क्रीडा
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा - बॉर्डर गावसकर ट्रॉफी
काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी.
भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी
मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव
ता सार्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव
चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.
साक्षात विक्रमादित्य सुनील गावसकरनी गायलेलं (हो-"तो" सुनील गावसकर. आम्ही देवाला अहो जाहो करत नाही) शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आज दुपारपासून लूप वर चालू आहे. काय करावं ह्या खेळाचं?
द ब्यूटिफुल गेम
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट बरं का! हे यूरोपियन्स, आफ्रिकन्स आणि दक्षिण अमेरिकन लोकं होते ना - त्यांनी आपली पुराणं वाचली आणि त्यांना किडा आला समुद्रमंथन करण्याचा. म्हणाले आपण अॅटलान्टिक महासागर ढवळून काढू. झालं! लोकं लागली कामाला. अँडीज कि आल्प्सचा एक पर्वत घेतला, अॅझटेकांच्या केत्झालकोआत देवाची रस्सी केली आणि लागले की समुद्र घुसळायला. आता पाश्चिमात्यच समुद्र तो! त्यातून पहिली आली ती हिरे माणकं नेली आफ्रिकन्सनी. मग आली वाईन - ती फ्रेंच लोकं घेऊन गेली. मग आलं सांंबा नृत्य - ते नेलं ब्राझिलियन्सनी.
मेरे प्यारे दुश्मन
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ,
First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही.
अॅटिट्यूड वाला मुण्डा!
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान.
२००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.
टी -२० विश्वचषकातील भारताची घोडदौड
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा मध्यावर आलेली आहे.. या स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकत भारत ग्रुप २ मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.. या लेखाच्या माध्यमातून आपण भारतीय संघाच्या एकंदर कामगिरी बद्दल बोलणार आहोत.
पहिल्या सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि विश्वचषकाला धडाक्यात सुरूवात केली. या सामन्यानंतर भारतीय संघाची आणि धुवांधार अर्धशतक झळकावनाऱ्या विराटची खूप वाहवा झाली.
Sports Diplomacy means क्रीडा राजनय
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.
Sports Diplomacy means क्रीडा राजनय
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.
महिला क्रिकेट, आशिया कप, T-20
आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे
भाग घेणारे संघ खालील प्रमाणे
भारत
श्रीलंका
पाकिस्तान
थायलंड
बांगलादेश
मलेशिया
युएई
हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता.
मिसळपाव