Skip to main content

जीवनमान

50 First Dates आणि गोजिरी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 21/10/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही) चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.

वो आ गया...

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 20/10/2010 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल माझी 'कारवाँ' मधल्या हेलनसारखी अवस्था झाली आहे. ती कशी अंगाला शक्य त्या सगळ्या कोनांमधून घुसळून आणि डोळ्यांना, पापण्यांना, बुबुळांना शक्य त्या सगळ्या दिशांना फिरवून "वो आ गया...वो आ गया..." असं बेभानपणे जाहीर करत सळसळत नाचते; तसच काहीसं झालयं माझं... 'तो' येणार असे वाटले की मी बाह्या सरसावून बसतो. कधी-कधी अगदी आतूरतेने त्याची वाट देखील बघतो. मग मनातल्या मनात मी देखील "वो आ गया...वो आ गया..." असं पुटपुटतो. कधी-कधी (नव्हे बर्‍याचदा) 'त्या'च्या येण्याची धास्ती मला अस्वस्थ करून जाते. 'तो' आला की 'मी माझा' राहत नाही. 'तो' आला की मी माझाच काय, माझ्या बायकोचा देखील राहत नाही.

झोप.

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 18/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, झोप. निसर्गाने सर्व प्राण्यांना दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. झोप घेण्याने थकवा आणि शरिराची झीज भरुन येते. झोप किती तासांची असावी, कधी झोपावे कधी उठावे याबाबत बरेचसे युक्तीवादपण होत असतात. पण या झोपेचे खरं तर एक रहस्यच आहे. झोपेत माणुस कसा असतो हे त्याला कधीच कळत नाही. खरं तर झोप म्हणजे मेल्यानंतर जी अवस्था होत असावी तीच असं माझं मत आहे. असो, तर या झोपेचेही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे प्रकार आहेत. यावरुन गमतीजमतीही बर्‍याच होताना दिसतात. दिवसा झोपणे आणि रात्री झोप न येणे आणि दुसर्‍या दिवशे ऑफिसात झोप येणे हा एक जगभर पहायला मिळणारा प्रकार आहे.

युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 16/10/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी
आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी, मी तुझी काठी एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ|| आजोबा: हलते हे जड डोके, डुगडुगते मान कवळी कुठे चालली, नाही कसले भान आजी: केसांच्या बटा झाल्या, त्यांची नाही वेणी स्वार्थी जगात फिकीर करावी कुणी? चिंता नको, आता जगायचे एकमेकांसाठी आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||१|| आजोबा: किती खस्ता खाल्या अन किती कष्ट केले उमेदीच्या वेळी कामाला झोकून दिले आजी: जु
काव्यरस