Skip to main content

क्रीडा

"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

लेखक फारएन्ड यांनी शुक्रवार, 31/12/2021 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..." १९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या.

कॅप्टन कूल - महेंद्रसिंह धोनी

लेखक सुजित जाधव यांनी बुधवार, 15/12/2021 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये १२ धावांची गरज आहे....प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ३० पेक्षा अधिक धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे..अश्या वेळेस विश्वातला कोणताही कर्णधार शेवटची ओव्हर संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला देणे पसंत करेल.....पण ३ यष्टयांच्या मागे उभ्या असलेल्या कर्णधाराच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने शेवटची ओवर फक्त ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जोगिंदर शर्माला दिली आणि इथेच भारतीय क्रिकेट मधल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तो सामना होता पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाचा अंतिम सामना.

निराशजनक पराभव.....

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 01/11/2021 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
२०२१ च्या टी-२० विश्वचषकातील काल भारताचा न्यूझीलंड संघासोबत एक महत्त्वाचा सामना होता . खरतर भारत आणि न्यूजीलंड दोघेही आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध हरल्यानंतर ह्या सामन्यात विजय मिळवणे पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना गरजेचं होत.            २०-२० क्रिकेट प्रकारातील जगातील सर्वोत्कृष्ट बॅटर च्या यादीतील फलंदाजांनी खचाखच भरलेल्या भारतीय संघाकडून नेहमीप्रमाणे खूप अपेक्षा होत्या पण मागच्या सामन्याप्रमाने इथेही १३३ कोटी भारतीयांच्या पदरी निरशाच पडली. सुरुवात झाली ती सलामीला आलेल्या ईशान किशन च्या विकेटने.

आरिगातो टोक्यो !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 08/08/2021 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
आरिगातो टोक्यो ! मार्गरेट मीड नावाची अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist) होती. तिचं खूप गाजलेलं विधान होतं की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा टप्पा - आगीच्या किंवा चाकाच्या शोधापेक्षाही जास्त - माणसाच्या "मनुष्यत्वाचा" पहिला पडाव होता ते म्हणजे पहिल्या तुटलेल्या मांडीच्या हाडाचं (fractured femur) बरं होणं. मांडीचं हाड हे शरीरातलं सर्वांत मोठं हाड. ते तुटलं तर माणूस हालचाल करू शकणार नाही आणि अर्थातच तो माणूस भक्षकांसाठी सोपं भक्ष्य बनेल. बाकी कुठल्याही वन्य जीवांचा कळप अश्या कमजोर प्राण्यांना मागे ठेवून बाकी धडधाकट सदस्यांना घेऊन पुढे जातो.

|| गे आये ऑलिम्पिकामाते ||

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/07/2021 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
|| गे आये ऑलिम्पिकामाते || बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा ! दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा | आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत.

संदर्भांच्या शोधात

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 20/04/2021 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्‍यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा! बहुतेक वेळा मी क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल लिहितो कारण खेळांमधली सकारात्मक ऊर्जा मला भावते. पण सध्या चालू असलेल्या क्रिकेटचा देखील काही संदर्भ लागत नाही हो. आधी त्या अतिभव्य रिकाम्या स्टेडियम्समध्ये उगाच रतीब टाकल्यासारख्या टी-२० आणि वन डे खेळवल्या गेल्या. ते पण एकीकडे विजय हजारे ट्रॉफीसारखी महत्वाची डोमेस्टिक स्पर्धा चालू असताना आणि जुलै - ऑगस्टमध्ये पुन्हा इंग्लंडचा दौरा असताना.

आमचा Valentine Week - मोठी तिची साऊली

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 13/02/2021 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद | ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद || - प्रबुद्ध सौरभ महान व्यक्तीला चांगल्या व्यक्तीपासून वेगळं करणारा हा एकमेव गुण - जि़द! एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा हट्टीपणा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करण्याचा चिवटपणा. यश मिळवण्यासाठी वाटेल ते आव्हान स्वीकारण्याचं धाडस. महान लोकांची एक जमात असते ती संकटांच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याशी दोन हात करणार्‍यांची. पण काही लोकं तर त्याही पुढे जाऊन आव्हानांसमोर, संकटांसमोर धैर्यानी सोडा.... उर्मटपणानी, माजात उभी राहतात.

आमचा Valentine Week - आँखोंकी गहराइयाँ |

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/02/2021 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' कि लगाए न लगे और बुझाए न बने | . . . म्हणजे नक्की काय हे खरंतर आपल्यातल्या निम्म्या होऊन जास्त लोकांना कळालेलं नसतं. काही लोकं तर हा शेर ऐकून 3 idiots मधल्या प्रोफेसर सारखा "अरे कहना क्या चाहते हो?" असा चेहरा देखील करतात. पण एक तर 'ग़ालिब' आहे आणि इश्क सुद्धा आहे म्हणजेच काहीतरी जोरदार काम असणार इतकं आपल्याला कळतंच की. ऐकायला भारी वाटतंय, "दिल से" मधली काळ्या - पांढर्‍या कपड्यांत नाचणारी मनीषा कोईराला आठवतीये - वाईट काय त्यात? चांगलंच आहे की. आणि कळत अथवा झेपत नसलेल्या गोष्टी आवडू नयेत असं थोडंच आहे? आता नाही आम्हाला चेस मधलं काही कळत.

आमचा Valentine Week - क्रशामि क्रशावः क्रशामः

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 09/02/2021 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
C - R - U - S - H - CRUSH ज्या काही थोड्याफार भाषा कळतात / समजतात किंवा आवडतात त्यामध्ये इंग्रजी Crush ला समर्पक समानार्थी शब्दच सापडत नाही हो. आमची मराठी मुळातच रांगडी आणि इरसाल. Crush च्या नाजुकपणाला इथे जागा कमीच. संस्कृत ही साक्षात देववाणी. तिथे Crush मधली अगतिकता नाही. हिंदी मध्ये Crush मधला छिछोरपणा नाही. उर्दू Crush सारख्या अर्धवट गोष्टींमध्ये इंटरेस्टच घेत नाही. तिथे म्हणजे एकदम तबाही का मंजर - आग का दर्या है और डूब जाना है वगैरे मयखान्यातला सीन. पंजाबीत "मर जावां गुड खाके" असलं तरी Crush मधलं अव्यक्त राहणं पंजाबीला मंजूर नाही.

गँग ऑफ बदलापुर -

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 20/01/2021 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?" काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता.