Skip to main content

जीवनमान

लोकल मधले लोकल्स भाग- २

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 27/07/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग एक ​आत मध्ये तीन जणांच्या सीट वर एक पुरूष, आणि दोन स्त्रिया बसलया होत्या. प्रथमदर्शनी ते एक कुटुंब वाटत होतं. कोपऱ्यावरच्या सीटवर बाबा प्रवासी मध्ये आई प्रवासी आणि खिडकी कडे बेटी प्रवासी. बेटी प्रवासी वयवर्षे असतील अंदाजे २५ ते २८ च्या आसपास. आणि हिशोबाने तिचे आई बाबा होते. समोरच्या मोठ्या सीटवर नेहमीचे कंटाळलेले चेहरे मोबायलात डोकी घालून बसलेले होते. त्यातल्या खिडकी दुसऱ्या क्रमांकाच्या प्रवाशाने त्याचं ओझं त्याच्याच मांडीवर घेतलं होतं.

रश्दी अबाझा

लेखक खडूस काका यांनी मंगळवार, 25/07/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
रश्दी अबाझाचा जन्म तेरेझा लुईगी, जी इटालियन होती आणि सैद अबाझा, जो जन्माने इजिप्तीयन होता या दांपत्याच्या पोटी ३ ऑगस्ट १९२६ ला झाला. रश्दी अबाझाचे कुटुंब खूप श्रीमंत होते आणि इजिप्तच्या राजकारणात मोठे स्थान होते. रश्दी च्या कुटुंबात बरेच लोक राजकारण, वकिली, पत्रकार, लेखक होते, पण त्याला शरीर सौष्ठव मध्ये रस होता. त्याचे अरबी सोबत इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच या भाषांन्वर प्रभुत्व होते. १९४८ मध्ये रश्दी एका कॅसिनो मध्ये बिलियर्ड्स खेळत असताना त्याला कमाल बरकत नावाच्या दिग्दर्शकाने पाहिले, त्याला पाहून कमाल इतका प्रभावित झाला कि आपल्या चित्रपटात प्रमुख भमिका दिली.

नाच्या बेडुक

लेखक हेमंत ववले यांनी शनिवार, 22/07/2017 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता.

आमचं पानीपत- द बिगीनिंग.

लेखक भीमराव यांनी शुक्रवार, 21/07/2017 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गोष्टीची सुरुवात होते ती एका चकाचक मल्टीन्याशनल कंपनी पासुन, अँपरेंटीस अँक्ट च्या कृपेने आमचा येथे प्रवेश झाला हे सुरुवातीलाच सांगुन टाकलेलं बरं, आमचं आव्या मी अन तात्या या सर्वांच्या एका असामान्य संघर्षाची ही कथा, कंपनी मधेच आमची ओळख झालेली, तात्या व मी एकाच डिपार्टमेंट साठी सिलेक्ट झालो होतो, तर आव्याची तात्यासोबत कँटीन मधे ओळख झाली होती, आमचं आव्या सांगलीच्या कुठल्याशा कॉलेज मधुन यांत्रिक अभियंता झालेलं, मी सोलापुरातुन विद्युत अभियांत्रीकी शिकुन आलेलो, आणि आमच्यामधले सर्वात अँक्टीव, मोस्ट हँडसम असे तात्याबा पुण्यात शिकलेले होते, ग्रामीण भागतल्या कॉलेजात ईंजिनेरींग शिकणाऱ्या तमाम कार्

लोकल मधले लोकल्स.

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 20/07/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते.

आला पावसाळा आला पावसाळा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 14/07/2017 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून) || आला पावसाळा आला पावसाळा || आला पावसाळा आला पावसाळा प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा मनपाचे रस्ते खड्डेरी दुचाकी तयामध्ये घातली चुकवित चालली पाणी गाळा समोरून पहा कोण येतसे त्याचीही अवस्था तशीच असे उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा चारचाकीवालाही सुरक्षित नसे खड्डयात आदळता शिव्या देत असे न जाणो मोठी खोक ये कपाळा जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी पुढिल ऋतूची वाट पाहूनी आरोग्यासी वित्त आपले जाळा - पाषाणभेद

आळशांची कहाणी (अंतिम भाग )

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी शुक्रवार, 07/07/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
उद्घाटनाच्या दिवशीचा कार्यक्रम खालील प्रमाणे होता. :- १) दरवाजावरची फीत कापणे. २)राजेसाहेबांचे स्वागत व सत्कार ३)राजेसाहेबांचे भाषण ४)पदवीदान समारंभ प्रथम मुख्य शृंगारलेल्या दरवाजाला लावलेली फीत राजेसाहेबांनी कात्रीने कापून विद्यालयाचे उद्घाटन झाल्याचे स्वतः जाहीर केले. मग राजेसाहेबांचा थोडक्यात परिचय प्राचार्यांनी करून दिला. तेच कसे योग्य राजे आहेत हेही विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवले. इतर विद्यार्थी व पदवीची अपेक्षा करणारे विद्यार्थी आपापल्या बिछान्यांना व्हील चेअर सारखी चाके बसवून , ते ढकलत तिथे आलेले होते.

तव्या वरून डायरेक्ट ताटात

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/07/2017 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
एम आय डी सी ला असताना माझा एक मारवाडी उद्योजक मित्र होता … एकदा गप्पात विषय निघाला अन तो म्हणाला "आमच्या कडे सकाळ संध्याकाळ गरम पोळ्या लागतात सर्वाना..

आळशांची कहाणी ( भाग १ )

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी शुक्रवार, 07/07/2017 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आता श्रावण महिना चालू होईल. म्हणजे कहाण्यांचा महिना. आपण मागच्या पिढीतील असाल तर नक्कीच कहाण्या ऐकल्या असतील. किंवा गंमत म्हणून तरी वाचल्या असतील. साधारणपणे चांगली कामे करणारे, सात्विक वागणारे, किंवा सात्त्विक वागण्यावर भर देणाऱ्या लोकांवर कहाण्या लिहिल्या जातात. पण आळशी माणसांवर कोणी कहाणी लिहिल्याचं दिसत नाही. कहाणी लिहिणाऱ्यांना माणसाचा हा परंपरागत गूण लक्षात आलेला दिसत नाही. ही कहाणी वाचल्यावर कदाचित आपणही नवीन कहाणी रचू शकाल. या कहाणी मुळे जर कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या गेल्या तर आधीच माफी मागत आहे.

खोटी नाणी

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 05/07/2017 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
ही मैत्री, प्रीती, ही तर खोटी नाणी बाजार भरविती गाऊन त्यांची गाणी मित्रहो, या आहेत रॉय किणीकरांच्या एका कवितेतील दोन ओळी. यांनी माझ्या मनात कायमचे घर केलेले आहे. ते म्हणतात ते अगदी खरे आहे. मैत्री व प्रीती या दोन्ही प्रांतांमध्ये असंख्य खोटी नाणी कायम खुळखुळत असतात. माझ्या काही परिचितांना त्यांच्या आयुष्यात अशा खोट्या नाण्यांचे चांगलेच अनुभव आले. त्यांनी ते मला सांगितले. मला ते भावले.