सांता क्लॉज
जानेवारी महिना सुरु होतोय न होतोय बबड्याचे बाबा बबड्याला दमात घ्यायला सुरुवात करतात.
“बबड्या, अभ्यास कर. नाहीतर सांता क्लॉज रागावेल.”
“बबड्या, काकांकडे चॉकोलेट मागायचे नाही. सांता क्लॉज बघतोय.”
“बबड्या, बस झाले तुझे विडीओ गेम. बंद कर आता. नाहीतर...”
बबड्या, हे करू नकोस आणि ते करू नकोस.
अशाप्रकारे दाढीवाल्या सांता क्लॉजने बबड्याचे बाल्य पार कोमेजून टाकले होते.
फुगे, कचकड्याच्या बाहुल्या, गाड्या (खेळण्यातल्या), साप शिडी, बॅटबॉल, नवा व्यापार आणि मागच्या वर्षी रुबिक क्यूब. ह्या असल्या खेळण्यांसाठी वर्षभर चॉकोलेटचा उपास!