मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंग बदलताना (प्रकाशचित्र)

सर्वसाक्षी · · कलादालन
झाडावरून उतरून लाल मातीच्या जमिनीवर येताच मातीचा रंग अंगावर धारण करणारा सरडा. तोंड , मान, गळा, पुढचे पाय वगैरे लाल झालेले आहे. मागचे अंग भुरकट आहे; तो रंग बहुधा झाडावर असताना झाडाच्या खोडात मिसळुन जायला सोयिस्कर असावा. अंगावरचे खवले चिलखताची आठवण करुन देतात तर पायाच्या नख्या अणकुचीदार शस्त्रासारख्या दिसतात. पळताना एकवार चोहोकडे पाहणार्‍या डोळ्यात 'सावधान' चे भाव आहेत.
लेखनविषय:

वाचने 14100 वाचनखूण प्रतिक्रिया 36

विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 22:17
केवळ चिकणा सरडा आहे! :) साक्षिदेवा, हे सरडे तुलाच रे बरे दिसतात! :) असो, अप्रतीम फोटू.... आपण तिच्यायला पुन्हा या सरड्याच्या प्रेमात आहोत! :) (सरडे, पाली हे प्राणी खूप आवडणारा) तात्या.

भाग्यश्री Tue, 09/16/2008 - 22:29
अप्रतिम!! हे असले प्राणी काय वाट पाहात थांबतात का हो तुमच्यासाठी? हा सरडा म्हणजे अगदी 'सर्वसाक्षींना फोटोसाठी पोझ दिल्याखेरीज रंग बदलणार नाही' अशा थाटात उभा आहे !! :)

In reply to by भाग्यश्री

ऋचा Wed, 09/17/2008 - 11:36
भाग्यश्री शी सहमत!! हा सरडा फेविकॉलवर उभा होता का? हलला कसा नाहीये?? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by भाग्यश्री

राघव गुरुवार, 09/18/2008 - 18:22
असेच म्हणतो! मस्त आलाय फोटु :) खारीच्या फोटुची वाट पाहतोय. मुमुक्षु

रामदास Tue, 09/16/2008 - 22:48
आधीचा सरडा तुमचाच होता ना? पाळीव आहे का काय? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

सर्वसाक्षी Wed, 09/17/2008 - 22:38
मिसळपावकरांनो, अभिप्रायांबद्दल आभारी आहे. सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला.

In reply to by सर्वसाक्षी

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/18/2008 - 09:46
>> सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला. मला किती वेळा प्रयत्न करूनही खारींचे फोटो नाही मिळाले चांगले आणि तुम्हाला रस्ता ओलांडतानाच .... तुम्ही रस्त्यातून जातानाही कॅमेरा गळ्यात अडकवून चालता का तुमचं आणि सरड्यांचं काही पेसल कनेक्सन आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वसाक्षी गुरुवार, 09/18/2008 - 16:15
आपल्याकडे खारपण आहे. टाकु पुन्हा कधीतरी. हे चित्र सुट्टीत भटकायला गेलो असता घेतलेले आहे. सकाळी घरच्यांची आवराआवरी सुरू होती, मी जरा भटकायला म्हणुन बाहेर पडलो. विश्रामगृहाचे आवार मोठे होते, ते पार करुन बाहेर आलो होतो. सकाळी पक्षी, फुलपाखरे वगैरे टिपता येण्याची शक्यता असल्याने गळ्यात कॅमेरा होताच. बाकी घरातसुद्धा माझा कॅमेरा कायम सज्ज असतो हो!:)

मदनबाण गुरुवार, 09/18/2008 - 09:50
सरडे महाशयांनी सॉलिड पोझ दिली आहे व तुम्ही ती सुंदरपणे टिपली आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

विसुनाना गुरुवार, 09/18/2008 - 17:04
इतके घाईचे छायाचित्र वेगाने घेण्यात प्रकाशचित्राचे यश आहे. फोटोचा फोकस परफेक्ट. रंगही लाजवाब!

आपला आभि गुरुवार, 09/18/2008 - 17:09
खरच फोटो घेनार्‍याला मानलं बुवा............तुमची समयसूचकता लाजवाब....

मिंटी गुरुवार, 09/18/2008 - 17:56
मी खुप पुर्वी काढलेला फोटो आहे हा.....त्यावेळी मी शिकत होते फोटोग्राफी करायला.....त्यामुळे फार चांगला नाही आलेला हा फोटो पण एक प्रयत्न :)

In reply to by विनायक प्रभू

विसोबा खेचर Sun, 09/21/2008 - 08:55
सरडे मेरे साथी मधे हिरो शोभेल हा भाउ हे बाकी मस्त! :) तात्या. स्वगत : ह्या विनायकला एकदा भेटलं पाहिजे! :)