Skip to main content

क्रीडा

क्रिकेटचा इसाप हरपला

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 06/02/2025 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ -- भालाफेक

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 10/08/2024 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशासाठी पहिलंच सुवर्णपदक व मैदानी खेळातील पहिलं पदक, दक्षिण आशियातून मैदानी खेळातील आतापर्यंतचं केवळ दुसरं podium finish आणि ९२.९७ मीटरचं नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड करून, अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी काल इतिहास रचला. काहीशी अपरंपरागत धाव असूनही, अर्शद नदीमने बाहूबळाच्या जोरावर, अगदी दुसऱ्याच प्रयत्नात, कोणालाच अपेक्षित नसेल अशी, ऐतिहासीक कामगिरी केली. एवढंच नव्हे, तर अगदी शेवटच्या, सहाव्या प्रयत्नातही, अशक्य भासणारा ९० मीटरचा टप्पा परत एकदा सहज पार करून, एकाच स्पर्धेत दोन प्रयत्नात अशी कामगिरी करणारा, आतापर्यंतचा तो एकमेव खेळाडू ठरला.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 20/07/2024 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.

स्वप्नपूर्ती..!!

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 01/07/2024 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, कित्येक वेळा तुम्ही ती मिळवण्याच्या अगदी समीप जाता पण ती प्राप्त करनं तुम्हाला शक्य होत नाही. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो, माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या feeling पेक्षा तो कमी नसतो. सेम feeling व आनंद शनिवारी भारतीय खेळाडू, क्रिकेटरसिक व संपूर्ण भारतवर्षाने अनुभवला..!! ११ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली..!

ट-२० विश्वचषक अंतिम सामना

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 28/06/2024 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भा

लिव अंधभक्ता लिव

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 07/05/2024 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ घोषित

लेखक वेडा बेडूक यांनी मंगळवार, 30/04/2024 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
बीसीसीआयने १ जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्य संघातील 15 आणि तीन राखीव खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्याकडे टी 20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर आयपीएल स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा धनी ठरत असलेल्या हार्दिक पंड्या याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

हांगचौमध्ये आपलं स्वागत!

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 21/09/2023 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
Team India हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत.

फिटनेस सोपी गोष्ट आहे

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 11/07/2023 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
फिटनेस ५० आणि फिटनेस १०० कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम सर्वांना नमस्कार. सर्व जण पावसाळ्यात येणा-या परिस्थितीमध्ये सुरक्षित असतील अशी आशा करतो. फिट राहणं किती सोपं आणि जमण्यासारखं आहे, ह्याबद्दल माझे अनुभव शेअर करत आहे. अनेक वर्षांपासून सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि योग असे वेगवेगळे व्यायाम करत गेल्यामुळे आणि त्याला जोडून जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे फिटनेसची आवड होत गेली आणि त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. व्यायामासाठी वेळ काढणं किंवा फिट राहणं हे जितकं समजलं जातं तितकं अजिबात अवघड नाही हे लक्षात आलं.