Skip to main content

जीवनमान

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 10/10/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.

डोळ्यांनी फळे खावित का?

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 30/09/2021 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे: फळे ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते.

ब्रेथलेस

लेखक पाटिल यांनी शनिवार, 25/09/2021 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वगैरे

पंचतत्व

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतत्व अनंत आकाश पाहता मन माझे मोठे झाले तेच आकाश मनात कोंबले क्षणात सुक्ष्म अ‍ती लघू झाले ||१|| विस्तीर्ण जलाशय तो सागर त्यापुढती मी यकश्चित केवळ नाव घडवली फळकुट घेवून लिलया पार कराया मिळे बळ ||२|| डोंगरांचे पर्वत जाहले लंघून जाण्या उर धपापले विमानात मात्र बसता गिरिशिखर भव्य भासले ||३|| संकटांची धग आली पेटून शत्रूसमान खिंडीत गाठून वारामागून वार करून पराजीत केले त्यांना जिंकून ||४|| मार्ग समोरील नवीन अवघड चरण थकले चालून चालून उत्साहाचा झरा न थकला ध्येय समोर आले चालून ||५|| - पाभे २४/०९/२०२१

आजोळच्या आठवणी ​

लेखक नानुअण्णा यांनी गुरुवार, 23/09/2021 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षापुर्वीची गोष्ट, आम्ही तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात एका गावात रहात होतो. माझ्या वडिलांची नोकरी तिथे होती. आमचं आजोळ चौल आणि आईच माहेर अलिबागच्या कुशीतील वरसोली. वर्षांतून एकदा मे महिन्यात शाळेच्या सुट्टीत आम्ही सगळे आजोळी जात असु, आगगाडी, लाल एष्टी असा आमचा आठ एक तासाचा प्रवास असे किंवा व्हाया मुंबई असा. मुबंईत, किंवा डोंबिवलीत एक थांबा आत्या, काकांकडे आणि मग कधी भाऊच्या धक्क्या वरून लाँच अथवा लाल एष्टी. त्यावेळी एष्टी वाटेतील सगळ्या गावात थांबे. एस्टी खचा खच प्रवाशांनी भरलेली असे. सामान, टोपल्या, माश्यांचा वास. कंडक्टर आणि प्रवाशांचा कलकलाट.

लागली कशी ही उ - च - की

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/09/2021 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधी लेखाच्या शीर्षकाचा उलगडा करतो. “मला, लागली कुणाची उचकी”, ही पिंजरा चित्रपटातील लावणी माहित नाही असा मराठी गानरसिक विरळा. उषा मंगेशकर यांच्या स्वराने जगदीश खेबुडकरांच्या या चित्रगीताला अजरामर केलेले आहे. असो. आज ते गाणे हा आपला विषय नाही. तरीसुद्धा हे गाणे माझ्या ओठांवर यायचे कारण म्हणजे……. ..... ..... आज त्या गाण्यातील ‘उचकी’ वर काही आरोग्यलेखन करीत आहे. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी उचकी लागते. ती अचानक येते व थांबतेही. अशा अचानक १-२ उचक्या लागल्या की, “कोण माझी आठवण काढतंय आज” असा पारंपरिक सुखद काल्पनिक विचार मनात चमकून जातो खरा.

विसरले नाही !

लेखक आजी यांनी सोमवार, 23/08/2021 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो,मॅम, अरविंद बोलतोय." "बोल." "उद्या सहा वाजता मैफील आहे." "ह्यावेळी कोणाचं आहे गायन?.. की वादन?" "सरप्राइज." "ओके.उद्या कळेलच." "येस." अरविंदचं आणि माझं संभाषण दर मैफिलीच्या वेळी ठरलेलं. गायन किंवा वादन कुणाचं हे तो कधीच आधी सांगायचा नाही. ते ऐनवेळी कळायचं. त्याच्याकडच्या सगळ्या गानमैफिली माझ्या लक्षात आहेत. विसरण्याजोग्या नाहीतच त्या. अरविंदचं घर म्हणजे टुमदार बंगला. भोवती बाग. दृष्ट लागावी अशी देखणी. मुद्दाम आखून केलेली. डिझायनर. अरविंद आणि त्याची बायको सविता. दोघेही हसतमुख. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्याचं दुःख त्यांना नक्कीच वाटत असणार. पण ते त्यांनी कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाही.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/08/2021 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

रूटीन..

लेखक आजी यांनी सोमवार, 09/08/2021 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
विषयच कंटाळवाणा असल्याने लेख कंटाळवाणा वाटू शकतो. मी खूप वर्षांपूर्वी रिटायर झाले. रिटायर व्हायला काही महिने असताना माझे सहकर्मचारी मला विचारायचे की तू रिटायर झाल्यावर वेळ कसा घालवणार? काय करणार? यावर मी उत्तर द्यायची की आधी काही काळ मला वेळ जात नाही म्हणून बोअर तरी होऊ द्या. मग बघू काय करायचं आणि कसा वेळ घालवायचा ते! रिटायर झाले आणि मनातून बरंच लिखाण करायचं राहिलं होतं ते हातावेगळं केलं. लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं. मग घरी रिकामं बसणं सुरू झालं. हळुहळू लक्षात यायला लागलं की, आपल्याला पूर्वीसारखं काही स्फुरत नाहीयै. प्रतिभा आटलीय. काही लिहिताच येत नाहीयै.