Skip to main content

जीवनमान

जाहिरातीरेक!!! (जाहिरातने व्यापून व्यापून थोड्याश्याच उरलेल्या उर्वरीत जगाची गोष्ट!)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/10/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
(आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य. पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नाहीए. आजकाल जाहिराती अगदी कुठेही दिसतात. चित्रपटात, त्यातल्या गाण्यांत, वर्तमानपत्रात, बातम्यांच्या ब्रेक मध्ये, सिरियल्सच्या ब्रेकमध्ये, होर्डींग्ज वर, पुलांवर, भिंतींवर, रिक्षेवर, घरांवर, भींतींवरल्या घड्याळांमध्ये, टी शर्टांवर, लहान मुलांच्या चॅनेल्सवर, वाहनांवर, कॅलेंडरवर, मुलांच्या वह्या-पुस्तकांवर, कॅरी बॅग्जवर, बस स्टंण्ड्वर, एस. टी.

मिपाकरांसाठी खुषखबर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/10/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्‍याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो.

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 10/10/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला.

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/10/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
(आज नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली.
काव्यरस

घाटवाटा

लेखक जिप्सी यांनी शुक्रवार, 08/10/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांची आणि आपली मैत्री एकदा जुळली की मग हळूहळू घाटवाटांची ओळख व्हायला लागते. पहिल्यांदा आपली त्यांची गाठ पडते ती एका गडावरून दुसर्‍या गडावर जाताना. लांबची,फिरून जाणारी वाट टाळण्यासाठी आपण एखाद्या गावकर्‍याला रस्ता विचारतो आणि तो म्हणतो,त्यो किल्ला व्हय ? हे हित पलीकडल्या अंगाला,ह्यो दांड/घाट उतरला की खायल्या अंगाला !

आम्हीही पाणी वाहून आणतो !!!

लेखक लतिका धुमाळे यांनी गुरुवार, 07/10/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यावर माझ्या लक्क्षात एक गोष्ट आली , ईथे गाड्यानची डिकी मोठी असते. त्यात खूप सामान मावते. डिकी उघडली की त्यात बाटल्यान्चे क्रेट्स दिसायचे, सुरवातीला मला वाटले बियरच्या , फळाच्या रसाच्या नाहितर वाईनच्या बातल्या असतील. पण लक्क्षपूर्वक बघितल्यावर लक्क्षात आले की पाण्याच्या बाटल्या जास्त असतात. गाडी कोणतीही असूदे , मर्सडीज, बीएमड्ब्ल्यू , कोणतीही , प्रत्येकजण गाडीतून पाणी वाहून नेत असतो. निरनिराळी पेय मिळणारी मोठी मोठी दुकाने असतात, त्या समोर किमती गाडयात पाण्याच्या बाटल्यान्चे क्रेट्स ठेवताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत.