Skip to main content

जीवनमान

महागाई

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी गुरुवार, 05/08/2010 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
महागाई...... महागाई केवढी वाढलेय न, २०० रुपये कधी खर्च झाले माहीत नाही. सकाळी कामाला निघाले. ऑटोत बसले १५ रु, परत मालाडहून ऑटो २५ रु दुपारी कॅफेटेरीयात लंच घेतला [ वेज ] - ५८ रु. इवनिंग टी १५ रु, परत जाताना ऑटोचा एकूण खर्च ४० येताना एक ब्रेड २०/- दुध २७/- लिटर. ७ वर्षांपूर्वी ब्रेड - १०/- दुध - १५/- लिटर घर ते स्टेशन ऑटो - ४/- बस - ३/- विजेचे बिल, केबलचे बिल, कडधान्य, फळे सर्व आताच्या तुलनेत स्वस्त होत लिहिण्याचे कारण म्हणजे काहींचे ठीक आहे पण ज्यांचा पगार ६ ते ७ हजार आहे. त्यांचे कसे होत असेल. अर्थात आपण लिहिण्याशिवाय व त्यावर प्रतिक्रिया देण्याशिवाय बाकी काही करू शकत नाही.

आता पुढची लढाई...

लेखक निनाद यांनी गुरुवार, 05/08/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत, तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्यावर येथेही काही विधायक चर्चा होऊ शकेल असे वाटून देत आहे. लेख वर्तमानपत्रासाठी लिहिला गेल्याने स्वरुप आंतरजालिय लिखाणासारखे नाही याची कल्पना आहे. पण सांभाळून घ्यावे! तसेच अश्विनी कुलकर्णी यांना मिपावरही येण्यासाठी विनंती केली आहेच. आता पुढची लढाई... माहितीच्या अधिकारातून संवेदनशील माहिती हाती आली, गैरकारभार झाल्याचंही दिसतं आहे; पण पुढे काय? या माहितीचं काय करायचं? कोणाकडे दाद मागायची?

मौनाची ढाल

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 04/08/2010 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
मौनाची भाषांतरे करण्यात कितीही मतमतांतरे उद्भवत असली तरी मौनाची ढाल वापरणे कधीही हितकर ठरत असते. काही व्यक्तिंना वारंवार शाब्दिक वार करण्याची मोकाट सवय जडते. तिच्या सान्निध्यात येणारी व्यक्ती ती ते वार झेलून खचून जाते, पिचून जाते. एकतर्फी होणाऱ्‍या या युद्धात हार निश्चितच वार झेलणाराची, हे ठरलेले. परंतु जर मौनाची ढाल पुढे करून वार कर्णपटलावर झेलत राहिल्यास फैरीवर फैरी झाडणारी व्यक्ती जरा संभ्रमित होऊन गप्प होते. तिला वाटते आपण फारच असंबद्ध ओरडत आहोत की काय? समोरून प्रतिसाद मिळाला तरच कोणत्याही कृतीला हुरूप येतो.

एसटी पुराण

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/08/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
एसटी पुराण एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली.

१ ऑगस्ट २०१०

लेखक सारंग कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/08/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ ऑगस्ट २०१०. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. दररोज सकाळी इंटरनेटवर वृत्तपत्र वाचणे हा माझा क्रम ठरलेला आहे. त्याप्रमाणेच आज मी सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, आणि लोकसत्ता ही नेहमीची वृत्तपत्रे उघडली. अर्थात टिळकांचा स्मृतीदिन आणि रविवार असा योग असल्या कारणाने माझ्या या आवडत्या व्यक्तिमत्वाबद्दल भरभरून वाचायला मिळणार अशी माझी खात्री होती. पण मी एक गोष्ट विसरलो होतो किंवा दुर्लक्षित केली होती म्हणणे योग्य होईल, कि या महान नायकाच्या पुण्यतिथीपेक्षाही महत्त्वाची तिथी आज होती.

" दि थर्टी फर्स्ट नाईट......

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 03/08/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
" सामाजिक जाणीवेला,सुधारणेच्या नावाखाली ,एका मर्यादित वर्गापुरत्या,संकुचित ठेवणार्‍या सुधारकांना समर्पित..... " " दि थर्टी फर्स्ट नाईट......" सध्या काही लोकांशी परिचय आणी स्नेह वाढला आहे.. १_ पी.एस्.आय निकम ...मी पोलीसमित्र असल्याने संपर्क वाढला आणी त्यानंतर कळाले,शेतमजुरांच हे पोर मिसरुड फुटायच्या वयात हवालदार झाल नंतर परीक्षा देत-देत फौजदार झाल. पाच वर्षाच्या खात्यातल्या प्रवासात अजुन नीटस पोलीसी वारं न लागलेला मी पाहिलेला पहिला फौजदार !! २_ बापु ...आडनावात खांदवे-पाटील असला तरी गुंठेमत्र्यांचा माज चेहर्‍यावर अजिबात नाय.

घरातील ज्येष्ठ व्यक्ती

लेखक शुचि यांनी मंगळवार, 03/08/2010 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारची गोष्ट आहे. १० वर्षाच्या माझ्या मुलीची मैत्रिण आमच्याकडे माझ्या मुलीशी खेळायला म्हणून आली होती. आई म्हणजे माझ्या सासूबाई नेहेमीप्रमाणे लोकरीचा स्वेटर वीणत बसल्या होत्या. या चिमुरडीचा आल्या आल्या चिवचिवाट सुरु झाला. तिनी आल्या आल्या स्वेटरचं कौतुक केलं, तो शिकून घेण्यात रस दाखवला. आई फक्त शांतपणे म्हणाल्या "बघ, म्हणजे येईल." : ) आणि वीणू लागल्या. मैत्रिणीचा उत्साह बघून आमच्या पिल्लाला कंठ फुटला नसेल तर नवल - "आज्जी खूप छान वीणते. तिनी ऑलरेडी अर्धा स्वेटर वीणला आहे. ती मला शिकवणार आहे" मला ते सगळं ऐकून खूप लाज वाटली.

एक अनुभव...

लेखक अनिल २७ यांनी सोमवार, 02/08/2010 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुभव... माझ्या बहीणीच्या एक मैत्रीणीची या वर्षी MBA साठी पुण्यातील एका प्रथितयश कॉलेजमधे निवड झाली. त्या कॉलेजमधे पुढील admission process साठी ती गेली असता तिथे तिला फी ७२०००/- सांगितली गेली, त्यानुसार दुसर्‍या दिवशी ती फी भरण्यास गेली असता तिला अचानक ७४०००/- भरावे लागतील असे कॉलेजने सांगितले.. तिने त्यावेळेस सोबत ७२०००/- आहेत असे सांगितले तेंव्हा कॉलेजने ऊरलेले २०००/- नंतर येऊन जमा करा असे म्हटले.. त्यानुसार तिने ७२०००/- त्याचदिवशी भरले, पण तिला पोचपावती फक्त ६७०००/- ची देण्यात आली.

काही नमुने.. (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 02/08/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही नमुने.. ================================ कोणती ही सेवा म्हटली की ती यशस्वीपणे दीर्घ काळ चालत राहावी यासाठी त्या सेवेवर सेवा शुल्क आकारणे, हे सेवा शुल्क सर्वां कडून भरले जाते ना? याची त्या सेवेचा कोणी गैरवापर करत नाहीन याची खबरदारी घ्यावीच लागते. आपली लोकल ही त्याला आफवाद नाही. मग त्यातूनच वेळच्या वेळी तिकीट, पास, काढणे ( पास कधी संपतो हे लक्षात ठेवणे ) तो तिकीट चेकरला दाखवणे या सारख्या गोष्टी लोकल प्रवाशांच्या जीवनाचा भाग बनून जातात.

एक दिवस मैत्रीचा..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 01/08/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अन् तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मैतरांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा! एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्‍यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते.