Skip to main content

कथा

गूढ भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 19/06/2017 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024 भाग २ रात्री साधारण दहा साडेदहाच्या सुमाराला राजन चंद्र्भानच्या घरी पोहोचला. चंद्रभान त्याचीच वाट बघत होता. "खूप उशीर झाला रे तुला राजू? सध्या कसलं शूटिंग चालू आहे तुझ?" उगाच काहीतरी विचारायचं म्हा णून चंद्रभानने विचारल आणि राजनला बसायला सांगून तो बारच्या दिशेने वळला. "बर ते सांग सावकाश. अगोदर काय घेणार ते बोल. एक मस्त नवीन स्कॉच आणली आहे. नवीनच आहे; उघडतो. काय?" "नको भानू. तू बस बघू माझ्या शेजारी.

कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 18/06/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
१. आयला ऑफिसला जाण्याआधी कश मारावा या हेतूपोटी नागेशने सिगारेट बाहेर काढली. पण लायटर पेटवताच त्यातून हिरवट रंगाचा चमकदार धूर बाहेर पडला. थोड्याच वेळात धुराचा छोटासा ढग तरंगू लागला अन ढगातून जिन प्रकट झाला. “हॅपी न्यू इयर मेरे आका. बोलीये क्या हुक्म है “ नागेश आश्चर्याने पाहू लागला “तू जिन आहेस ?!!” “हो हुजूर.” नागेशने स्वतःला एक चिमटा घेतला. “हे स्वप्न नाहीये मालिक.” “पण तू लायटरमधे कसाकाय ? जिन तर जादूच्या दिव्यात सापडतो ना” “बरोबर. तो मोठा जिन… बड़े भाईजान. मी छोटा जिन.” “आयला असंही असतं का ?” “जी हाँ.” “तू माझ्या इच्छा पूर्ण करशील न पण ?” “बेशक.

गूढ भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 17/06/2017 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाग १ चंद्रभान एक प्रथितयश लेखक. विशेषतः भय कथा आणि गूढ कथा लिहिण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नसे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते तीन आवृत्या निघत असत. येत्या काही दिवसात त्याची टी. व्ही. वर मुलाखत दाखवण्यात येणार होती; त्यामुळे चंद्रभान खुप खुश होता. तो स्टुडियो मध्ये वेळेच्या अगोरच पोहोचला. कार्यक्रमाचा दिग्दर्शक राजन पूर्णपात्रे त्याचा मित्र होता. चंद्रभानला बघून तो खूप खुश झाला. "ये ये भानू! लवकर बरा आलास?" राजनने त्याला मिठी मारत विचारले. "अरे आयुष्यात पहिल्यांदा टी. व्ही. वर मुलाखत आहे. त्यामुळे थोडा एक्साईट झालो आहे. राहावल नाही म्हणून लवकर आलो. तू बिझी आहेस का?

बकरी ने पैसे का खाल्ले ?

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 16/06/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. . कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right संदर्भ : नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.

एका वेड्याची रोजनिशी.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/06/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire एका वेड्याची रोजनिशी. ऑक्टोबर ३ आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले. खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता.

नामकरण.. एक प्रेमकथा - भाग २ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी मंगळवार, 13/06/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पासून पुढे - .................................................................. बसा मि. सागर.. डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना? काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे... आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल.. हो डॉक्टर.. दोन आठवड्यानंतर त्यांना घेवून या, चेकअप साठी.. ............................................................. संध्याकाळी ६ वा.. (सागर व कविता गार्डनमधे...) सूर्य मावळताना किती छान दृश्य निर्माण होत ना? होय.. अहो तुम्हाला आठवतय?

पारिजात

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/06/2017 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.      माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते.

नामकरण.. (एक प्रेमकथा - भाग १ )

लेखक दिपक लोखंडे यांनी रविवार, 11/06/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा.. ..................................................... अहो ऐकलत का?.. तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे... कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?.. अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही.. विसरला का तुम्ही? आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी.. अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो.. .......................................................... - २० मिनिटानंतर... (गाडीमध्ये सागर व त्याची बायको..) सागर.. तुम्हाला काही विचारु का? काय गं, यात परवानगी कसली घ्यायची..

कथुकल्या ११

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 10/06/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
१. तुझ्याविना… निखिलने डोळे उघडले अन टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. आज उठायला तब्बल एक तास उशीर झाला होता. त्याने पटापट आवरलं अन ड्रेस बदलून तयार झाला. कॉलरवरच्या हिरवट डागाकडे पाहून तो जरा नाराज झाला पण एका आर्ट टीचरसाठी हे नेहमीचच होतं. जाताजाता त्याने प्रियाकडे वळून पाहिलं. ती त्याच्याकडे तोंड करून झोपली होती. लांबसडक सोनेरी केसांनी मुखचंद्रमा अर्धवट झाकला होता. डोळे मिटलेला तिचा सुंदर चेहरा शांत, प्रसन्न दिसत होता. “सॉरी डियर.

प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 10/06/2017 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रोफाईल.. समूहावर वावरणारी एक अमानवि गुढ व्यक्ति....एक कथा ...................................................... हजारोची सदस्य संख्या ओलांडणारा तो एक फेसबुका वरील समुह .. त्यावर धनंजय जोशी हा एक सदस्य.. समुहावर अनेक वेळा मीट्स..संमेलने..मिसळ पार्ट्या आदी चालत असायच्या.. सदस्य एक मेकास काहि प्रमणात भेटले पण होते.. मात्र धनंजय..ज्याला डी.जे या नावाने ओळखले जायचे.. तो सा-या चर्चा भेटी गठी पासून दूर असायचा.. समूहावर अनेक विषयावर चर्चा चालत असत त्यात पण त्याचा फारसा सहभाग नसे. खरा म्हणजे त्याला प्रत्यक्ष पाहिलेले कुणी नव्हते..