जीवनमान
#मिपाफिटनेस दिल की धडकन का मॉनीटर - भाग २
भाग-१ : ....आता इथपर्यंत आपण मोजमाप केली, बरीच आकडे मोड केली, भाग-२ मध्ये ही सगळी आकडे मोड प्रत्यक्ष वापरायची कशी हे बघणार आहोत!...
----------------------------------------
आपण काही परिभाषा बघूयात.
१. इझी रन - ७०% हार्ट रेट रेंजमधे राहून केलेले रनिंग
२. रिकवरी रन/जॉग - ६५% हार्ट रेट रेंजमधे राहून केलेले रनिंग
३. टेंपो रन - ८५% हार्ट रेट रेंजमधे राहून केलेले रनिंग
४. व्हीओटू मॅक्स (किंवा माझ्या भाषेत - वॉमीट लिमीट) - ९०% ते ९५% हार्ट रेट रेंज मधे केलेले रनिंग.
५.
(why is there nothing rather than something ???????)
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
आयुष्याची गाडी
रिकामी दिसली एक गाडी
त्यात जाऊन बसलो मी
आता मजा येईल प्रवासाची
म्हणून स्वतःशीच हसलो मी
कधी वाटलं गाडीला थांबवावं
कधी सुसाट पळवावं तिला
पण आयुष्य नामक चालकाने
माझा पूर्ण भ्रमनिरास केला
मी नेईन तसंच जायचं तू
म्हणालं मला माझं आयुष्य
कसला हट्ट करायचा नाही
विचारायचं नाही कधी भविष्य
घडवीन तुला सफर मी आता
एका वेगळ्याच जादुई दुनियेची
कुठे फार थांबायचं नाही आपण
आणि घाईही नाही करायची
आलास जसा जन्माला
सगळे रंग तू बघून घे
लक्षात नाही यायचा खेळ हा
हे पहिल्यांदा समजून घे
तुझ्यासारखेच इतर अनेक
भेटतील तुला पावलोपावली
तू मात्र असशील एकटाच
बरोबर फक्त तुझीच सावली
वाटेल तुला तूच करतोस सगळं
पण तो
काव्यरस
सत्तेतली मिश्किली आणि विवेक
काल माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस क्लबात. त्यांनी "एक असाधारण वाचक" सादर केलं. हा "अॅलन बेनेट" लिखित ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उपस्थित राहणं हा नितळ सुंदर, निव्वळ अप्रतिम अनुभव होता.
पुरंदरे ताई थोर आहेत. ग्रेट्ट आहेत. मी त्यांचा पंखा/फॅन आहेच. विविध भाषांवरची त्यांची हुकुमत , व त्या- त्या भाषेतलं सहित्य समजून घेणं हे सगळं तर त्यांच्याठायी आहेच पण एका भाषेतला मज्कूर दुसऱ्या भाषेत नेमक्या आशयासह पोचवणं हे काम लै अवघड. पण ह्या त्यातही वाकबगार आहेत.
असो.
आठवणींच्या हिंदोळ्यावर! (पुरवणी लेख)
मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.
हे सांगण्याकरिता मी मूळ धाग्यावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला त्याचा हा पुरवणी धागा काढण्याचा विचार करावा लागला.
त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे.हे सर्व अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे वर्णन आहे. तेव्हा मी ६-८ वीत असेन.
अदृष्य हात
चाले कशी काय ही अर्थव्यवस्था चाले कशी काय?
अदृष्य हाताची ही सारी सारवासारव नव्हे काय?
पैसा म्हणजे काय, सांगा पैसा म्हणजे काय?
मानवनिर्मित मूल्यवाचक, म्हणजे पैसा नव्हे काय?
पैसा करतो काय, सांगा पैसा करतो काय?
ज्याचे जसे कर्म तैसे त्याचे माप तो भरे नव्हे काय?
कर्म म्हणजे काय सांगा, कर्म म्हणजे काय?
भांडवल जमीन वापरून श्रमदान म्हणजे कर्म नव्हे काय?
कर्म करते काय सांगा, कर्म करते काय?
वस्तू आणि सेवा कर्मच निर्माण करी नव्हे काय?
त्याला मिळते काय, सांगा कर्मचाऱ्याला मिळते काय?
मालक फेकेल तेवढा तुकडा, त्याचाच नव्हे काय?
श्रेष्ठ नव्हे काय, त्याचे योगदान श्रेष्ठ नव्हे काय?
योग्यतेने नव्हे, श्रेष्ठत
काव्यरस
'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग १ (पर्यावरण दिनानिमीत्त)
निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!
किस्सा-ए-कोकण रेल्वे
चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे, मँगलोर एक्स्प्रेस ने मी ठाण्याहुन कणकवली ला निघालो होतो. आयत्या वेळी बेत ठरल्या मुळे, रेइजर्वेशन कन्फ़र्म होणे शक्य नव्हते, म्हणुन टाईम्स ऑफ़ वींडीया घेत्ल आणि. निघलो. S ३ च्या दारत शिरलो. टीसी महाशयांना सीट साठी हटकल तर साहेबनि असा काय लूक दीला कि त्यांच्याशी सोयरिकच करायला मागत होतो. मग सोबत घेतलेल टाईम्स ऑफ़ वींडीया दारा कडे अंथरला आणि बैठक जमवली.
गाडी १०.३० च्या सुमारास ठाण्याहुन सुटली, दोन तीन प्रवासी सामान घेउन धावाधाव करत होते. गाडी पारसीक बोगद्याच्या बाहेर पडल्यावर माझ्या शेजरी अजुन एक जण पेपर टाकुन बसला.
मिसळपाव