Skip to main content

कथा

ध्यान

लेखक सौन्दर्य यांनी शुक्रवार, 14/07/2017 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
‘ध्यान' नववीच्या वर्गात असताना एका नवीन मुलाने आमच्या वर्गात प्रवेश घेतला होता. कोकणातल्या कोणत्यातरी गावाहून तो पहिल्यांदाच मुंबईला आला होता. नाव किशोर तेली. उंचीने आमच्या वर्गात तो सर्वात बुटका होता, इतका की वर्गातल्या मुलीही त्याच्याहून उंच होत्या. वर्ण सावळ्याची गडद छटा, शरीराने किंचित स्थूल, युनिफॉर्म अंगाला अगदी घट्ट बसलेला, केस बारीक कापलेले आणि कोळसा घासल्यासारखे काळे कुळकुळीत. तो फारसा कधी हसायचा नाही पण हसल्यावर त्याचे पांढरेशुभ्र दात उठून दिसायचे. वर्गात त्याच्या बरोबर एकाच बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याशिवाय तो इतर कोणाशी फारसा बोलायचा देखील नाही, अगदीच शांत असायचा.

लॉटरी

लेखक aanandinee यांनी बुधवार, 12/07/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे ते कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं.

ओटी

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 10/07/2017 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
ओटी .... !! पंढरी- रोजसारखाच आजही त्याला घरी जायला तसा उशीरच झाला होता. बरोबरच होतं म्हणा, आजकाल सुट्ट्या चालू असल्यामुळे लोकांची ये जा वाढलेली असणं अपेक्षितच होतं. त्यात याची ड्युटी कोकण पट्ट्यावर , म्हणजे पाहायलाच नको. थकून जायचा बिचारा , पण तो थकवा फार काळ काही टिकायचा नाही , सुट्टीवर ... मामाच्या गावी जाणारी लहान लहान मुलं , त्यांचा तो उत्साह ... थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. अन त्यात आज गजर्याचा दिवस होता, उद्या सुट्टी म्हणजे आज मजा करायला मोकळा होता तो. आजची ड्युटी संपली होती, आता रोकड आणि उरलेली तिकिटं परत केली की चंद्री कडे जायला हा मोकळा. * * * * * * * “काय मावशे ??

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ४

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 09/07/2017 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ४ भाग १ ------ http://www.misalpav.com/node/40043 भाग २ ------ http://www.misalpav.com/node/40076 भाग ३ ----- http://www.misalpav.com/node/40095 गाईडने सांगीतलेली हि माहिती ऐकुन मयुरा , नेहा आणी राधा या तिघीही थरारुन गेल्या . तरीही नेहाने शंका विचारली . "पण इथे असं रात्री अचानक कोण येतं हे या मयुरखेडा गावातल्या लोकांनी कधी जाणुन घेण्याचा प्रयत्न केला नाही का ?

कार्टूननामा-०२ (संपुर्ण)

लेखक औरंगजेब यांनी गुरुवार, 06/07/2017 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक http://www.misalpav.com/node/40059 http://www.misalpav.com/node/40097 टीप:-मागील भागात आलेल्या प्रतिक्रिया वाचून ह्या भागापासून मी ह्या लेखमालेचा ढाचा बदलणार आहे नुकतीच भारतातील टॉप १० कार्टून्स ची लिस्ट प्रसिद्ध झाली आहे.

तळ्याकाठी

लेखक aanandinee यांनी सोमवार, 03/07/2017 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याकाठी “तू तर नेहेमी त्याचीच बाजू घेणार. तुला सांगण्याचाही काय उपयोग ! तरी तुला बजावतोय मी, माझ्या करीअरमधे तो ढवळाढवळ करतो तेवढी पुरे, पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊबिऊ सगळं मी विसरून जाईन.” त्याने आईला निक्षून सांगितलं. “अरे पण चिंटू,” आई समजावणीच्या स्वरात सांगू लागली. “चिंटू म्हणू नको मला, हजारदा सांगितलाय, राजस म्हण. ओजसला कसं बरोबर ओजस म्हणतेस. मी काय आयुष्यभर चिंटूच रहायचं का?” राजसने चवताळून विचारलं. “बरं, बरं, चुकलंच माझं! पण राजस, दादा नव्हता गेला त्यांच्याकडे. तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी, तुझ्याबद्दल.

नियतीचे वर्तुळ

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 02/07/2017 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती. रेखाचे वडील तीन वर्षांपूर्वीच एका खाजगी शाळेतून शिपाई म्हणून रिटायर झाले होते.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

हरणेश्वराय नम:

लेखक सौन्दर्य यांनी बुधवार, 28/06/2017 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
हरणेश्वराय नम: “जा, दूर हो माझ्या नजरेसमोरून" स्व:ताच्या डोळ्यातील अश्रू पुसत, हुंदके आवरत सीतामाई कडाडल्या. “स्व:ताच्या मोहक रंगरुपाने मला फसवलेस, रावणासारख्या दुष्ट व्यक्तीला मदत केलीस आणि माझ्या नशिबी माझ्या प्रिय पतीचा विरह लादलास त्याबद्दल मी तुला कदापि क्षमा नाही करणार.” “माई, माझी बाजू तर ऐकून घ्या” तो मृगाधीपती सांगण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला मध्येच अडवत सीतामाई पुनः कडाडल्या. “कसली बाजू ? हेच ना की मला तुझ्या रुपाने भुलवलंस, मला मोहात पाडलंस आणि मी मोहात पडले” डोळ्यातील अश्रू पुसत सीतामाई संतापाने ओरडल्या. “जा, आता हेच तुमच्या भाळी लिहिले आहे.