मॅड
दिवाळीची धामधूम. लोक गल्लीत फटाके, फुलबाज्या वाजवत आहेत. बहिणी भावाला ओवाळत आहेत, उत्सवी वातावरण! जीव कसा हरखून जातो ना?? माझाही जात होता. पण काल-पर्वाचे अॅटमबॉम्ब तसेच पडलेले असूनही मला ते वाजवावे वाटेनात. उगाच फालतू आवाज कशाला काढायचे. नुकताच गाडीवर दीड-दोनशे किलोमीटर जाऊन आलो होतो. त्यामुळे आपल्यालाही शरीर आहे हे जाणवत होते. आ:!!!! आई ~!!!! अर्धाकप चहा दे बरं ! खिडकीतून गल्लीतला फटाक्यांचा नजारा पहात-पहात आपसूकच मातोश्रींना ऑर्डर गेली. तेवढ्यात बाहेर वेगळेच आवाज होऊ लागले होते.
धाड्ड...धाड्ड.. फड्ड्ड...फड्ड्द..
काय आहे म्हणून बघायला बाहेर पडलो.
मिसळपाव
खरे तर या आडोश्याला मी बरीचशी चित्र पाहिली होती,पण एखाद्या लहान मुलाला ? श्या !!