इंग्लीश स्कूलचं फॅड
कथा आणि व्यथा
इंग्लीश स्कूलचं फॅड
गावचा नामा त्या दिवशी भेटला.
बॅंकेच्या दारात.गडी जरा घाईतच होता.हातात बरीचं कागद होती.
त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं होतं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.
रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचं वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला.रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून ."
मी:"आरं,एवढ पैसं कशी आणणाऱ ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्ह? उचल घेणारं .बायको भी समजदार.
मिसळपाव