कधी कधी
कधी कधी आयुष्यातल्या दिवसांचे गणित कळतच नाही. कधी कधी सगळं कसं एकाच धाग्यात गुंफल्यासारखं घडत असतं किंवा कधी कधी काहीच घडत नाही बरेच दिवस; नुसतेच दिवस पळत असतात. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कॅलेंडरची पाने बदलावीत त्याप्रमाणे दिवस उडत असतात. देवासमोरच्या आरतीच्या ताटात कापराच्या वड्या भर्रभर्र जळाव्यात आणि काही क्षणांतच तिथे फक्त काळपट काजळी रहावी किंवा गॅसवर ठेवलेल्या कढईतले पाण्याचे थेंब काही क्षणातच नाहीसे व्हावेत तसं काहीतरी आयुष्यातल्या दिवसांचं होतं कधी कधी.
कधी कधी काही दिवस उगीच सगळं बिघडत जातं. अगदी साध्या-साध्या गोष्टी डोक्याला ताप देतात.
मिसळपाव