कार्टूननामा-०१(२/२)
मागील भागाता आपण शिनचॕनबद्दल जनरल माहिती घेतली. आता आपण शिनचॕन मधील इतर पात्रांचा परिचय घेऊ.
*शिनचानची फॕमिली*
*हिरोशी*- शिनचानचे बाबा टोक्योतल्या एका खासगी कंपनीत काम करतात. हा माणुस एकदम स्त्रीलंपट आहे. ह्याच्या ३२ वर्षे फेडणे असलेल्या लोनचा उल्लेख हा ह्याचा विकपॉईंट. याला गोल्फ खेळायला आवडते.
*मित्सी*- शिनचानची आई. ही एक गृहिणी आहे. हिला शाॕपिंग आणी आरामाची आवड आहे. शाॕपिंसाठी पैसे नसतील तर ही बया पार्ट टाईम जॉब करते आणी त्या पैशातुन शॉपिंग करते.
*आजोबा-आज्जी*- अकिता शहरात राहणारे हिरोशीचे बाबापण त्याच्यासारखेच आहेत. क्युशू शहरात राहणारे मित्सीचे बाबा तसे एकदम सिरायस कॕरॕक्टर आहेत.
मिसळपाव