Skip to main content

जीवनमान

स्वप्नांचे पान मुंबई

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 27/01/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे
काव्यरस

चूकचक्र..

लेखक गवि यांनी गुरुवार, 27/01/2011 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
3

प्रजासत्ताक (?) दिन

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/01/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार. पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे.

हरवलेले खेळ

लेखक मनराव यांनी मंगळवार, 25/01/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
असंच परवा रात्री लहानपणात रमून गेलं असताना मनात एक विचार आला. लहानपाणी आपण किती तरी छोटे छोटे खेळ खेळलो. विषामृत, लीन्गोर्च्या, लपाछपी, गोट्या, विटी-दांडू, डबा-ऐसपैस, भोवरा... एक न अनेक.रोज वेग वेगळे खेळ खेळायचं ठरवलं असतं तर एखादा खेळ परत खेळण्यासाठी बरेच दिवस लागले असते. अजूनही आठवतं लपाछपी खेळताना, लपण्यासाठी ठरलेल्या, कोणालाही माहिती नसलेल्या त्या जागा, एकमेकांचे शर्ट घालून ज्याच्यावर राज्य आहे त्याला फसवणे.... भोवरा खेळताना, मुद्दाम भोवरा लांब जाऊन फिरेल अशा पद्धतीने मारणे... डबा-ऐसपैस खेळताना सगळ्यांनी एकदमच डबा उडवायला जाणे...

चिनम्मा,चिलकम्मा...

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 22/01/2011 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
दुबई, एक स्वप्न नगरी...अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारी एक रुपेरी पडद्यासारखी, झगमगाट असणारी नगरी. दुबईला मोठमोठी तारांकित हॉटेल्स आहेत, दुकाने आहेत आणि मोठ्या पगारावर नोकर्‍या करुन घर चालवण्यार्‍या मंडळींची संख्या सुद्धा इथे कमी नाही. इथे तर खरेदी उत्सव भरतो...खरेदी आणि विक्री. अशाच एका खरेदीची ही एक दर्दभरी कहाणी आहे. रमेश एका सॉफ्टवेअर कंपनीत कामास होता आणि काही वर्ष नोकरी झाल्यावर त्याला त्याच्या कंपनीने १ वर्षासाठी कामानिमित्त दुबईला पाठवायचे ठरवले.

माईंड इज ए मिथ

लेखक यकु यांनी शुक्रवार, 21/01/2011 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वी मिसळपाव वर यु.जी. कृष्णमूर्तींबद्दल एक लेखमाला लिहिण्याचा योग आला होता. त्यात यु.जी. या व्यक्तीमत्वाबद्दल बरीच माहिती सादर करता आली असली तरी त्यात लोकांशी झालेला युजींचा वास्तविक संवाद हा अत्यंत कमी होता. यु.जी. कृष्णमूर्तींसोबत साधलेल्या संवादांचे संकलन असलेली "माईंड इज ए मिथ", "मिस्टिक ऑफ एन्लायट्न्मेंट" आणि "थॉट इज युवर एनेमी" ही पुस्तके मी पुन्हा एकदा वाचत आहे; त्यातीलच एका पुस्तकातील प्रकरणाचा मी मराठीमध्ये अनुवादीत केलेला हा काही भाग. मिसळपाव वरील वाचकांना आवडल्यास, पुढील भाग अनुवादीत करायला आनंद वाटेल; मी एरव्ही वाचणार आहेच.

गरजू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 20/01/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीतल्या एका संस्थेतर्फे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने एक उपक्रम चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी दहावीत ९४%च्यावर गुण मिळतील तसेच त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,८०,०००/- पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील ११वी आणि १२वी साठी आर्थिक मदत केली जाईल. जर का विद्यार्थ्याने १२वीत परफॉर्मन्स मेंटेन केला तर वैद्यकिय अथवा अभियांत्रिकीच्या (फक्त शासकिय महाविद्यालायतील) शिक्षणासाठी देखिल मदत केली जाऊ शकते. आपणा सर्वांना नम्र आवाहन...

आभास हा.....

लेखक रेवती यांनी बुधवार, 19/01/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अर्पणओळ - नववर्षात व्यायामाचा संकल्प सोडलेल्या सर्वांना! बाहेर मस्त थंडी पडलिये, पहाटे उठून आलं घातलेला वाफाळता चहा प्यावा, दिवस लवकर सुरु करावा, डोंगरामागून येणार्‍या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही........ म्हणजे लहानपणापासून कधी वाटलंच नाही, पण तसं वाटावं म्हणून मी प्रयत्न भरपूर केले. आई, आज्जी बरेचदा जवळच्या देवळात काकडआरतीला जात असत. किती मस्त वाटतं वगैरे वर्णनंही करत्.....तरीही पहाटे उठणं हा माझा घास नव्हे. मुलांना पहाटे उठण्याची चांगली सवय लावावी असं आईला नेहमी वाटत असे. तिला त्यात कधी यश मात्र आलं नाही.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!... भोगीच्या दुसर्‍या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली! संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा! आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा.... हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका... स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-? पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम! "जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!