकित्सकानं सुचवली होती. आज्ञाधारक मुलाप्रमाणे राघव काटेकोरपणे त्याचं पालन करत होता. घराबाहेर पडायच्या आधी त्याने नेहमीची कवायत केली. शर्टाचा वरचा खिसा तपासला. खिशात स्वतःचे नाव, पत्ता आणि टेलेफोन नंबर लिहिलेले कार्ड असल्याची खात्री करून घेतली. हे कार्ड जवळ असणे फार महत्वाचं होतं.

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -४

भागो ·
लेखनविषय:
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ “राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले. डायहायड्रोजन मोनाक्साइड? आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील. “वेट ए मिनिट. तुम्ही जादूचे प्रयोग बघायला जाता का? नका जात जाऊ. गेलात तर संमोहनाच्या प्रयोगाला स्वयंसेवक म्हणून तरी पुढे जाऊ नका.

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -४

भागो ·
लेखनविषय:
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ “राघव, तुझा घसा कोरडा पडलेला दिसतोय. तू थोडं थंड डायहायड्रोजन मोनाक्साइड पी. बरं वाटेल. मग आपण सावकाश बोलू.” डॉक्टर शास्त्री बोलले. डायहायड्रोजन मोनाक्साइड? आता हा कोण जादुगार? मला डायहायड्रोजन मोनाक्साइड प्यायला देणारा? निश्चितच हे आपल्याला हे पेय पाजूून आपले प्रेत बनवून, कॉॉफिनमध्ये टाकून देशाबाहेर घेऊन जातील. “वेट ए मिनिट. तुम्ही जादूचे प्रयोग बघायला जाता का? नका जात जाऊ. गेलात तर संमोहनाच्या प्रयोगाला स्वयंसेवक म्हणून तरी पुढे जाऊ नका.

१४ मे भाग-२

भागो ·
लेखनविषय:
पुनश्च १४ मे सकाळी साडेसहा वाजता गजर वाजला आणि तो नेहमीप्रमाणे आज झोपला आणि काल सकाळी उठला. १४ मेला रात्री झोपला आणि १४ मेला सकाळी उठला! हा गजर बरा पडतो. बायको उठून गदा गदा हलवून जागं करणार त्यापेक्षा हा नाजूक किणकिण करणारा गजर परवडला. उठायचा अगदी कंटाळा आला होता. रोज रोज उठायचा कंटाळा करून कसं चालेल? रात्री केव्हातरी त्याला जाग आली होती. कसलं तरी स्वप्न पडत होतं. एकदम वीज कडाडल्याचा आवाज आला होता. त्यानेच झोपमोड झाली. शेजारीच बायको झोपली होती. घोरत होती. झोपेत देखील चेहऱ्यावर तिरसट रागीट नाराजीचे भाव होते. ही कसली स्वप्ने बघत असेल बरं? तीच ती. झाडू पोछा करणाऱ्या बाईला रागावत असेल.

१४ मे. भाग १

भागो ·
लेखनविषय:
१४ मे. सब तीरथ एक बार. लेकीन १४ मे बार बार! आज काय तारीख आहे? 1 ऑगस्ट. कशावरून? कारण काल ३१ जुलै होती. हा तुमचा निव्वळ भ्रम आहे. मी तुम्हाला सांगतो आज १४ मे आहे. काही दिवसांनी लोक म्हणतील आज १८ सप्टेंबर आहे. मग म्हणतील आज २० डिसेंबर आहे. तुम्ही कुणा कुणावर विश्वास ठेवणार? ही मिस्टर कुलकर्णीची कथा वाचा. मग मी काय सांगतो आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल. संध्याकाळचे सात वाजण्याची वेळ असावी. कुलकर्णी हॉटेलमध्ये आला तेव्हा फक्त एकजण शेवटच्या टेबलापाशी बसला होता. हे सद् गृहस्थ नेहमीच्यातले नव्हते. त्याच्याच वयाचे असावेत. एकाएकी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला. लख्ख प्रकाश पडला.

पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

विवेकपटाईत ·
लेखनप्रकार
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) (ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) . त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची.

सांता क्लॉज

भागो ·
लेखनविषय:
सांता क्लॉज जानेवारी महिना सुरु होतोय न होतोय बबड्याचे बाबा बबड्याला दमात घ्यायला सुरुवात करतात. “बबड्या, अभ्यास कर. नाहीतर सांता क्लॉज रागावेल.” “बबड्या, काकांकडे चॉकोलेट मागायचे नाही. सांता क्लॉज बघतोय.” “बबड्या, बस झाले तुझे विडीओ गेम. बंद कर आता. नाहीतर...” बबड्या, हे करू नकोस आणि ते करू नकोस. अशाप्रकारे दाढीवाल्या सांता क्लॉजने बबड्याचे बाल्य पार कोमेजून टाकले होते. फुगे, कचकड्याच्या बाहुल्या, गाड्या (खेळण्यातल्या), साप शिडी, बॅटबॉल, नवा व्यापार आणि मागच्या वर्षी रुबिक क्यूब. ह्या असल्या खेळण्यांसाठी वर्षभर चॉकोलेटचा उपास!