Skip to main content

कथा

पैठणी दिवस भाग-३

लेखक गुल्लू दादा यांनी मंगळवार, 15/08/2017 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे. असेच एके दिवशी मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या वडिलांना घेऊन मलमपट्टी विभागात आले. दोघेही एकमेकांवर मारवाडी भाषेत ओरडत आले. वडील मुलाला म्हणत होते, 'मला नाही करायची पट्टी बिट्टी'. त्यांचा मुलगा पण त्यांना प्रतिउत्तर देत होता.

#अनुभव#

लेखक भित्रा ससा यांनी सोमवार, 14/08/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ; माझे हे पहिलेच लेखन सूचनांचे स्वागत अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे. गेल्या वर्षीच्या जानेवारीची गोष्ट. वाडवडिलांची पुण्याई जमिनीच्या रूपात भेटलेली त्यामुळे आमचा शेती हा बाजूउद्योग सुरू असतो . दिवसा संगणक दुरुस्ती व रात्री भिजवणी असा रुटीन ठरलेला होता . हरभरा जोमात आलेला पण पावसाने थोडा दगा दिला त्यावर उपाय म्हणून तुषार सिंचन सयंत्र जोडण्याचा निर्णय एकट्याच्या बहुमताने मंजूर केला.

प्रतिशोध भाग 1

लेखक कऊ यांनी रविवार, 13/08/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला " शीट यार ,खूपच late झाला. एवढा ngo चालवतो हा आकाश , पण एका मेंबरला माझ्यासोबत पाठवू शकला नाही का. मीच मूर्ख जी गेली रांगोळी काढायला. पुन्हा सकाळी जायचय रांगोळी काढायला. गुढीपाडवा ना.. रात्री जागून रांगोळ्या काढा मग सकाळी मस्त तयार होऊन Rally मध्ये भाग घ्या.." स्वतःशीच बडबडत ती चालत होती.[आकाश एका NGO (संस्थेचा) अध्यक्ष..] आणि ती???बिचारी आकाश साठी अन संस्थेसाठी म्हणून रात्री 10.30 ला गेली,रांगोळी काढायला.. तो बैठकीवरून येईपर्यंत लेट झाला आणि म्हणून तिला रांगोळी पूर्ण करून घरी जायला लेट झाला.. 1-1.30 वाजले असतील रात्रीचे... रस्ता सामसूम... ती- "चिटपाखरू पण नाही रस्त्यावर....अस

प्रतिशोध भाग - 2

लेखक कऊ यांनी रविवार, 13/08/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिशोध भाग - दुसरा "ओय , काऊ लक्ष कुठे आहे ग तुझं??कॉफी थंड झाली..हॉट कॉफी कशाला ऑडर केली मग "जमेल तेवढ्या हळू आवाजात सियाल काव्याला ओरडत होता. दर रविवारी यांचा कट्टा जमायचा. आज काव्या आणि सियाल जरा लवकरच आले होते. तोपर्यंत बबलु , श्रीकांत ऊर्फ श्री , संदेश ऊर्फ सँडी यांची स्वारी तिथे पोहचली. बबलु : "काय रे कदम एरवी सांगतो की आमच्यात काही नाही आणि आज बरे दोघ ..बोला तुम्ही ..आम्ही जातो..आम्ही कशाला कबाब मे हड्डी.." "अबे Bmc तु तर तसपण हड्डी सारखाच आहे..मांस आहे कुठे तुझ्यावर.."सँडीच्या हातावर टाळी देत श्री उद्गारला. बबलु : "मेल्यांनो public place वर तरी नीट नाव घ्या माझं..बबलु महादेव चिंच

पैठणी दिवस भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 12/08/2017 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

प्रतिशोध

लेखक कऊ यांनी शुक्रवार, 11/08/2017 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिशोध भाग : 3 आम्ही जेव्हा बारावीला होतो तेव्हा अकरावीला new admission घेतलेल्या मुलांची रैगिंग करायची fashion आली होती..अनु पण आमच्याच ग्रुप मध्ये असायची..कॉलेजमध्ये एक नवीन चेहरा दिसला आम्हाला..अकरावीची नवीन विद्यार्थीनी...कस्तुरी..... कथा पुढे सुरू.. कस्तुरी दिसायला तशी साधीच होती. पण बोलतात ना साधेपणातच खूप सौंदर्य असतं.पण तुझे हे मानलेले भाऊ त्यांनी शेवटी तिची पण रैगिंग केलीच.रागवलो होतो तेव्हा या सर्वांवर. पण हळूहळू आम्हाला समजल की कस्तुरी अभ्यासात खूप हुशार तर होतीच शिवाय तिला सुध्दा आमच्यासारखी ट्रेकिंगची आवड होती. कॉलेजमध्ये शांत राहायची ती. मला तिच्या बद्दल अजून जाणून घ्यायच ह

चॅलेंज - भाग ३

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 08/08/2017 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज भाग ३ दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली. “लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS लिहिणारे.... बघूया कसं जमतंय. बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”.

ती सध्या काय करते

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 04/08/2017 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल.. कुठे असेल .. ती सध्या काय करते ? ********************************************************************************* आज तिला पाहिलं कशी दिसतेय हि चेह-यावर सूज आहे कि काय , किती बेढब झालीय हि आता . ती तेव्हा कशी दिसत होती आणि आता कशी दिसतेय .

पैठणी दिवस भाग-१

लेखक गुल्लू दादा यांनी गुरुवार, 03/08/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.