काही बाही...
कधी कधी एखादं पुस्तक समोर असलं तरी अथपासुन इतिपर्यत वाचुन होत नाही.
कारणं अनेक असतात. अशा वेळेस आमचे परममित्र बिकाशेट यांच्या सारखं कुठलंही पान काढुन वाचायचं ही पद्धत मी अवलंबतो.
काल असंच झालं. एक पुस्तक काढलं आणि मधूनच वाचायला सुरवात केली. अर्ध मुर्ध पान झालं की जा पुढे नाही तर मागे. असं करता करता काही वाक्य समोर आली. बिकाशेटनी आवडलेलं काही.. असं कधीतरी लिहिलं होतं. म्हटलं आपण पण लिहावं. आता हे तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही.
मिसळपाव