Skip to main content

क्रीडा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

लेखक मार्गी यांनी बुधवार, 04/09/2019 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
४: रामपूर बुशहर ते टापरी सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर २९ जुलैची संध्याकाळ रामपूर बुशहरमध्ये गेली. दोन दिवस शिमला आणि नार्कंडा असं आल्यामुळे इथे फार गरम होत आहे. संध्याकाळी काही वेळ तर ताप आल्यासारखं वाटलं. चांगला आराम होऊ शकला नाही.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

लेखक मार्गी यांनी सोमवार, 26/08/2019 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा २९ जुलै! ह्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज नार्कंडावरून रामपूर बुशहरला जायचं आहे. काल नार्कंडाला चांगला आराम झाला. रात्री पाऊसही झाला. २७०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर रात्री काही त्रास झाला नाही. आजचा टप्पा तसा सोपा आहे, कारण आज चढाव अजिबात नाही आहे. उलट मोठा उतारच आहे.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

लेखक मार्गी यांनी सोमवार, 19/08/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
२: शिमला ते नार्कण्डा सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना २५ जुलैला ट्रेनने स्पीति- लदाख़ सायकल प्रवासासाठी निघालो. मला निरोप देण्यासाठी अनेक सायकल मित्र व घरचे आले. ट्रेनमध्ये गेल्यावर सायकलची पिशवी सहजपणे बर्थच्या खाली ठेवली. खूप आरामात फोल्ड केलेली सायकल व इतर सामानाची पिशवी बर्थच्या खाली मावली तेव्हा बरं वाटलं. आता सायकल ट्रेनमध्येही आरामात नेता येते आहे! सायकल अशा प्रकारे फोल्ड करण्यासाठी त्याचं कॅरीअर, दोन्ही चाकं, स्टॅण्ड, सीट आणि दोन पेडल काढावे लागतात.

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 15/08/2019 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना सर्वांना राम राम! नुकताच किन्नौर- स्पीति सायकल प्रवास केला. त्याविषयी आता सविस्तर लिहिण्यास सुरुवात करतो आहे. प्रत्येक सायकल प्रवास खूप काही शिकवून जातो, समृद्ध करून जातो. ह्या सायकल मोहीमेमध्येही खूप काही शिकायला मिळालं. एका प्रकारे स्पीतिमध्ये सायकल चालवण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. हा सायकल प्रवास फक्त सायकलिंग नसून त्याला एक सामाजिक उद्दिष्ट होतं. आरोग्य, फिटनेस, पर्यावरण ह्याविषयी जागरूकतेसंदर्भात संदेश आणि वेगवेगळ्या लोकांसोबत व गटांसोबत बोलणं हासुद्धा त्याचा एक भाग होता.

माझं "पलायन" १४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 23/07/2019 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.